Sunday, July 19, 2015

आपत्‍कालीन परिस्थितीत पिकांची घ्‍या काळजी

वनामकृविचा कृषि सल्‍ला
सध्‍या हवामानातील उष्‍णता व जमिनीत असणारा ओलाव्‍याचा अभाव यामुळे परभणी व हिंगोली जिल्‍हयातील सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषि तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. यु.एन. आळसे, सोयाबीन पैदासकर डॉ. एस. पी. म्‍हेत्रे आणि मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मौजे जोडपरळी, हटटा व ब्राम्‍हणगाव येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर दिनांक १५ जुलै रोजी भेट दिली व सोयाबीन पीकाची पाहणी केली. या संदर्भात असे आढळुन आले आहे कि, केवळ पेरणीपुरताच पाऊस झाल्‍यानंतर पुन्‍हा पावसात खंड पडला असुन जमिनीतील ओलावा सिमांतपातळी पेक्षा कमी झाला आहे, त्‍यामुळे पाणी व अन्‍नद्रव्‍यांचे सोयाबीन पीकाकडुन शोषण बंद झाले असुन पिके मलुल झाले व पिकाची वाढ खुंटली आहे. करिता सर्व सोयाबीन शेतक-यांनी पाऊस येईपर्यंत पिक टिकवण्‍यासाठी  १०:००:४५ (पोटॅशियम नायट्रेट ०.५ टक्‍के  ५० ग्रॅम १० लिटर पाणी व झिंक सल्‍फेट ०.५ टक्‍के) ४० ग्रॅम १० लिटर पाणी याच प्रमाणात एकत्रित फवारणी करावी. किंवा ग्रेड-२ चे सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व डॉ यु एन आळसे यांनी केले आहे.