Friday, July 12, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये या आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २४.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी ११.० ते १७.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य-पश्चिम दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६.० ते ९०.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१.० ते ७३.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

कृषी सल्ला 


  सोयाबीन
सोयाबीनचे पीक वाढीच्‍या अवस्‍थेत आहे. वापसा येताच पिकात हलकी कोळपणी करावी. ज्‍या ठिकाणी तणांची वाढ अधिक दिसून येत असल्‍यास परशुट या तणनाशकाची ३० मीली प्रति १५ लिटर पाण्‍यात मिसळुन वारा शांत असताना फवारणी करावी.
  बाजरी
बाजरीचे पीक वाढीचे अवस्‍थेत आहे. वापसा येताच हलकी कोळपणी करून पीक तण विरहीत ठेवावे.
  मुग/उडीद
मुग/उडीदाचे पीक वाढीचे अवस्‍थेत आहे. वापसा येताच हलकी कोळपणी करावी.
  चिकु
नविन लागवड केलेल्‍या चिकु बागेत आळयात पाणी साचून रहाणार नाही. याची काळजी घ्‍यावी. खुंटावर येणारी फुट काढून टाकावी. कलमाना काढीचा आधार द्यावा. 
  आंबा
नविन लागवड केलेल्‍या कलमांचे आळयात पाणी साठून रहाणार नाही याची काळजी घ्‍यावी.
  पेरू
नविन लागवड केली नसल्‍यास पेरूची लागवड करावी. यासाठी लखनौ ४३ (सरदार) या वाणाची निवड करावी. लागवड ६x६ मिटर अंतरावर करावी.
  भाजीपाला़
पालेभाज्‍यांची (पालख, शेपू, चुका, माठ,) यांची काढणी करावी.
  पशुधन       
  व्‍यवस्‍थापन
सध्‍या जनावरांनमध्‍ये गोचीडांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. गोचीड नियंत्रणासाठी मेटारायझिम बुरशीचा वापर गोठयात गोचिडांच्‍या नाश करण्‍यासाठी करावा. मेटारायझिमचे द्रावण जनावरांच्‍या शरीरावर फवारण्‍यासाठी वापरू नये, केवळ गोठयात फवारण्‍यासाठी याचा वापर करावा. ५ ग्रॅम मेटारायझिम पावडर अधिक ५ मि.लि. दूध प्रति लिटर पाण्‍यात मिसळून द्रावण तयार करावे. हे तयार केलेले द्रावण गोठयात फवारण्‍यापूर्वी जनावरे गोठयाबाहेर काढावीत, तसेच चारा व इतर गोष्‍टीही गोठयाबाहेर काढाव्‍यात. गोचीडनाशकाची फवारणी दावणीखाली व गोठयाच्‍या भिंतीच्‍या कडा-कपारीमध्‍ये जेथे जेथे गोचिडांची अंडी आहेत अशाच ठिकाणी करावी. रात्रीच्‍या वेळेस फवारणी करणे अधिक फायदेशीर ठरते.
  कृषि    
  अभियांत्रिकी
मुलस्‍थानी मृ‍द व जलसंधारणाची काम पावसाने उघडीप दिल्‍याबरोबर त्‍वरीत करून घ्‍यावीत तसेच बांधबंधिस्‍ती करावी. प्रामुख्‍याने विद्यापीठाच्‍या शिफारशी वापराव्‍यात. शेततळे, पाझरतलाव आणि इतर जलसंधारणाची कामे करावीत. ज्‍यायोगे भुजल पातळीत वाढ होईल तसेच जुलै अखेर ऑगस्‍टमध्‍ये पावसात खंड पडल्‍यास कापूस, तूर व इतर पिंकास संरक्षित पाणी देता येईल.

केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषिहवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः २६
दिनांकः १२/०७/२०१३