Thursday, December 4, 2014

शेतकरी बांधवाना कृषि विद्यापीठाचे आवाहन

मराठवाडयातील आठही जिल्‍हयात खरीप हंगामात अपु-या पावसामुळे खरीपातील पिकांचे अपेक्षित उत्‍पादन मिळालेले नाही, तसेच रब्‍बी हंगामातील पेरणीच्‍या क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे. अपेक्षीत उत्‍पादन न आल्‍यामुळे बरेचसे शेतकरी खचुन जाऊन आत्‍महत्‍येकडे वळत आहेत. अशा अडचणीच्‍या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी खचुन न जाता सध्‍या उभी असलेली रब्‍बी पिके व चारा पिकांचे व्‍यवस्‍थापन योग्‍य पध्दतीने करावे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विविध संशोधन केंद्राव्‍दारे विकसीत केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान उपलब्‍ध असुन त्‍याचा गरजेनुसार वापर करावा, पशुधनाची निगा व देखभाल करावी तसेच शेतकरी बांधवांनी अशावेळी कोणत्‍याही प्रकारे वेगळा विचार न करता विद्यापीठाशी तांत्रिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या दूरध्‍वनी ०२४५२-२२२९००० या क्रमांकावर संपर्क करावा, महाराष्‍ट्र शासन व कृषि विद्यापीठ सदैव आपल्‍या पाठीशी आहे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी केले आहे.