Thursday, January 29, 2015

बियाणाबाबत शेतक-यांची फसवणुक होऊ नये यासाठी विद्यापीठ व बीजप्रमाणीकरण यंत्रणेने समन्‍वयाने कार्य करावे ....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

रब्‍बी पिके बिजोत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

कार्यक्रमात अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ व्‍ही डी सोळुंके, श्री सुदाम घुगे आदी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकर बियाणे उत्‍पादन विभागाच्‍या वतीने अखिल भारतीय अनुसंधान परिषदेच्‍या प्रकल्‍पांर्गत रब्‍बी पिके बिजोत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि २८ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू होते तर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विभागीय बीजप्रमाणिकरण अधिकारी सुदाम घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात परभणी व जालना येथील विभागीय बीज प्रमाणिकरण यंत्रणा व महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळाच्‍या ६४ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
   अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, शेतक-यांची  बियाणाबाबत फसवणुक होऊ नये आणि वेळेवर बियाण्‍याची उपलब्‍धता व्‍हावी यासाठी विद्यापीठ व बीजप्रमाणीकरण यंत्रणेने समन्‍वयाने कार्य करावे. मराठवाडयात ग्राम बीजोत्‍पादन कार्यक्रमास मोठा वाव असुन त्‍यासाठीही प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
  सशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विद्यापीठ प्रक्षेत्रावर करडई, सोयाबीन, तुर आदी पीकांचे बिजोत्‍पादनाकरिता मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर करण्‍यात आले असुन सार्वजनिक - खाजगी भागदारी तत्‍वाच्‍या आधारे बिजोत्‍पादन करण्‍यास मोठा वाव आहे.
   या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ. एस. बी. सरोदे यांनी हरभरा बिजोत्‍पादन, डॉ. एस. बी. घुगे यांनी करडई बिजोत्‍पादन तर गहू बिजोत्‍पादन यावर डॉ. व्हि. डी. साळुंके व रब्‍बी ज्‍वार बिजोत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रा. अंबीका मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थीनी ज्‍वार संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र, करडई संशोधन केंद्र व सोयाबीन संशोधन केंद्र येथील प्रक्षेत्रावरील विविध पिकांच्‍या वाणाच्‍या बिजोत्‍पादन पा‍हाणी केली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सहयेागी संचालक (बियाणे) डॉ. व्‍ही. डी. सोळूंके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्हि. एम. घोळवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा. आर एम कोकाटे, श्री एम बी भोसले, श्री व्‍ही जे बोंडे, श्री अनिल मुंढे, मो. सलीम, डॉ. रोहीत सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
प्र‍शिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी 
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात “मुलभुत कर्तव्य व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर जनजागृती शिबीर संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजना व परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने “मुलभुत कर्तव्‍य व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर जनजागृती शिबीराचे आयोजन दि २८ जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर व्यासपीठावर सहदिवाणी न्यायधीश पी. एस. भंडारी, डॉ. एस. डी. रामढवे, अॅड. जीवन पेडगावकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, व्यक्तीकडे इच्छाशक्ती असेल तर व्यसनावर मात करू शकतो. प्रत्येक व्यक्ती संविधानातील मुलभूत अधिकाराचाच विचार करतो, मात्र मुलभूत कर्तव्याचा त्‍यास विसर पाडतो. प्रत्येक व्‍यक्‍तीने नैतिक कर्तव्ये पार पडल्यास स्वतः सोबतच आपले कुटुंब, महाविद्यालय व समाज यांच्या प्रगतीस चालना मिळेल, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.      
सहदिवाणी न्यायधीश पी. एस. भंडारी आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, समाजात कायदेविषयक जनजागृतीसाठी सर्व महाविद्यालयांनी राष्‍ट्रीय सेवा योजनेतंर्गत असे उपक्रम घेण्‍याची आवश्‍यकता असुन विद्यार्थ्‍याच्‍या महाविद्यालयीन वयात आपल्या मुलभूत कर्तव्याची जाणीव होईल.
आरोग्‍यतज्ञ डॉ. एस. डी. रामढवे म्‍हणाले की, व्‍यसनी व्‍यक्‍तींना व्‍यसनमुक्‍तीसाठी अनेक उपचार पध्‍दती उपलब्‍ध असुन याबाबत योग्‍य समुपदेश्‍न होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्‍यायाम व योग्य आहारावर लक्ष दिल्यास सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी केले.
या प्रसंगी व्‍यसनमुक्‍तीवर आधारित प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते. डॉ एस डी रामढवे यांनी दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून तंबाखूचे व्यसनाचे दुष्‍परिणामबाबत माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी भविष्‍यात कुठलेही वाईट व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद फुलारी याने केले तर आभार प्रदर्शन कार्याक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. सुमंत जाधव, प्रा. स्मिता खोडके, प्रा. मधुकर मोरे, प्रा. विवेकानंद भोसले, श्री. संजय पवार, प्रा. संदीप पायाळ, श्री. लक्ष्‍मीकांत राऊतमारे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कल्पना भोसले, वृषाली खाकाळ, जान्हवी जोशी, हर्षदा जाधव, नवनाथ घोडके, सागर झावरे, प्रवीण तौर, सुनील शिंदे, निर्मल सिंघाडीया, पंकज भोसले आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 

