Saturday, December 3, 2016

परभणी कृषि महाविद्यालयात कृषि शिक्षण दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयात भारताचे पहिले राष्‍ट्रपती भारतरत्‍न डॉ राजेंद्र प्रसाद यांच्‍या जन्‍मदिनी दिनांक 3 डिसेंबर रोजी कृषि शिक्षण दिन साजरा करण्‍यात आला. या निमित्‍त शेतकरी गटचर्चा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्‍यात आले तसेच महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यासाठी निबंधस्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. शेतकरी गटचर्चेत प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ एन जी कु-हाडे, प्रा. पी के वाघमारे, प्रा. रणजित चव्‍हाण आदींनी विविध विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन केले तसेच कृषिविद्या विभाग आणि पुशसंवर्धन व दुग्धशास्‍त्र विभागास प्रक्षेत्र भेट देऊन कृषि तंत्रज्ञानाची माहिती देण्‍यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले की, शेतक-यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या सतत संपर्कात राहुन आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती घ्‍यावी व शेती उत्‍पादन वाढवावे तसेच शेतमालाच्‍या मार्केटींगचे तंत्र अवगत करावे. यावेळी प्रगतशील शेतकरी माऊली पारधे सह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या दिनाचे औजित्‍य साधुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यीसाठी आधुनिक शेतकरी, कृषि विषयक बाबासाहेबांचे विचार, कृषिक्षेत्रात महिलांचा सहभाग, कृषि पदवीधर–भविष्‍यातील आशा आदी विषयावर निबंधस्‍पर्धेेचे आयोजन करण्‍यात आले होते, यात मोठया संख्‍येने विद्यार्थ्‍यीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. संदिप बडगुजर, प्रा. कल्‍याणकर, प्रा. पपिता गौरखेडे आदींनी परिश्रम घेतले.