Friday, October 21, 2016

अवर्षणावर एकात्मिक पदधतीने मात करता येईल.....कुलगुरू मा. डॉ. बी.व्यंकटेश्वरलु

कृषि क्षेत्रातील अवर्षण व्‍यवस्‍थापनावरील आर्दश प्रशिक्षण कार्यक्रमाचाा समारोप

भारतीय शेतीमध्‍ये अवर्षण ही एक अतिशय जुनी आणि वारंवार आढळुन येणारी समस्‍या असुन कोरडवाहु तंत्रज्ञानाच्‍या एकात्मिक पध्‍दतीने वापर करून मात करता येऊ शकते. कोरडवाहु शेतीमध्‍ये उपलब्‍ध तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यासाठी कृषी अधिका-यांनी प्रयत्‍न करावेत तसेच कालानुरूप आढळुन येणा-या शेतक-यांच्‍या समस्‍यांवर शास्‍त्रज्ञांनी उपाय शोधावेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प तर्फे दि. १३ ते २० ऑक्‍टोंबर दरम्‍यान आयोजीत कृषि क्षेत्रातील अवर्षण व्‍यवस्‍थापनावरील आर्दश प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोप प्रसंगी अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहायक महा‍संचालक डॉ. एस. भास्‍कर,  संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य शास्‍त्रज्ञ व प्रशिक्षण समन्‍वयक डॉ. बी. व्‍ही. आसेवार आदींची उपस्थित होते.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कोरडवाहु शेतीमध्‍ये प्रत्‍येक सुक्ष्‍मतम तंत्रज्ञानयोग्‍य पदधतीने वापरणे गरजेचे आहे. रूंद वरंबा सरी (बीबीएफ) सारखे तंत्रज्ञान अवर्षणाच्‍या तसेच अधिक पावसाच्‍या अशा दोन्‍ही परिस्थितीमध्‍ये उपयोगी ठरले आहे. उताराला आडवी मशागत व पेरणी, बंदीस्‍त वाफे, मुलस्‍थानी जलसंवर्धन, आंतरपीक पध्‍दती, भुजल पुर्नभरण आणि उपलब्‍ध पाण्‍याचा आधुनिक सिंचन पदधतीद्वारे कार्यक्षम वापर ही काळाची गरज आहे.
    मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, दुष्‍काळावर मात करण्‍यासाठी योग्‍य नियोजनाची गरज असुन त्‍यासाठी हीच योग्‍य वेळ आहे. अर्वषणाने कृषि विस्‍तारक आणि शास्‍त्रज्ञांना त्‍यांची पुढील आव्‍हाने दाखवुन सजग केले आहे. त्‍यामुळे शास्‍त्रज्ञांनी उपलब्‍ध तंत्रज्ञानाचा जास्‍तीत जास्‍त प्रसार करावा जेणेकरून शेतक-यांना त्‍याचा प्रत्‍यक्ष लाभ होईल. एकात्मिक शेती पदधती, पावसाच्‍या पाण्‍याचा कार्यक्षम वापर,कोरडवाहु फळबाग आणि दुरदूष्‍टी यातुन कोरडवाहु शेती शाश्‍वत करता येईल.
    प्रमुख पाहुणे डॉ. एस. भास्‍कर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, अवर्षण ग्रस्‍तभाग आणि अवर्षणाची तिव्रता लक्षात घेउन त्‍यावर मात करण्‍यासाठी दिर्घकालीन उपाय योजना हाती घेणे गरजेचे आहे. अवर्षण किंवा दुष्‍काळाच्‍या मुळाशी अनेक कारणे आहेत. या समस्‍येवर मात करण्‍यासाठी सर्वच क्षेत्रातील शास्‍त्रज्ञ व विस्‍तारक यांनी एकत्रित कामे करण्‍याची गरज आहे. प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन घेतलेल्‍या तंत्रज्ञानाचा आपअपल्‍या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणात प्रसार करावा, असे अवाहन त्‍यांनी केले.
    सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात राज्‍यातील व राज्‍याबाहेरील एकुण २२ प्रशिक्षणर्थ्‍यांना देशातील विविध शास्‍त्रज्ञ व प्रशिक्षक तज्ञांकडुन अवर्षण व अवर्षण व्‍यवस्‍थापन यावर प्रशिक्षण देण्‍यात आले. कार्यक्रमात सर्व प्रशिक्षणार्थीना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते तंत्रज्ञान अभ्‍यासक्रमाच्‍या सिडींचे तसेच प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रशिक्षणार्थी संजय रामटेके, डॉ. इंदीरा घोनमोडे, वृषाली घुले, एस.एस.निबांळकर, कृष्‍ण भगवान यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.
    प्रास्‍ताविक मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. बी.ही.आसेवार यांनी केले. सुत्रसंचलन वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. आनंद गोरे व आभार प्रदर्शन डॉ. गणेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. पी. एन. सत्‍वधर, प्राचार्य डॉ. ए. एस. कदम, प्राचार्य डॉ. ए. एस. कडाळे, डॉ. ए. एस. कारले आदीसह विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी, विदयार्थी व सर्व प्रशिक्षणार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीततेसाठी प्रा. एम.एस. पेडंके, डॉ. ए.एस. जाधव, डॉ. नारखेडे श्री. धिरज पाथ्रीकर, श्री. अभिजीत कदम, श्री. माणिक समिंद्रे, सौ. सारिका नारळे, श्री. एम.डी. सयद, श्री. नारायण पेदेुवार, श्री. भंडारे, श्री. पंडीत आदींनी परिश्रम घेतले.