Wednesday, January 28, 2015

सामाजिक दायीत्व म्हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ‍ता मोहिम हाती घ्यावी....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेची सांगता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली. दि २८ जानेवारी रोजी वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहाच्‍या परिसरात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येऊन मोहीमेची सांगता करण्‍यात आली. आजच्‍या स्‍वच्‍छता कार्यक्रमाची सुरूवात कुलगुरू डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. याप्रसंगी मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, स्‍वच्‍छ भारत अभियांनातंर्गत गेल्‍या एक आठवडयापासुन विद्यापीठ परिसर स्‍वच्‍छतेत विद्यार्थ्‍यांनी मोठे योगदान दिले असुन सामाजिक दायीत्‍व म्‍हणुन महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी शहरातील मुख्‍य सार्वजनिक ठिकाणे जसे की रेल्‍वे स्‍टेशन, बसस्‍थानक, भाजीमार्केट आदी परिसर स्‍वच्‍छतेची मोहिम हाती घ्‍यावी.
   स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या सांगता कार्यक्रमाच्‍या अ‍ध्‍यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ बी आर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, जगात विविध क्षेत्रात देशाचे मोठे नाव आहे परंतु परिसर स्‍वच्‍छतेत आपण पिछाडीवर आहोत. देशात परिसर स्‍वच्‍छतेबाबत मोठा वाव असुन भविष्‍यात आपल्‍या परिसरात घाणच होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. छोटया छोटया गोष्‍टीतुनच आपण मोठे कार्य घडत असते. स्‍वच्‍छ शरीर, स्‍वच्‍छ परिसर तरच मनही स्‍वच्‍छ राहील, स्‍वच्‍छता ही विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हावा, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
   विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव म्‍हणाले की, स्‍वच्‍छतेची सुरूवात स्‍वत: पासुन करून ही मोहिम तळगाळापर्यंत पोहजली पाहिजे. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, गेल्‍या आठवडयापासुन विद्यापीठाचा परिसरात स्‍वच्‍छतेची मोहिम राबविली असुन सर्व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनीसह प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचा-यांनी यात मनापासुन योगदान दिले­. सर्वांनी या पुढेही महिन्‍यातुन एक दिवस श्रमदानासाठी देण्‍याचा संकल्‍प करावा.
  स्‍वच्‍छतेच्‍या मोहिमेमुळे विद्यापीठातील परिसराच्‍या प्रसन्‍नतेत वाढ झाली असुन याचा अनुकुल परिणाम आम्‍हास अभ्‍यासासाठी होईल, असे मत पदव्‍युत्‍तर विद्यार्थी सय्यद शेख यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, डॉ राकेश आहिरे, सहाय्यक वसतीगृह अधिक्षक डॉ जी के लोंढे, डॉ व्‍ही एस खंदारे, डॉ के डि नवगिरे, डॉ विशाल अवसरमल, राष्‍ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ आशिष बागडे व रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिल कांबळे यांच्‍यासह पदव्‍युत्‍तर विदयार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

स्‍वच्‍छ भारत अभियांनातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेचे सांगता कार्यक्रमात अध्‍यक्षीय भाषण करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ बाबासाहेब ठोंबरे आदी.

Monday, January 26, 2015

कृषि विद्यापीठाकडुन शेतक-यांच्या व समाजाच्या असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा करूया संकल्प...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यं‍कटेश्वरलु यांचे प्रतिपादन

