Sunday, December 6, 2015

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय मृदा दिन साजरा

पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशनव्‍हीएनएमकेवी) मोबाईल अॅपचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील भारतीय मृद विज्ञान संस्‍था शाखा परभणी यांच्‍या वतीने आंतरराष्‍ट्रीय मृदा दिनानिमित्‍त दिनांक ५ डिसेंबर रोजी मृदा आरोग्‍य पत्रिका वितरण समारंभ आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन म्‍हणुन परभणी महानगर पालिकाच्‍या महापौर मा श्रीमती संगीता वडकर, कृषीभुषण मा श्री सुर्यकांत देशमुख, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृ‍षी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ विलास भाले, प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ विलास पाटील, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी नाम प्रतिष्‍ठान व मृदविज्ञान संस्‍थेच्‍या वतीने कार्यक्रमात ८७ शेतक-यांना त्‍यांच्‍या शेतातील मातीचे परिक्षण करून त्‍याच्‍या आरोग्‍य पत्रिकेचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमात विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ सय्यद इस्माईल आणि डॉ. हरिहर कौसडीकर यांनी विकसित केलेल्‍या पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशनव्‍हीएनएमकेवी) या मोबाईल अॅपचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशनव्‍हीएनएमकेवी) मोबाईल अॅपचे शेतक-यांनी वापर करण्‍याचे आवाहन करून शेतक-यांनी दरवर्षी मातीचे आरोग्‍य तपासण्‍याचा सल्‍ला दिला तर महापौर मा श्रीमती संगीता वडकर यांनी उत्‍पादनवाढीसाठी माती परिक्षण गरजेचे असल्‍याचे सांगितले. भावी पिढीच्‍या चांगल्‍या आरोग्‍यसाठी रासायनिक खतांचा समतोल वापर माती परिक्षणाच्‍या अहवालानुसार करण्‍याचा सल्‍ला कुषीभुषण मा श्री सुर्यकांतराव देशमुख यांनी दिली. शिक्षण संचालक डॉ विलास भाले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कोरडवाहु शेतीत पिक उत्‍पादकता टिकविण्‍याचे मोठे आव्‍हान असुन शेतक-यांनी सेंद्रीय खते, हिरवळीच्‍या खतांचा वापर करावा. आयोजक डॉ विलास पाटील यांनी आरोग्‍यदायी जीवनासाठी आरोग्‍यदायी मृदा असणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन केले तर प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी शेतक-यांनी पिक पध्‍दतीत व्दिदल पिकांचा समावेश करण्‍याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ महेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.