Wednesday, April 6, 2016

कृषि पदवीधरांनी शेतक-यांत उमेद जागृतीचे कार्य करावे......प्राचार्य डॉ डि एन गोखले

परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम वर्षाच्‍या विद्यार्थ्‍यांचा निरोप समारंभ संपन्‍न

मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ धर्मराज गोखले
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा निरोप समारंभाचे आयोजन तृतीय वर्षाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने दिनांक ६ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर जिमखाना उपाध्‍यक्ष तथा प्राचार्य डॉ विलास पाटील हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते, व्‍यासपीठावर विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ एस एल बडगुजर यांनी प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यीचे व्‍यक्‍तीमत्‍व घडत असते, विशेषत: आत्‍मविश्‍वास वाढीस लागतो. परभणी कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी राज्‍यात संशोधक, प्राध्‍यापक, प्रशासक, लोकप्रतिनिधी तसेच खाजगी क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहेत, कोणत्‍याही क्षेत्रात कार्य करतांना शेतक-यांत उमेद जागृतीसाठी कृषि पदवीधरांना कार्य करावे, असा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला. जिमखाना उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महाविद्यालयीन काळात अनेक बरे-वाईट प्रसंग येत असतात, या चार वर्षाच्‍या काळात आपल्‍यात चांगला बदल घडवुन आपला व्‍यक्‍तीमत्‍व विकास विद्यार्थ्‍यांनी करावा.
कार्यक्रमात तुकाराम मंत्रे, उर्मिला दरडा, मीरा आरगड, विशाल राठोड, शंकर अभंगे, प्रियंका खर्चे आदींनी आपले महाविद्यालयातील अनुभव सांगितले तर विद्यार्थ्‍यीनी कु अथिरा हिने कथ्‍‍थक नृत्‍य सादर केले. याप्रसंगी दुष्‍काळग्रस्‍त शेतक-यांसाठी मदतनिधीचे विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने संकलन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एस एल बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सुत्रसंचालन सुप्रिया जाधव, प्रीती वायकुळे, स्‍वप्‍नील भोसले, ज्ञानेश्‍वर शिंदे, केदार बारोळे, संभाजी सास्‍ते यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीवेसाठी तृतीय वर्षाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गद र्शन करतांना जिमखाना उपाध्यक्ष डॉ विलास पाटील