वनामकृवित ६६ व्‍या प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा



परभणी:मराठवाडयातील शेतकरी गेल्‍या तीन वर्षापासुन अवेळी पाऊस, दुष्‍काळ, गारपिटी अश्‍या अनेक नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करीत असुन या आपत्‍तीतील शेती समस्‍यांना तोंड देण्‍यासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ कृषी तंत्रज्ञानाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करित आहे. परंतु कृषि विद्यापीठाकडुन शेतक-यांच्‍या व समाजाच्‍या अनेक अपेक्षा असुन त्‍या सर्वाच्‍या सहकार्याने येणा-या काळात पुर्ण करण्‍याचा संकल्‍प करूया, असे प्रतिपादन ६६ व्‍या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा देतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी आपल्‍या भाषणात केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, गेल्‍या वर्षी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उन्‍हाळयात फळबागा व मोसंबीबागा वाचविण्‍यासाठी विशेष अभियान घेतले. यावर्षी दुष्‍काळ परिस्थितीत शेतक-यांना उभारी देण्‍यासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयाव्‍दारे उमेद उपक्रम राबविण्‍यात येत असुन आजपावतो साधारणत: ६० गावांत उपक्रम घेण्‍यात आला, त्‍यास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद असुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ दुष्‍काळ परिस्थितीत उपयुक्‍त विविध शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करीत आहेत. याची दखल राज्‍याचे माननीय राज्‍यपाल यांनी त्‍यांच्‍या उस्‍मानबाद जिल्‍हयाच्‍या दौरात घेऊन विद्यापीठाच्‍या या उपक्रमाबाबत समाधान व्‍यक्‍त केले. मराठवाडयातील शेतीला बदलत्‍या हवामानाचा मोठा फटका बसत असुन याचा अभ्‍यास करून उपाययोजना आखण्‍यासाठी व दुष्‍काळावर मात करण्‍यासाठी विद्यापीठाने नुकताच बदनापुर येथे कृषी हवामान संशोधन केंद्राचा प्रस्‍ताव शासनास सादर केला आहे, असे त्‍यांनी सांगितले.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, यावर्षी कमी पर्जन्‍यमान असुनही खरिप हंगामात विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर अनेक अडचणी असतांना साधारणत: ५०० एकर वर सोयाबीन व तुर या पीकांची लागवड करण्‍यात आली. यापासुन २००० क्विंटल बियाण्याचे अपेक्षित उत्‍पादन होणार असुन यामुळे विद्यापीठाच्‍या बियाणाबाबत शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी काही प्रमाणात पुर्ण होऊ शकेल. गेली काही वर्षापासुन विद्यापीठातील कर्मचारी व प्राध्‍यपाकांची भरती प्रक्रिया रखडली गेली असुन येणा-या सहा-सात महि‍न्‍यात नवीन भरती प्रक्रियास गती देण्‍यात येऊन मर्यादीत मनुष्‍यबळाचा प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल. विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांचे काही मुलभुत सुविधांचे प्रश्‍न गेल्‍या वर्षी निधी अभावी पुर्ण करता आल्‍या नाहीत, याबाबत यावर्षी लक्ष देण्‍यात येईल. विद्यापीठातील सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचे पेन्‍शंनचे अनेक प्रश्‍न निधी अभावी प्रलंबित होते, परंतु गेल्‍या हिवाळी अधिवेशात राज्‍य शासनाने निधी मंजुर केल्‍यामुळे येत्‍या मार्चपर्यंत पेन्‍शनबाबतचे प्रश्‍न मार्गी लावण्‍यात येतील. केंद्र शासनाच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानात मागील आठवडयापासुन विद्यापीठातील विद्यार्थ्‍यानी मोठा सहभाग नोंदविला असुन हे अभियान विद्यापीठ परिसरापुरतेच मर्यादीत न राहता, शहरातील मुख्‍य ठिकाणे जसे रेल्‍वे स्‍टेशन व बस स्‍थानक परिसर स्‍वच्‍छतेसाठी उपक्रम विद्यार्थ्‍यानी हाती घ्‍यावा, अशी अपेक्षा यावेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केली. 

 या प्रसंगी राष्‍ट्रीय ध्‍वजाला मानवंदना देण्‍यात येऊन राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या स्‍वयंसेवकांनी संचलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उदय वाईकर यांनी केले. यावेळी विविध महावि़द्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी साजरा केला मशरूमींग फिएस्‍टा (अळंबी महोत्‍सव)

अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आळंबी (मशरूम) उत्‍पादन केंद्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा उपक्रम

