Friday, July 18, 2014

कृषिकन्यांचे बाभुळगांव येथे सोयाबीन बीज उगवणक्षमता प्रात्यक्षिक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयित कोरडवाहू संशोधन शेती प्रकल्‍पांतर्गत असलेल्‍या कृषिकन्‍यांनी बाभुळगांव येथे दिनांक १६ जुलै २०१४ रोजी सोयाबीन बीज उगवणक्षमता प्रात्‍यक्षिक करुन दाखविले तसेच रासायनिक तणनाशकांचा वापर याचे महत्‍व याबाबत माहिती सांगीतली.

     हा कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी बी भोसले, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. एस. बी. चौलवार व कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिता पवार यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला. कार्यक्रमास गावातील सरपंच कुंतीताई पारधे, ज्ञानोबा पारधे आदीसह अनेक शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या शादरा घोलप, राजश्री धोंडे, संजीवनी बारंगुळे, पुनम जाधव, रुपाली इंगळे, स्‍वाती चव्‍हाण, सारिका गुट्टे, गौरी दिक्षीत, योगीता देसी, सोनी बुलरकर, मिनाली देशमुख, सुजाता देशमुख, चेतना फेसाटे, शिवकन्‍या भरोसे, मनिषा दहे, मनिषा गव्‍हाणे, मीरा घुले, प्रीतु, लिनु, श्रेया, शिशिरा, प्रकृ‍ती, श्रृती, आकांक्षा, किर्ती, श्‍वेता, शामना, उत्‍तरा, माधुरी भोसले आदिंनी परिश्रम घेतले.