Sunday, July 14, 2013

अन्‍नतंत्र महाविद्यालयातील अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत विक्री केंद्राचे राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्‍या हस्‍ते उद् घाटन

अन्‍नतंत्र महाविद्यालयातील अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत विक्री केंद्राचे राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, प्रकल्पाचे प्रभारी डॉ. वसंत पवार, उद्योजक मोहम्‍मद गौस, डॉ. संजय टाकळकर, प्रा. सय्यद हश्‍मी, श्री. पुरषोत्‍तम खिस्‍ते, डॉ. के. एस. गाडे, प्रा. आर. बी. क्षीरसागर, प्रा. बी. एस. आगरकर, प्रा. जी. एम. माजेवाड, प्रा. प्रविण घाटगे तसेच प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी 
राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्‍या हस्‍ते या युनिट मध्‍ये तयार करण्‍यात आलेला 22 टन मिक्‍स फ्रुट जॅमच्‍या मालवाहु वाहनास हिरवा झेंडा दाखवुन हा जॅम दुबाईस रवाना करण्‍यात येतांना,  या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, प्रकल्पाचे प्रभारी डॉ. वसंत पवार, उद्योजक मोहम्‍मद गौस, प्रा. सय्यद हश्‍मी, श्री. पुरषोत्‍तम खिस्‍ते, डॉ. के. एस. गाडे, प्रा. आर. बी. क्षीरसागर, प्रा. जी. एम. माजेवाड, प्रा. प्रविण घाटगे तसेच प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी 
अन्‍नतंत्र महाविद्यालयातील अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत विक्री केंद्राचे राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, प्रकल्पाचे प्रभारी डॉ. वसंत पवार, उद्योजक मोहम्‍मद गौस, डॉ. संजय टाकळकर, प्रा. सय्यद हश्‍मी, श्री. पुरषोत्‍तम खिस्‍ते, डॉ. के. एस. गाडे, प्रा. आर. बी. क्षीरसागर, प्रा. बी. एस. आगरकर, प्रा. जी. एम. माजेवाड, प्रा. प्रविण घाटगे आदी  


अन्‍नतंत्र महाविद्यालयातील अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत विक्री केंद्राचे राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्यात आले, त्या प्रसंगी प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थीशी सवांद साधतांना, विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, प्रकल्पाचे प्रभारी डॉ. वसंत पवार, उद्योजक मोहम्‍मद गौस, डॉ. संजय टाकळकर, प्रा. सय्यद हश्‍मी, श्री. पुरषोत्‍तम खिस्‍ते, प्रा. जी. एम. माजेवाड, प्रा. प्रविण घाटगे तसेच प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी 
     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयातील सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्‍प निश्चितच प्रसंशनीय असुन असा प्रकल्‍प राबविणारे राज्‍यातील पहीलेच विद्यापीठ आहे, राज्‍यातील तसेच देशातील विद्यापीठापुढे हा प्रकल्‍प अनुकरणी ठरेल, असे प्रतिपादन सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांनी केले.
     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालयात अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत उत्‍पादीत होणारे प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी विद्यापीठात विक्री केंद्र सुरू करण्‍यात आले, त्‍याच्‍या उद्घाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, विद्यापीठाचा या प्रकल्पामध्ये  निर्यातक्षम मुल्‍यवर्धीत पदार्थाच्या निर्मीतीपासुन बाजारपेठेपर्यंतच्‍या प्रत्‍येक टप्‍पावर विद्यार्थ्‍याच्‍या सहभागामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकतेच्‍या गुणांचा निश्चितच विकास होणार आहे. भविष्‍यात या प्रकल्‍पामुळे या भागात उद्योजकता विकासास देखिल हातभार लागणार आहे. त्‍यामुळे करार शेतीच्‍या माध्‍यमातुन कच्‍चा माला निर्मीतीची संधी शेतक-यांना प्राप्‍त होईल. या भागातील बचत गटातील महिलांनी यापासुन प्रेरणा घ्‍यावी, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला.
    या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे म्‍हणाले की, अनुभवाधारीत शिक्षण प्रकल्‍पामुळे विद्यार्थ्‍यांना प्रक्रिया पदार्थ तयार करण्‍यासाठी कच्‍चा मालाच्‍या खरेदीपासून प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग करून बनविलेल्‍या उत्‍पादनाच्‍या मार्केटिंगपर्यंतचे व्‍यवस्‍थापन कौशल्‍य प्राप्‍त होणार आहे. भविष्‍यात या प्रकल्‍पामुळे विद्यार्थ्‍याबरोबरच शेतकरी व उद्योजक यांना देखिल फायदा होणार आहे. या प्रकल्‍पामुळे शेतीमाल प्रक्रिया उद्योजकता वाढीस चालना लागणार आहे, त्‍यामुळे या भागातील शेतक-यांना निश्चितच फायदा होईल.
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील अन्‍नतंत्र महाविद्यालयांत चार वर्षाचा बी. टेक. (अन्‍नतंत्र) पदवी अभ्‍यासक्रम आहे. या अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात अनुभवारित शिक्षण कार्यक्रम (एकसपिरीएन्‍शल लर्निग प्रोग्रॅम) चा अंर्तभाव आहे. विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकतेच्‍या कौशल्‍यगुणांचा विकास व्‍हावा हा यामागील हेतू आहे. या सत्रात चार महिने विद्यार्थ्‍याना प्रक्रिया ते मार्केटिंगपर्यतंचे कौशल्‍य शिकविले जाते. विद्यापीठांने नुकतेच या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व उद्योजक श्री. मोहम्‍मद गौस यांच्‍या झैन नॅचरल अग्रो इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीशी सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्‍प (पब्लिक प्रायव्‍हेट पार्टनरशिप – पीपीपी) प्रायोगिक तत्‍वावर यशस्‍वीपणे राबवून क्रांतिकारक पाउल उचलले आहे. या प्रकल्‍पांतर्गत उत्‍पादीत होणारे प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी विद्यापीठात विक्री केंद्राचे उद्घाटन करून सुरू करण्‍यात आले. सदरील विक्री केंद्रावर या प्रक्रीया युनिट मध्‍ये उत्‍पादीत होणारे टोमॅटो सॉस, मिक्‍सड फ्रुड जॅम, आंबा, लिंबु, मिरचीचे लोणचे आदी पदार्थ  सवलतीच्‍या दराने ग्राहकांना उपलब्‍ध होणार आहेत. गेल्‍या दिड महिण्‍यापासुन या प्रक्रीया युनिट मध्‍ये अन्‍नतंत्र महाविद्यालयांचे 53 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असुन, त्‍यांच्‍या सहभागाने उत्‍पादीत होण्‍या-या मालावरील नफापैकी 50 टक्‍के वाटा विद्यार्थीना देण्‍यात येणार आहे. याप्रसंगी राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्‍या हस्‍ते या युनिट मध्‍ये तयार करण्‍यात आलेला 22 टन मिक्‍स फ्रुट जॅमच्‍या मालवाहु वाहनास हिरवा झेंडा दाखवुन हा जॅम दुबाईस रवाना करण्‍यात आला.
      यावेळी या प्रकल्पाचे प्रभारी डॉ. वसंत पवार, उद्योजक मोहम्‍मद गौस, डॉ. संजय टाकळकर, प्रा. सय्यद हश्‍मी, श्री. पुरषोत्‍तम खिस्‍ते, डॉ. के. एस. गाडे, प्रा. आर. बी. क्षीरसागर, प्रा. बी. एस. आगरकर, प्रा. जी. एम. माजेवाड, प्रा. प्रविण घाटगे तसेच प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी उपस्‍थीत होते.