परभणी, २६: प्रजासत्‍ताक दिनाचे औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमातंर्गत आळंबी (मशरूम) उत्‍पादन केंद्राच्‍या विद्यार्थ्‍यांनी ‍दिनांक २६ जानेवारी रोजी मशरूमींग फिएस्‍टा” (आंळबी महोत्‍सव) चे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ के टि आपेट यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षयीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, आळंबीमध्‍ये प्रथिनांचे प्रमाण जास्‍त असुन रोजच्‍या जेवणात प्रत्‍येक भाज्‍यांमध्‍ये याचा वापर केल्‍यास अन्‍नाची पोषकता वाढेल. विशेषत: मधुमेहाच्‍या रूग्‍णासाठी हा एक कमी उष्‍मांक असलेला चांगला पदार्थ असुन याबाबत समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे. महिला बचत गटांना आळंबीच्‍या उत्‍पादनात मोठी संधी असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले. 
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, अन्‍नसुरक्षेचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍यात आळंबीचा वापर करता येईल. आळंबी उत्‍पादनासाठी मराठवाडयात मोठा वाव असुन आळंबीचा वापर रोजच्‍या जेवणात वाढला पाहिजे. पदवी अभ्‍यासक्रमातील अनुभवाधारीत शिक्षणाचा विद्यार्थ्‍यांना जीवनात निश्चितच फायदा होईल, असे मत कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी कृषि महाविद्यालयात राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवींन्‍द्रकुमार राय यांनी केले तर आभार प्रदर्शन सारीका गुटटे हिने केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ के टि आपेट यांच्‍या मार्गदर्शनासाठी आंळबी उत्‍पादन केंद्राचे विद्यार्थीनी परिश्रम घेतले.
या मशरूमींग फेस्‍टात आळंबी उत्‍पादन केंद्रातील विद्यार्थ्‍यी निखील कुमार, मनिषा दहे, स्‍वेता जगताप, सुरेश कुलदिपके, गोविंद डोके, भागवत गवळी, धनंजय चतरकर व संतोष गडगिळे यांनी तयार केलेल्‍या आंळबीचे महत्‍व अधोरेखित करणारे भिंतीपत्रिकेचे वि‍मोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. प्रकृती मेशराम, आकांशा किर्ती, देशी योगिता, शिशीरा आरयन, माधुरी भोसले, मनिषा गव्‍हाणे, शैलेजा जोंधळे, केतकी नवगिरे, प्रिया शेळके, कांचन सोडगिर व दिपाली लंगोटे यांनी आंळबी आधारित रांगोळी रेखाटली होती. गोविंद डोंगरे, खलील शेख, हर्षल वाघमारे, अमोल वैद्य, बबन गायके, विजय लामदाडे, अश्विनी गोटमवाड, प्रदिप हजारे, कोमल शिंदे, प्रीती थोरात, सुशील बावळे, अशोक डंबाळे आदी विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या आंळबीपासुन पौष्टिक असा मशरूम पुलाव व मशरूम भजी याचा स्‍वादही मान्‍यवरांनी घेतला.

मशरूम पुलाव व भजी
मशरूम आधारित भितीपत्रक 
मशरूम आधारित रांगोळी

Saturday, January 24, 2015

ई-निविदामुळे विद्यापीठाच्‍या आर्थिक कामकाजात अधिक पारदर्शकता येईल

वनामकृवित ई-निविदाबाबत प्रशिक्षण कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचे प्रतिपादन

परभणी, ता. २३: ई-निविदेव्‍दारे निविदा मागविल्‍यामुळे विद्यापीठातील आर्थिक कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन शासनाव्‍दारे प्राप्‍त निधीचा योग्‍य प्रकारे विनियोग होण्‍यास मदत होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या नियंत्रक कार्यालयाच्‍या वतीने दि २३ जानेवारी रोजी ई-निविदेबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. डि. एल. जाधव, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे, उपकुलसचिव श्री आर. व्‍ही. जुक्‍टे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहिम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले, की विद्यापीठात ई-निविदेची प्रक्रिया विद्यापीठ अभियंता कार्यालयाने यशस्‍वीपणे राबविण्‍यात आलेली असुन ई-निविदेव्‍दारे रु. ३ लक्ष पेक्षा जास्‍त रक्‍कमेंच्‍या सर्व निविदा मागविल्‍यामुळे विद्यापीठातील आर्थिक प्रशासनात अधिक सु-सुत्रतता येईल.
कार्यक्रमाच्‍या प्रस्‍ताविकात विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे यांनी ई-निविदेचे महत्‍व सांगीतले. प्रशिक्षण कार्यक्रमात ई-निविदा सुलभतेने राबविण्‍याकरीता सिफी नेक्‍स इंडिया प्रा. लि. या संस्‍थेचे तांत्रीक सल्‍लागार श्री परितोष मान्‍जुरे यांनी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षणात नवीन निविदा तयार करणे, प्रसिध्‍दी देणे, उघडणे व बंद करणे या बाबतची सविस्‍तर माहिती देण्‍यात आली तसेच ई-निविदा ही https:/maharashtra.etenders.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आल्‍याचे सांगितले. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक नियंत्रक श्री जी. बी. ऊबाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सुधीर खंदाडे, गजानन रापते, किशोर शिंदे, तुकाराम शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठातील विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Thursday, January 22, 2015

वनामकृविच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानात महाविद्यालयाच्‍या युवतीही सरसावल्‍या

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत स्‍वच्‍छ भारत अभियानाचा भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येत असुन आज दि २२ जानेवारी रोजी जिजामाता, उत्‍तरा, वर्षा व दिवाकर रावते मुलींच्‍या वसतीगृहाच्‍या परिसराची स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या मोहिमेची सुरूवात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. आज या मोहिमेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेले कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या म‍हाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या साधारणता ३०० विद्यार्थींनी सहभाग नोंदविला. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ हेमांगिनी सरंबेकर, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ विजया नलावडे, डॉ जयश्री एकाळे, डॉ विजया पवार, प्रा मेधा उकळकर, डॉ अनिल कांबळे, प्रा वैशाली भगत, प्रा. विजय जाधव, डॉ विणा भालेराव आदीं उपस्थित होते. 


