Thursday, March 30, 2017

वनामकृवित मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृति आराखडा कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांकरिता दोन दिवसीय वार्षिक कृति आराखडा कार्यशाळेचे आयोजन दिनांक 29 व 30 रोजी करण्‍यात आले होते. सदरिल कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले. प्रमुख पाहुणे म्‍हणुन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक तथा मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के दत्‍तात्री हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ उपस्थित होते.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी मराठवाडयातील शेतक-यांनी शेतीला जोडधंदयाची जोड दिल्‍यास निश्चितच शेतक-यांना एक चांगले आर्थिक पाठबळ मिळुन उत्‍पन्‍नात शाश्‍वती प्राप्‍त होऊ शकते, शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी मदत होईल. यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी पुढाकार घेऊन पशुसंवर्धन व दुग्धव्‍यवसाय सुरू करण्‍यास शेतक-यांना प्रोत्‍साहित करावे. कृषि विज्ञान केंद्रात चारा पिके व व्‍यवसायिक प्रशिक्षणावर भर देण्‍याच्‍या सल्‍लाही त्‍यांनी दिला. मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. के दत्‍तात्री यांनी कृषि विज्ञान केंद्राचे पोर्टल अद्यावत करण्‍याचे व प्रत्‍येक विषय विशेषज्ञांच्‍या कार्याची माहिती दिली तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी सर्व कृषि विज्ञान केंद्र शास्‍त्रज्ञांनी विद्यापीठातील संकरित गौ पैदास केंद्रातील विविध चारा पिकांच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्राची पाहणी कराण्‍याचे आवाहन केले.
प्रास्‍‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी गतवर्षी राबविण्‍यात असलेल्‍या अभियांत्रिकी उपकरणे, रूंद सरी वरंबा पध्‍दत व नगदी पीके या तीन सुत्री कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पी आर देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा पी एस चव्‍हाण, डॉ चिक्षे, श्री ढाकणे आदींनी सहकार्य केले.

गृहविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विविध गावात शेतकरी बांधवात उमेद जागृती






Tuesday, March 28, 2017

विद्यार्थीनी आपल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रीत करावे...ज्‍येष्‍ठ पत्रकार श्री. संजीवजी लाटकर

वनामकृविच्‍या परभणी कृषी महाविद्यालयात झेप यशाचीकार्यक्रम संपन्‍न
विद्यार्थ्‍यांनी जीवनात उच्‍च ध्‍येय ठेवले पाहिजे, करियर मध्‍ये यशस्‍वी होण्‍यासाठी ध्‍येयावर लक्ष केंद्रीत करावे लागेल, कष्‍टाची किंमत विद्यार्थ्‍यांना कळाली पाहिजे, असा सल्‍ला ज्‍येष्‍ठ पत्रकार श्री. संजीवजी लाटकर यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक 27 मार्च रोजी झेप यशाची या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर कुलसचिव डॉ विलास पाटील, राज्‍याचे उपसचिव (कृषि) श्री प्रकाश शेटे, प्राचार्य डॉ डि एन गोखले श्री. विलास वट्टमवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात श्री. संजीवजी लाटकर पुढे म्‍हणाले की, इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर आपण कोणतेही यश संपादन करू शकतो. वेळ वाया घालु नका, वेळेचे नियोजन करा. स्‍वत:च्‍या विचारांचे निरीक्षण करा, स्‍वत:शी स्‍पर्धा करा, स्‍वत: मध्‍ये योग्‍य ते बदल करावा लागेल. तुम्‍हीच आहात तुमच्‍या जीवनाचे शिल्‍पकार. महाविद्यालयातील केवळ पुस्तिकी ज्ञानापेक्षा कौशल्‍य विकासावर भर द्यावा लागेल. आजच्‍या माहिती तंत्रज्ञानाच्‍या युगात इंग्रजीचे भाषाचे ज्ञान असणे क्रमप्राप्‍त झाले आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांना उद्योग क्षेत्रात अमर्याद संधी आहेत, परंतु उद्योग क्षेत्रास आवश्‍यक गुणवैशिष्‍टे विद्यार्थ्‍यांना विकसित करावी लागतील.

