Tuesday, March 12, 2013

डॉ आशा आर्य पाटील आदर्श शिक्षक पुरस्‍काराने सन्‍मानीत

डॉ आशा आर्य पाटील आदर्श शिक्षक पुरस्‍काराने सन्‍मानीत
मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयामध्‍ये अन्न व पोषण विभागात सहयोगी प्राध्‍यापक या पदावर कार्यरत असणा-या डॉ आशा आर्य यांना 2012-2013 या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्‍कार देवुन गौरविण्‍यात आले.
मराठवाडाच्‍या कृषि विद्यापीठाच्‍या दिक्षांत समारंभात केद्रिंय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार, मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे, भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ किर्तीसिंग, महाराष्‍ट्र शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष विजयराव कोलते व विद्यापीठाचे सर्व संचालक यांच्‍या प्रमुख उपस्थितीत महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या शुभहस्‍ते हा पुरस्‍कार त्‍यांना प्रदान करण्‍यात आला
डॉ आशा आर्य गेल्‍या 25 वर्षापासुन विद्यादान, संशोधन आणि विस्‍तार शिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्‍यांनी राष्‍ट्रीय संस्‍थामध्‍ये पोषण शास्‍त्राचे आणि अमेरीकेतील कॉर्नेल विद्यापीठात माता व बालपोषण विषयाचे सखोल प्रशिक्षण घेतले आहे. त्‍या आहारतज्ञ असुन अन्‍न व पोषण विभागातील न्‍युट्रीहेल्‍थ या आहार मार्गदर्शन केंद्रामार्फत आहार व पोषण विषयक समुपदेशाचे कार्य करीत आहेत. शहरात आयोजीत अनेक कार्यक्रमात त्‍यांनी विविध आजारात घ्‍यावयाचा आहारासंबंधी मार्गदर्शन केले आहेत.
     कुपोषण निर्मुलनासाठी आहारातील सोयाबीन समावेशासंदर्भात हिंगोली जिल्‍हयात जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन केलेल्‍या मोलाच्‍या कामगिरीबददल हिंगोली जिल्‍हा परिषदेने त्‍यांना अंगणवाडी मित्र शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबददल शिक्षण संस्‍थेने सावित्रीबाई फुले पुरस्‍कार देवुन गौरविले आहे. यापुर्वी त्‍यांना गृहविज्ञान महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक आणि मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उत्‍कृष्‍ट काम करणारा अधिकारी हा पुरस्‍कार मिळालेला आहे. त्‍यांनी अनेक विद्यार्थ्‍यांना पदव्‍युत्‍तर संशोधनासाठी मार्गदर्शन केलेले आहे, तसेच त्‍यांनी नवी दिल्‍ली येथील भारत सरकाराच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि नवी मुंबई येथील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचा पुरस्‍कृत संशोधन प्रकल्‍प यशस्‍वीपणे राबवित आहेत. त्‍यांच्‍या खास माता व बालकातील कुपोषण दुर करण्‍यासाठी विकसीत करण्‍यात आलेल्‍या सुपोषा प्रथिने, उर्जा, कॅलशिअम, समृध्‍द पुरक पदार्थ, पोषकद्रव्‍ये समृध्‍द कोबीची, हरभ-याची, शेवग्‍याची पाने आणि तेलविरहीत सोयामील वापरून तयार केलेल्‍या लोह, कॅलशिअम, प्रथिने, समृध्‍द पदार्थ आणि शिशु आहारास रक्‍तक्षय प्रतिबंधात्‍मक शैक्षणिक साहित्‍यास राज्‍यस्‍तरीय समन्‍वयीत संशोधन परिषदेची मान्‍यता मिळालेली आहे. लेख, महिला मेळावा, महिला मंडळ, शाळा, आकाशवाणी इत्‍यादी माध्‍यमातुन आहारविषयी सतत मार्गदर्शन करीत असतात. या सन्‍मानाबद्दल विद्यापीठातील सर्व संचालक, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्‍यापक इत्‍यादींनी अभिनंदन केले आहे.