महाविद्यालयीन विद्यार्थांनी रस्ता सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे – प्राचार्य डॉ. उदय खोडके

छायाचित्रात प्राचार्य डॉ. उदय खोडके, निरीक्षक तानाजी धुमाळ, विनोद चौधरी, प्रा. मिलिंद साळवी, प्रा. विवेकानंद भोसले, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे व विद्यार्थी दिसत आहेत.  
***************************
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व उपप्रादेशिक परिवहन विभाग परभणी यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि २१ जानेवारी रोजी २६ व्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके तर उपप्रादेशीक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ, विनोद चौधरी, प्रा. मिलिंद साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले, की विद्यार्थ्‍यांनी वाहने चालवितांना वेग मर्यादा पाळावी व रस्ता सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे तर मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले कि, आज तरुणांकडून वेगाचे भान न राखता दुचाकीचा वापर होत असुन त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडतात व परिणामी शरीराचे अवयव निकामी होण्याबरोबरच जीव दगावण्याची सुद्धा शक्यता असते. 
विनोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वाहन चालकांच्‍या नियमावलीची माहिती देऊन अपघात झाल्याचे पाहिल्यास शासकीय रुग्णवाहिकासाठी तातडीने १०८ या क्रमांकावर संपर्क करावा असे सुचविले. प्रा. मिलिंद साळवी यांनी दुचाकीवर जात असताना हेल्मेट व चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीट बेल्टाचा वापर करण्‍याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद फुलारी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, श्री. संजय पवार, प्रा. पंडित मुंढे, प्रा.गोपाल शिंदे, प्रा. मधुकर मोरे, प्रा. प्रमोदिनी मोरे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण तौर, नवनाथ घोडके, सागर झावरे, कल्पना भोसले, वृषाली खाकाळ, मयुरी काळे, अर्चना कार्णले, मायावती मोरे, स्नेहल कदम, वैशाली संगेकर आदींनी परिश्रम घेतले.

स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत ग्रीष्‍म वसतीगृहाच्‍या परिसराची स्‍वच्‍छता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत स्‍वच्‍छ भारत अभियानाचा” भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येत असुन आज दि २१ जानेवारी रोजी ग्रीष्‍म वसतीगृहाच्‍या परिसराची स्‍वच्‍छता करण्‍यात आली. या मोहिमेची सुरूवात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ राकेश आहिरे, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ अनिल कांबळे, प्रा. विजय जाधव आदीं उपस्थित होते.

Tuesday, January 20, 2015

स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहिजे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेस प्रारंभ
परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येणार असुन याची सुरूवात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते नागनाथ वसतीगृहात करण्‍यात आली, त्‍यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डी एल जाधव, प्राचार्य डॉ डी एन गोखले, प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोबंरे आदींसह सहभागी विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी.
*************************************
महात्‍मा गांधींचे स्‍वच्‍छ भारताचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍यासाठी महात्‍मा गांधीच्‍या जंयतीस संपुर्ण देशात स्‍वच्छ भारत अभियानास सुरूवात झाली, प्रत्‍येक भारतीयांनी यात सहभाग नोंदवीला पाहीजे, विशेषता युवकांनी यात पुढाकार घ्‍यावा. स्‍वच्‍छता ही अभियानापुरतेच मर्यादित न राहता, स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
     परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येणार असुन याची सुरूवात आज दि २० जानेवारी रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते नागनाथ वसतीगृहात करण्‍यात आली, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डी एल जाधव, कृषि म‍‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोबंरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की आपण ज्‍या ठिकाणी राहतो तो परिसर स्‍वच्छ राहण्‍यासाठी कचराच होऊ नये यासाठी आपण कटीबध्‍द राहीले पाहिजे, स्‍वच्‍छता ही अविरतपणे चालणारी मोहिम ठर‍ली पाहिजे.
    यावेळी राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिल कांबळे व राष्‍ट्रीय छात्रसेनेचे अधिकारी प्रा अशिष बागडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवकासह नागनाथ वसतिगृहतील विद्यार्थ्‍यानी परिसर स्‍वच्‍छ केला. या मोहिमे कृषि महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ व्हि डि पाटील, डॉ बी एम ठोंबरे आदीसह विद्यार्थी 

Monday, January 19, 2015

युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती‍ – प्राचार्य डॉ. उदय खोडके

मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ उदय खोडके
   युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती असून देशाच्या विकासात युवकांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 12 जानेवारी रोजी आयोजीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. प्रखर राष्ट्रवाद व सर्वधर्मसमभाव ही विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्‍ट्य असुन स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांसाठी मार्गदर्शक आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रमाशिवाय पर्याया नाही, युवकांनी स्‍वामी विवेकानंदाच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वापासुन प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करावे, असा सल्‍ला यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष्य प्रा. विवेकानंद भोसले, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, प्रा. हरीश आवारी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसन्ना पवार व आभार प्रदर्शन प्रदीप तौर यांनी केले. यावेळी विद्यार्थी अक्षय ढाकणे, उमेश राजपूत, गोविंद फुलारी, रामेश्वर गिराम आदींनी आपले विचार मांडले तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर सहाव्या सत्राच्या विद्यार्थिनिनी स्वागत गीत गायिले. कार्यक्रमास प्रा. पंडीत मुंडे, प्रा. दयानंद टेकाळे, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. संजय पवार, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री. शिवणकर, श्री.फाजगे, श्री. उबाळे, श्री. मनोहर आदींसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
भाषण करतांना विद्यार्थी  अक्षय ढाकणे व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ उदय खोडके, जिमखाना  उपाध्‍यक्ष प्रा. विवेकांनद भोसले व डॉ स्‍मिता खोडके

Sunday, January 18, 2015

Wednesday, January 14, 2015

कोरडवाहु शेतीचे तंत्रज्ञान शेतक-याच्‍या परिस्थितीस अनुकूल असावे....कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

एक दिवसीय कार्यशाळेत शेतकरी व कृषि शास्‍त्रज्ञ यांच्‍यात थेट संवाद

संशोधनाच्‍या आधारे कृषि विद्यापीठ शेतक-यांसाठी विविध तंत्रज्ञानाची शिफारस करते, परंतु हे तंत्रज्ञान अवलंब करतांना शेतक-यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते, त्‍यासाठी कृषि शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍या प्रत्‍यक्ष चर्चा होणे गरजेचे आहे, म्‍हणजे कृषि शास्‍त्रज्ञांना शेतक-यांना अनुकूल तंत्रज्ञान देता येईल, असे प्रति‍पादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प व हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍था (क्रीडा) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानात सुधारणा करण्‍यासाठी एक दिवसीय सल्‍ला कार्यशाळेचे दि. १३ जानेवारी रोजी आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे (क्रीडा) प्रकल्‍प समन्‍वयक डॉ रविंद्र चारी, कुलसचिव डॉ डि एल जाधव, आत्‍माचे उपप्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ सुरेंद्र चौलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की मराठवाडयातील शेती ही कोरडवाहु असल्‍यामुळे कोरडवाहु शेतीचा विकास म्‍हणजेच मराठवाडयातील शेतक-यांचा विकास होय. याभागात कापुस व सोयाबीन ही मुख्‍य पिके असुन यावर्षीच्‍या खरिप हंगामात कृषि विभाग व विद्यापीठाने सोयाबीन लागवडीसाठी रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) पध्‍दतीचा मोठा प्रसार केला, यासाठी कृषि विभागाच्‍या वतीने बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप करण्‍यात आले होते. ज्‍या शेतक-यांनी सोयाबीनची लागवड बीबीएफ पध्‍दतीने केली, त्‍यांना कमी पर्जन्‍यमानातही निश्चितच ब-यापैकी उत्‍पादन मिळाले.

डॉ रविंद्र चारी यांनी कोरडवाहु संशोधनाबाबत माहिती देतांना सांगितले, की कोरडवाहु शेतीसाठी विद्यापीठाने व क्रीडा संस्‍थेने अनेक तंत्रज्ञान शिफारसी दिल्‍या आहेत, परंतु या शिफारसी शेतक-यापर्यंत परिपुर्ण पोहचल्‍या आहेत का? त्‍यांचा अवलंब करतांना शेतक-यांना काय समस्‍या येतात? त्‍याच्‍या प्रसार व विस्‍तारासाठी कीती वाव आहे? हयासाठी याप्रका-याच्‍या कार्यशाळा आयोजीत करणे गरजेचे आहे. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले, की कोरडवाहु शेतीत अनेक आव्‍हाने आहेत, कमी पर्जन्‍यमानात तग धरू शकतील असे तंत्रज्ञान विकसित करण्‍यासाठी वेळोवेळी शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक व शेतकरी यांचात संवाद होणे गरजेचे असुन अशा कार्यशाळेचे आयोजनावर विद्यापीठ भर देत आहे. कृषि विभागाने संपुर्ण राज्‍यात कोरडवाहु शेतक-यांसाठी साधारणत: सात हजार बीबीएफ लागवड यंत्राचे वाटप केल्‍याची माहिती आत्‍माचे उपप्रकल्‍प संचालक श्री अशोक काळे यांनी दिली.