कुलसचिव डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ मेधा जगताप यांनी मानले. प्रमुख पाहुण्‍याचा परिचय प्रा. पी के वाघमारे यांनी करून दिला. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, March 25, 2017

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

माननीय कृ‍षीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतीकुलपती मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांनी वनामकृवितील एकुण ५६४३ स्‍नातकांना विविध पदवीने केले अनुग्रहीत

कृषिच्‍या विद्यार्थ्‍यानी कृषि उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मीती केली पाहिजे......कुलपती मा. प्रा. डॉ. पंजाब सिंग
वनामकृविच्‍या दीक्षांत समारंभात रांजणी (ता. कळंब जि. उस्‍मानाबाद) येथील प्रगतशील शेतकरी तथा नॅचरल शुगरचे संचालक मा. श्री. भैरवनाथ ठोंबरे यांना कृषिरत्‍न या मानद उपाधीने सन्‍मानित करतांना कृषीमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर, कुलपती मा. प्रा. पंजाब सिंग, कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ विलास पाटील आदी 
वनामकृविच्‍या दीक्षांत समारंभात विद्यापीठ संशोधनात भरीव योगदानाबाबत डॉ के एस बेग, डॉ एस पी मेहेत्र व डॉ डि जी मोरे यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. 
*******************
आज कृषिच्‍या विद्यार्थ्‍यानी केवळ नौकरीसाठी शिक्षण न घेता, एक कृषि उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला पाहिजे. मराठवाडयातील पारंपारिक शेतीचे विज्ञानधिष्‍ठीत शेतीत परिवर्तनासाठी कृषिच्‍या विद्यार्थ्‍यीनी कार्य करावे. दर्जेदार शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्याच्‍या माध्‍यमातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषि विकासासाठी सक्षम मनुष्‍यबळाची व कृषी तंत्रज्ञानाची निर्मीतीचे भरिव कार्य केले आहे, असे प्रतिपादन झांसी येथील राणी लक्ष्‍मीबाई कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. प्रा. पंजाब सिंग यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ मार्च रोजी संपन्‍न झाला, यावेळी दीक्षांत अभिभाषण करतांना ते बोलत होते. समारंभाच्‍या अध्‍यक्षस्थानी राज्‍याचे कृ‍षीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतीकुलपती मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर हे होते तर कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. आमदार डॉ राहुल पाटील, मा श्री केदार सोळुंके, मा. श्री. गोविंदराव देशमुख, मा. श्री. राहुल सोनवणे, मा. श्री. अनंतराव चौदे, मा. श्री. रविंद्र देशमुख, माजी कुलगुरू मा. डॉ एस एस कदम, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, उपकुलसचिव श्री एच एल भांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलपती मा. प्रा. पंजाब सिंग पुढे म्‍हणाले की, सन १९६० पर्यत देशासमोर अपुरे अन्‍नधान्‍य ही मोठी समस्‍या होती, परंतु शेतकरी, देशाचे कृषि धोरण व कृषि शास्‍त्रज्ञ यांच्‍या सहाय्याने आज आपण जगात भात, गहु, दुध, फळ, मांस, अंडी व भाजीपाला पिकांत मुख्‍य उत्‍पादक देश आहोत. जागतिक हवामान बदल, नैसगिक संकटे, जमिनीची धुप, पाण्‍याचे दुर्भिक्ष, शेतमाल भावातील चढउतार, जमीन विखंडनीकरण, मजु-यांची समस्‍या, अजैविक ताण, तापमान वाढ, अन्‍नद्रव्‍याची कमतरता आदी कारणामुळे सध्‍याचे वाढीव शेती उत्‍पादकतेत शाश्‍वतता राखणे कठिण होत आहे. माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आदी आधुनिक तंत्राचा कृषि संशोधन वापर करावा लागेल. सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्‍वावर संशोधन व विकासासाठी प्रयत्‍न करावा लागेल. देशाच्‍या कृषि विकासातील कृषि विद्यापीठे हे महत्‍वाचे स्‍त्रोत असुन जागतिक व देशातील सामाजिक-आर्थिक प्रगतीच्‍या वेगासोबत राहण्‍यासाठी कृषी विद्यापीठीय शैक्षणिक यंत्रणा अधिक सक्षम करण्‍याची गरज आहे. मराठवाडयातील शेती विकासासाठी पाणी व्‍यवस्‍थापन अत्‍यंत महत्‍वाचे असुन गाव पातळीवर वॉटर बजेट संकल्‍पना राबवावी लागेल, पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार पीक पध्‍दतीत बदल करावा लागेल. देशातील अल्‍प भुधारकांचा विचार करून प्रती एकरी जमीनीची उत्‍पादकता वाढवावी लागेल. एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापनाचा अवलंब करावा लागेल तसेच लहान शेतजमिनीसाठी योग्‍य यांत्रिकीकरणाचा आधार घ्‍यावा लागेल. शेतक-यांनी एक पिक पध्‍दती सोडुन पिक लागवडीत विविधता आणुन पशुपालन व कृषि संलग्न जोडधंदाचा आधार घ्‍यावा लागेल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
माननीय प्रति कुलपती मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांनी स्‍नातकांना सत्‍याच्‍या मार्गावर राहुन देशाप्रती व समाजाप्रती प्रामाणिकपणे कर्तव्‍य पार पाडण्‍याची शपथ देऊन विविध विद्याशाखेतील एकुण ५६४३ स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीने अनुग्रहीत केले.
प्रास्‍ताविकात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या स्‍थानिक गरजानुसार तंत्रज्ञान निर्मीती हे विद्यापीठाचे मुख्‍य कार्य असुन विद्यापीठ स्‍थापनेपासुन कृषि विकासात उच्‍च शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन भरीव योगदान दिले आहे. विद्यापीठ विकसित तुर, सोयाबीन व कापुस वाणास मराठवाडयातील शेतक-यांत मोठी मागणी असुन इतर राज्‍यातही या खालील क्षेत्र वाढत आहे. आज विद्यापीठाचा एका महाविद्यालयापासुन २१ घटक व २४ सलंग्‍न महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला आहे. विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्‍यी विविध क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देत आहे. शेतक-यांत उमेद जागृतीसाठी विद्यापीठ प्रयत्‍न करित आहे, असे सांगुन त्‍यांनी विद्यापीठाच्‍या कार्याची माहिती दिली.
सदरिल दीक्षांत समारंभात रांजणी (ता. कळंब जि. उस्‍मानाबाद) येथील प्रगतशील शेतकरी तथा नॅचरल शुगरचे संचालक मा. श्री. भैरवनाथ ठोंबरे यांना कृषिरत्‍न या मानद उपाधीने सन्‍मानित करण्‍यात आले तर विद्यापीठ संशोधनात भरीव योगदानाबाबत डॉ के एस बेग, डॉ एस पी मेहेत्र व डॉ डि जी मोरे यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकांनी गौरविण्‍यात आले.
दीक्षांत समारंभात विद्यापीठातील विविध अभ्‍यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्‍यांनी निश्चित केलेल्‍या सूवर्ण पदके, रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. याच यात आचार्य पदवीचे ४६ पात्र स्‍नातक, पदव्‍युत्‍तर पदवीचे ६६३ स्‍नातक व पदवी अभ्‍यासक्रमाचे ४९३४ स्‍नातकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशा आर्या व डॉ डि जी मोरे यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
दीक्षांत समारंभात दिव्‍या रवदा, बी. विभजम सगल किरण, सनवर मल चौधरी, पल्‍लवी हिंगे, प्रिती रूपनर, सुर्यकांत तरटे, प्रशांत साहनी, प्रणिल काळे, संगिता मेदी, आर्या पी., शिवेंदु सोलंकी, मंजिरी सोनोने, मृणाल बारभाई, अंकित कुमार, सय्यद झुबेर सय्यद तुराब, प्रिया नवणे, मोनिका, जयश्री दुधभाते, प्रतिभा ठोंबरे, स्‍नेहल कदम, रोहण देशपांडे आदीं स्‍नातक सुवर्ण पदकांनी गौरविण्‍यात आले तर गौरी काकडे, चंद्रकांत सावंत, महेश जजोरिया, प्रसाद शिंदे, अंबिका चौधरी, स्‍नेहल माद्रप आदीं स्‍नातकांना रोख पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले.
वनामकृविच्‍या दीक्षांत समारंभात दीक्षांत अभिभाषण करतांना झांसी येथील राणी लक्ष्‍मीबाई कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. प्रा. पंजाब सिंग, व्‍यासपीठावर कृषीमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर, कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्वरलु आदी 
प्रास्‍ताविक करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु



