Tuesday, February 7, 2017

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणात ऊस लागवड तंत्रज्ञान, कोरडवाहु शेती व्‍यवस्थापन, हुमणी किड व्‍यवस्‍थापन, कापसावरील शेंदरी अळीचे व्‍यवस्‍थापन, हरभरा काढणी व प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. यात ऊस लागवड तंत्रज्ञानावर विशेष मार्गदर्शन पाडेगाव येथील मध्‍यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे डॉ धर्मेंद्रकुमार फाळके हे करणार आहेत. प्रशिक्षणाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते होणार आहे, तरी सदरिल प्रशिक्षणाचा लाभ परिसरातील शेतक-यांनी घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे यांनी केले आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्‍यासाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या ०२५४२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर दिनांक ८ फेब्रुुवारी दुपारी ५.०० वाजेपर्यंत आपली नावनोंदणी करावी, असे कळविण्‍यात आले आहे.