कार्यशाळेत कोरडवाहु संशोधन केंद्राने विकसित केलेले तंत्रज्ञान जसे की, बीबीएफ लागवड पध्‍दत, जलसंधारण सरी, आंतरपिक पध्‍दती, विहीर पुर्नभरण, शेततळे व संरक्षित सिंचन आदींवर डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ मदन पेंडके व वरिष्‍ट शास्‍त्रज्ञ डॉ आनंद गोरे यांनी सादरीकरणाव्‍दारे सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. याप्रसंगी या तंत्रज्ञानाबाबत शेतक-यांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांना व समस्‍यांना कृषि शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. याचर्चेत अकोला येथील डॉ महेंद्र नागदिवे, सोलापुर येथील डॉ विजय अमृतसागर, डॉ एम जी उमाटे, डॉ डि ए चव्‍हाण व प्रगतशील शेतकरी श्री सोपनराव अवचार, श्री उदयराव खेडेकर, श्री गिरीष पारधे यांच्‍यासह विविध भागातील शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत शेतक-यांनी दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे वि़द्यापीठ शास्‍त्रज्ञ कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानात संशोधनाच्‍या आधारे सुधारणा करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पी एच गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ सुरेंद्र  चौलवार यांनी केले. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी डॉ जी के गायकवाड, श्रीमती सारिका नारळे, श्री माणिक समिद्रे, शेख सय्यद, सुनिल चोपडे आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, January 13, 2015

रासायनिक तणनाशकांचा वापर काळजीपुर्वक व्‍हावा..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु


प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ अशोक जाधव आदी. 
**********************************************************************
     शेतक-यांचा पिकातील तण व्‍यवस्थापनासाठी मोठा खर्च होते त्‍यावर पर्याय म्‍हणुन रासायनिक तणनाशकांचा वापर आज देशात व राज्‍यात वाढत आहे, परंतु त्‍याचा अमर्यादित वापर होऊ नये. ब-याच वेळा शेतकरी तणनाशकांचा वापर खत व बियाणे विक्रीत्‍यांचा सल्‍लाने करतात, परंतु खत व बियाणे विक्रीत्‍यांना त्‍याचे पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्‍यामुळे त्‍यांना देखिल याबाबत प्रशिक्षीत करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
     केंद्रीय कृषि मंत्रालयाच्‍या सौजन्‍याने व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी वि़द्यापीठाच्‍या संशोधन संचालनालय व कृषिविद्या विभाग यांच्‍या विद्यमाने ‘पीक उत्‍पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्‍य वापर या विषयावर राज्‍याच्‍या कृषी विभागातील कृ‍षी पदवीधारक कर्मचारीकृषि विद्यापीठातीलकृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांसाठी दि ६ ते १३ जानेवारी दरम्‍यान आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या प्रशिक्षणाच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कुलसचिव डॉ डी एल जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले व प्रा डॉ बी व्‍ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणालेकी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या संपर्कात असणारे कृषि विस्‍तारकांचे अनुभव हे विद्यापीठाच्‍या संशोधनासाठी उपयुक्‍त असुन यासाठी याप्रकारच्‍या प्रशिक्षणाची आवश्‍यकता आहे. कुलसचिव डॉ डी एल जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले, की आज बाजारात अनेक नवनवीन तणनाशके उपलब्‍ध होत असुन त्‍याच्‍या वापराबाबत शेतक-यांना अनेक अडचणी येतात, त्‍या सोडविण्‍याचे महत्‍वाचे कार्य कृषि विभागाच्‍या अधिकारी व कर्मचा-यांना करावे लागते, त्‍यांनाच  शेतक-यांचा सल्‍लागार म्‍हणुन भुमिका बजवावी लागते. यासाठी अशाप्रकाराच्‍या प्रशिक्षणातील ज्ञान उपयुक्‍त आहे.
     कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थी कृषि अधिकारी सय्यद रहिम यांनी प्रशिक्षणात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा उपयोग प्रत्‍यक्ष शेतक-यांना मार्गदर्शन करतांना निश्चित होईल असे मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण समन्‍वयक डॉ अशोक जाधव यांनी केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमास सहभागी प्रशिक्षणार्थी, विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, January 10, 2015

जनुकीयदृष्‍टया परिवर्तीत पीके शेतक-यांच्‍या फायदयाचीच.......कुलगुरू मा.डॉ.बी.व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवीत जनुकीयदृष्‍टया सुधारित पीकांसंबधी एक दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन 

कार्यशाळेचे उद्घाटनाप्रसंगी दिपप्रज्‍वलन करतांना मानोलीचे प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे, कुलगुरू मा बी व्‍यंकटेश्वरलु, डॉ ओ पी गोवीला, डॉ विभा आहुजा, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ अशोक ढवण, डॉ बी बी भोसले आदी

मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
विविध देशात जनुकीय परिवर्तीत पीके ही किड व रोग प्रतिकारक, तणनाशकाशी मुकाबला करणारी, शेतमाल टिकावुपणा व पोषणमुल्‍य वृध्‍दी अशा विविध गुणधर्मांनी संपन्‍न अशी विकसित करण्‍यात आली असुन यामुळे उत्‍पादनवाढ, पर्यावरणाचा समतोल व मशागतीच्‍या खर्चात कपात होऊन शेतक-यांना फायदयाचीच आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेड, नवी दिल्‍ली यांचे संयुक्‍त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी जनुकीयदृष्‍टया सुधारित पीकांसंबधीच्‍या विविध पैलुंवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर जनुक अभियांत्रिकी मान्‍यता समितीचे सदस्‍य डॉ ओ पी गोवीला, नवी दिल्‍ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्‍या मुख्‍य सरव्‍यवस्‍‍थापिका डॉ विभा आहुजा, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की राज्‍यातील शेतक-यांनी बी टी कापसाला मोठा प्रतिसाद दिला असुन स्‍वत: शेतकरी डोळसपणे तंत्रज्ञान अवलंब करित असुन आपआपल्‍या स्‍तरावर तंत्रज्ञानात बदल करीत आहेत. मराठवाडयातील जालना व औरंगाबाद जिल्‍हयात मोठया प्रमाण विविध पीकांचे बियाणे निर्मिती होऊन देशातील अनेक राज्‍यात त्‍याची विक्री होते. मराठवाडयातील कापुस व सोयाबीन ही मुख्‍य जिरायती पीके असुन अनिश्चित हवामानामुळे पीकांची उत्‍पादकता कमी झाली आहे. वनामकृविनेही महाबीजशी साम्‍यजंस्‍य करार केला असुन कपाशीच्‍या एएचएच-४४ (नांदेड-४४)  वाण हे लवकरच जनुकीयदृष्‍टया परिवर्तीत करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
जनुक अभियांत्रिकी मान्‍यता समितीचे सदस्‍य डॉ ओ पी गोवीला आपल्‍या भाषणात म्‍हणाले, तंत्रज्ञानाच्‍या जोरावर देशात हरितक्रांती होऊन अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपुर्ण झाला, परंतु गेली काही वर्षात अन्‍नधान्‍याचे उत्‍पादनात अपेक्षीत वाढ दिसुन येत नाही. यासाठी जैवतंत्रज्ञानाचा आधार आपणास घ्‍यावा लागेल. कपाशीत बोंडअळयाच्‍या नियंत्रणासाठी अमर्याद रासायनिक किटकनाशकाच्‍या फवारण्‍या करून अळींचे नियंत्रण होत नव्‍हते, परंतु बी टी वाणामुळे फवारण्‍या कमी होऊन शकल्‍या, कपाशीत रसशोषण करणा-या किडींना प्रतिकारक वाणासाठीचे संशोधन सुरू आहे. तसेच विविध पीकांत पाण्‍याचा कार्यक्षम वापर करणारे जनुकियदृष्‍टया सुधारत वाण येणार असुन यामुळे कमी पाण्‍यात चांगले उत्‍पादन आपणास मिळु शकेल.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले, की देशात जनुकीयदृष्‍टया सुधारित पिकांच्‍या चाचणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहीला आहे. जनुकीय परिवर्तीत पीकांबाबत शेतक-यांत व समाजात समज व गैरसमज निर्माण झाले असुन ते दुर करण्‍यासाठी व समाजात जागृती होण्‍यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सुत्रसंचालन मेघा उमरीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ जी के लोंढे यांनी केले.
सदरिल कार्यशाळेत नवी दिल्‍ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्‍या मुख्‍य सरव्‍यवस्‍‍थापीका डॉ विभा आहुजा यांनी भारतातील जनुकीय परिवर्तीत पिकांकरिता नियामक पध्‍दतीची माहिती दिली तर डॉ पजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ संतोष गहुकर यांनी जनुकीय परिवर्तीत पीकांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. राष्‍ट्रीय पोषण संस्‍थेचे शास्त्रज्ञ डॉ बी दिनेश कुमार यांनी जनुकीय परिवर्तीत पीके व मानवाच्‍या अन्‍नसुरक्षीततावर प्रकाश टाकला तर पुणे येथील राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्‍या मुख्‍य शास्‍त्रज्ञा डॉ विद्या गुप्‍ता यांनी जनुकीय परिवर्तीत पिकांच्‍या विकासातील विविध अवस्‍थेबाबत माहिती दिली. महिको कंपनीचे संशोधक डॉ नरेंद्र नायर यांनी महीको कंपनीचे जनुकीय परिवर्तीत पिकाच्‍या वाण निर्मितीतील भुमिका विषद केली. कार्यशाळेत विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी व महिला शेतकरी, कृषि विभागातील कर्मचारी, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना डॉ ओ पी गोवीला

प्रास्‍ताविक करतांना डॉ दत्‍तप्रसाद वासकर