Wednesday, June 25, 2014

कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी शेतक-यांची शेती समजुन घ्‍यावी ........डॉ. बी. बी. भोसले

यावर्षी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत होणार पिक संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रसार

कृषिदुत व कृषिकन्‍यांना मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले

कृषिदुत व कृषिकन्‍यांना मार्गदर्शन करतांना ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. राजेश कदम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महावि‍द्यालयाच्‍या बी.एस्‍सी. (कृषि) पदवीच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो. हा कार्यक्रम राबविण्‍यांसाठी कृषिदुत व कृषिकन्‍यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन दि. २४ जुन रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले होते तर विविध विषयतज्ञ व्‍यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी कृषिदुत व कृषिकन्‍यांना मार्गदर्शन करतांना  प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले म्‍हणाले की, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम हा विद्यार्थ्‍यांनी तीन वर्षात पदवीपुर्व अभ्‍यासक्रमात शिकलेल्‍या ज्ञानचे मुल्‍यमापन कार्यक्रम असुन प्रत्‍यक्ष शेतक-यांचे जीवनमान अनुभवाची संधी आहे. अनेक शेतकरी हे आधुनिक शेती करून चांगले उत्‍पादन घेणारे असुन त्‍यांची शेती करण्‍याचे कसब तसेच ग्रामीण भागातील शेतक-यांच्‍या समस्‍या जवळुन अनुभवयास मिळणार आहे. या कार्यक्रमाचा शेतकरांना देखित फायदा असुन यावर्षी कृषिदुत व कृषिकन्‍यांनी पिक संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यावर भर दयावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. राजेश कदम ह्यांनी रावेबाबत सविस्‍तर माहिती दिली तसेच गेल्‍या चार वर्षात रावे अंतर्गत ६२४ कृषिदुतांनी व कृषिकन्‍यांनी ८० विविध गावांमध्‍ये कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार केले असुन त्‍याचा निश्चितच शेतक-यांना त्‍याचा फायदा झाला असे त्‍यांनी नमुद केले. विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा सह समन्‍वयक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यार्थ्‍यांना ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम राबविण्‍याबाबतचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. राजेश कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत. देशमुख यांनी केले.   तांत्रीक सत्रामध्‍ये विविध विषयतज्ञ डॉ. के. पी. आपेट, डॉ. हानवते डॉ. एस. जी. नरवाडे, प्रा. सौ. पवार, डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. एस. एच. कांबळे, प्रा. मोहमद ईलीयास, डॉ. एल. एन. जावळे, प्रा. ए. एम. कांबळे व डॉ. पी. आर. देशमुख यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विस्‍तार शिक्षण विभागातील डॉ. जे. व्‍ही. एकाळे, श्री सी. एस. नखाते, श्री विठ्ठल खताळ, श्री जी. के. जोशी आदींनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी डॉ. ए.एस. कारले व कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. डब्‍ल्‍यु. देशमुख, डॉ. दयानंद मोरे, डॉ. ए.टी. शिंदे, प्रा. पवार, डॉ. प्रा. बडगुजर, डॉ. नागरगोजे, प्रा. कल्‍याणकर, डॉ. भोसले, प्रा. मंत्री डॉ. एकाळे आदी  उपस्थित होते. यावेळी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतक-यांचे जीवनमान व त्‍यांचे कृषि क्षेत्रातील अनुभव याचा जवळून अभ्‍यास करण्‍यासाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा पदवी अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट करण्‍यात आलेला असुन  यावर्षी या कार्यक्रमात परभणी कृषि महाविद्यालयांच्‍या सातव्‍या सत्रातील २०० विद्यार्थीचा समावेश असून ते परभणी तालुक्‍यातील निवडलेल्‍या  २० गावामध्‍ये पुढील २० आठवडे जाउन त्‍यांनी पदवी अभ्‍यासक्रमात आत्‍मसात केलेले कृषीचे ज्ञान व कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले नवीन तंत्रज्ञानाबाबत पाल्‍य शेतक-यांसोबत विचारांची देवाणघेवाण करणार आहेत.