Wednesday, January 16, 2013

गृहविज्ञान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

        मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली प्रायोचित 'विस्ताराकांसाठी संवाद व व्यवस्थापन कौशल्य' या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील दहा दिवसीय प्रशिक्षणाचे १६ ते २५ जानेवारी २०१३ दरम्यान आयोचन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्प संचालक मा. डॉ. एन. सुधाकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, दापोली माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक निर्बन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      आपल्या उदघाटनीय भाषणात मा. डॉ. एन. सुधाकर म्हणाले कि, प्रत्येक व्यक्तीला प्रभावी संवादाची गरज आहे. शेतकऱ्यांचा गरजेनुसार विस्तार शिक्षण असले पाहिजे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीमार्फत, योग्य व्यक्तीला ज्ञान देणे महत्त्वाचे आहे. यासाठी  माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. 
       शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे भाषणात म्हणाले कि, विद्यापीठाचे तंत्रज्ञान साधारणतः ३० - ३५ % शेतकऱ्यान पर्यंत पोहचले आहे. पारंपारिक विस्तार शिक्षण पद्धती सोबतच माहिती तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीचा वापर करावा. सध्या शेतकऱ्यांना बाजारविमुख विस्तार शिक्षणाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या विविध तंत्रज्ञानाच्या गरजा आहेत, कृषी विस्तार कार्यकर्त्यास नवीन विस्तार पद्धतीची माहितीसाठी व त्याच्या प्रभावी वापरासाठी या प्रकारच्या प्रशिक्षणाची आवशकता आहे. 
       विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण भाषणात म्हणाले कि, विस्तार कार्यकर्त्यास विस्तार पद्धतीचे ज्ञान तर पाहिजेच सोबतच संवाद कौशल्य विकसित करणे गरजेच आहे. 
   गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम यांनी प्रास्ताविक केले तर विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रवीण कापसे यांनी केले. यावेळी  विद्यार्धी, प्राध्यापक व कर्मचारी आदीं मोठया संख्येने उपस्थित होते.  
      या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील विविध कृषी विद्यापीठातील २५ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विस्तारक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणात विस्ताराकांसाठी आव्यशक संवाद व व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा कृषी विकासात उपयोग, व्यक्तीमत्व विकास, विविध प्रसारमाध्यमांसाठी आव्यशक कौशल्य या विषयावर मार्गदर्शन विविध क्षेत्रातील तज्ञ करणार आहेत.

गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील दहा दिवसीय प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण पुस्तिकिचे विमोचन करतांना  मा. डॉ. एन. सुधाकर, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे व विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार,  गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम, विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल आदी