Sunday, July 3, 2016

वनामकृवितील कृषि महाविद्यालयात कृषी दिनानिमित्‍त वृक्षलागवड मोहिम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्रसेना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्‍यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्‍त दिनांक १ जुलै रोजी कृषि दिनाचे औचित्‍य साधुन महाविद्यालयाच्‍या परिसरामध्‍ये वृक्षरोपण करण्‍यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, वसतीगृह अधिक्षक डॉ बी एम ठोंबरे, डॉ आर डि अहिरे, डॉ पी आर झंवर, डॉ जी एम वाघमारे, डॉ डि एन धुतराज आदीसह महाविद्यालयाचे प्राध्‍यापक, कर्मचारी, रासेयोचे स्‍वयंसेवक व राछासेचे छात्रसैनिक, पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचे विद्यार्थ्‍यी विविध रोपांची लागवड केली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ जयकुमार देशमुख, डॉ पी एच गौरखेडे, छात्रसेना अधिकारी डॉ ए बी बागडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवक छात्रसैनिकांनी परिश्रम घेतले.