Friday, August 5, 2016

माती तपासणीबाबतच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग राज्यशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात पाच दिवसांचे राज्यस्तरीय माती तपासणी या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक 5 जुलै रोजी संपन्न झाला. समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके तर विभाग प्रमुख तथा प्रशिक्षणाचे संचालक डॉ. व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ. सय्यद ईस्माईल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, माती परिक्षणाधारे खतांचा मात्रा दिल्‍यास शेतक-यांचे उत्‍पादन वाढण्‍याबरोबरच अनावश्‍यक खतांचा वापर कमी होतो, यासाठी मातीचा नमुना योग्यरित्‍या गोळा करणे व प्रयोगशाळेत नमुन्याचे पृथकरण करुन शेतकऱ्यांना खतांची शिफारस पत्रिका वितरीत करणे यामध्ये अशा प्रशिक्षणाचा उपयोग होतो. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील यांनी माती परिक्षाणाचा उपयोग जमिनीचे आरोग्य्‍ा विषयक समस्यांची उकल करण्याकरीता प्रशिक्षणांर्थींनी करावा, असे आवाहन केले. प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणाचा अनुभव मनोगताव्दारे व्यक्त केला. तर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षनार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुरेश वाईकर यांनी केले. सुत्रसंचलन डॉ पपिता गौरखेडे आभार प्रदर्शन डॉ महेे देशमुख यांनी केले. सदरिल प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सुरेश वाईकर यांनी प्रशिक्षण समन्वयक म्‍हणुन काम पाहीले. प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील आठही जिल्हातील आठरा तंत्र अधीकारी व तंत्रज्ञ, कृषि सहाय्यक यांनी सहभाग नोदंविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. सदाशिव अडकीणे, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, प्रा. अनिल मोरे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केलेे. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक व पदव्यत्तर विद्यार्थी यांची उपस्थीती होती.