Friday, December 5, 2014

केंद्रीयमंत्री मा श्री नितिन गडकरी यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या दालनास भेट

नागपुर येथे अॅग्रोव्हिजन २०१४ कृषि प्रदर्शनाचे आयोजन दि ४ ते ७ डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन यात देशातील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे विविध संशोधन संस्‍था, कृषि विद्यापीठे, महाराष्‍ट्र शासन तसेच विविध कृषि संबंधी कंपन्‍याचे २०० पेक्षा जास्‍त दालनाचा समावेश आहे. या कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मुख्‍यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले, अध्‍यक्षस्‍थानी केंद्रीय भुतल परिवहन व ग्रामीण विकास मंत्री मा श्री नितीन गडकरी, प्रमुख पाहुणे म्‍हणुन राज्‍याचे अर्थमंत्री मा. श्री सुधीर मुनगुंटीवार, कृषि शास्‍त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्‍यक्ष मा डॉ सी डी मायी आदी मान्‍यवर उपस्थित होते. या प्रदर्शनीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दालनाचा समावेश कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आला असुन या दालनास शेतक-यांचा मोठया प्रतिसाद लाभत आहे. या दालनास दि ४ डिसेंबर रोजी केंद्रीयमंत्री मा श्री नितिन गडकरी यांनी भेट देऊन विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे एमएयुएस-१६२ वाणासह वि‍विध तंत्रज्ञानाची माहिती घेतली, यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ आनंद गोरे व वैजनाथ सातपुते यांनी माहिती दिली.