Monday, August 15, 2016

वनामकृवित स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री. दिलीप कच्‍छवे तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी कुलगुरूंना सलामी दिली. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सर्वांना स्‍वातंत्र्यदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.