Thursday, October 23, 2014

करडईच्‍या परभणी कुसुम वाणासह हरभरा व गहाच्‍या विविध वाणाचे बियाणे उपलब्‍ध

परभणी : रब्‍बी हंगामातील गळीत धान्‍याचे पीक म्‍हणुन करडईला महत्‍व असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने करडईचे परभणी-१२ (परभणी कुसुम) हे वाण प्रसारित केला असुन या वाणाचे महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, छतीसगड, गुजरात या राज्‍यांतील शेतक-यांच्‍या पसंतीस उतरला आहे. हा वाण मर व पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक असुन मावा किडीस कमी बळी पडतो. गतवर्षी कृषि विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर या वाणाच्‍या बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला असुन याही वर्षी राबविण्‍यात येत आहे. सद्य:स्थितीत या वाणाचे बियाणे विद्यापीठाकडे मोठया प्रमाणावर उपलब्‍ध आहे. रब्‍बी हंगामातील लागवडीसाठी हे वाण अत्‍यंत उपयुक्‍त असुन पुरेसा ओलावा असलेल्‍या जमिनीत पेरणीकरिता शेतक-यांनी या वाणाचे बियाणे वापरावे, असे आवाहन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले आहे. परभणी-१२ या करडईच्‍या वाणाची सत्‍यतादर्शक बियाणाच्‍या पाच किलो वजनाच्‍या पिशवीची किंमत ३७५ रूपये आहे. तसेच हरभरा पीकाचे आकाश व विजय या वाणाचे व गहु पिकात त्र्यंबक व लोक-१ वाणाचे बियाणे विद्यापीठाकडे विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. बियाणे खरेदीसाठी बीजोत्‍पादन अधिकारी डॉ एस बी घुगे यांच्‍याशी संपर्क करावा. संपर्कसाठी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२०८९९.