Thursday, March 14, 2013

जैव-तंत्रज्ञानावरील संशोधनाला गती दयावी ........ मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे




जैव-तंत्रज्ञानाचा वापर करून जैविक–अजैविक ताणास सहनशील अशा पिकांच्‍या जाती निर्माण कराव्‍यात. शाश्‍वत कृषि विकासासाठी हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीच्‍या संशोधनावर भर देण्‍याचा सल्‍ला मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे यांनी मराठवाडा कृषि वि़द्यापीठाच्‍या कृषि संशोधन परिषदेच्‍या 16 वी बैठकीत दिला. मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे याच्‍या अध्‍यक्षतेखाली दि 09 मार्च रोजी हि बैठक संपन्‍न झाली. या परिषदेचे सदस्‍य भारती  अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दुर्ग (छत्‍तीसगड) चे प्राचार्य डॉ डी के दास, महाराष्‍ट्र राज्‍य कृषि बाजार मंडळाचे प्रकल्‍प सल्‍लागार डॉ बी बी गुंजाळ, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ आर एस पाटील, पशुसंवर्धन व दुग्‍ध विकास विभागाचे विभागीय सहआयुक्‍त श्री मोईउदिन, संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, विभाग प्रमुख उपस्थित होतेविद्यापीठाच्‍या कृषि संशोधनाची दिशा ठरविण्‍याचे कार्य ही परिषद असते.
मा कुलगूरू डॉ किशनराव गोरे पुढे म्‍हणाले की, खाजगी संस्‍थेसोबत करार करून त्‍यांचा  सहभाग कृषि संशोधनात व विस्‍तार कार्यात घ्‍यावा. विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाचे पेंटटसाठी विशेष प्रयत्‍न करावेत. शेतक-यांच्‍या गरजेनुसार संशोधन कार्य व्‍हावे अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
डॉ बी बी गुंजाळ म्‍हणाले कि, या भागास अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीचे आवाहन शास्‍त्रज्ञांनी स्‍वीकारले पाहिजे. मुल्‍यवर्धीत पदार्थ निर्मितीचे तंत्रज्ञान शेतक-यांना देणे गरजेचे आहे. शेतका-यांमध्‍ये व विद्यार्थ्‍यामध्‍ये उद्योजकता विकास व्‍‍हावा. उघानविद्याचे हाय-टेक तंत्रज्ञान शेतक-यांसाठी उपयुक्‍त ठरेल. शेतक-यांच्‍या विकासासाठी सर्व विभागांनी सांघीक प्रयत्‍न करावेत असे आवाहन त्‍यांनी केले. डॉ डि के दास म्‍हणाले की, मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सिंचन प्रकल्‍प शेतक-यांसमोर एक आदर्श मॉडेल ठरणार आहे.
संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांनी विद्यापीठाच्‍या मागील वर्षीच्‍या संशोधन कार्याची माहिती दिली. सर्व सहयोगी अधिष्‍ठाता यांनी आपआपल्‍या विभागातील संशोधनाची माहिती दिली. बैठकीचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संशोधन उपसंचालक डॉ ए एस कारले यांनी केले.  कार्यक्रमाच्‍या यश्‍स्‍वीतेसाठी डॉ लांडे, प्रा सचिन मोरे, प्रा देव्‍हारे, श्री बनसोडे, श्री सुभेदार, श्री विकास शिंदे आदींनी परिश्रम घेतले