छायाचित्र






दिक्षांत समारंभातील विविध पदकांचे मानकरी स्‍नातक

सुवर्ण पदक स्‍वीकारतांना दिव्‍या रवदा
रौप्‍य पदक स्‍वीकारतांना परमिता देब 
सुवर्ण पदक स्‍वीकारतांना बी. विभजम सगल किरण


सुवर्ण पदक स्‍वीकारतांना सनवर मल चौधरी

सुवर्ण पदक स्‍वीकारतांना प्रिती रूपनर






सुवर्ण पदक स्‍वीकारतांना रोहण देशपांडे





दिक्षांत समारंभातील विविध पदकांचे मानकरी स्‍नातक
अभ्‍यासक्रम
शै‍क्षणिक वर्ष
पुरस्‍काराचे नाव
मानकरी स्‍नातक
शैक्षणिक वर्ष 2013-14
एम. एस्‍सी (कृषि)
2013-14
श्रीमती यशोदाबाई रामुलाल बारवाले सुवर्ण पदक
दिव्‍या रवदा
एम. एस्‍सी (कृषि)
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र
2013-14
स्‍व. श्री. भिकु रामजी वराडे रौप्‍य पदक
परमिता देब
शैक्षणिक वर्ष 2014-15
एम. एस्‍सी (कृषि)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक व श्रीमती यशोदाबाई रामुलाल बारवाले सुवर्ण पदक
बी. विभजम सगल किरण
एम. एस्‍सी. (उद्यानविद्या)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
सनवर मल चौधरी
एम. एस्‍सी. (कृषि)
कृषि जैवतंत्रज्ञान
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
पल्‍लवी हिंगे
एम. एस्‍सी. (गृहविज्ञान)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
प्रिती रूपनर
एम. टेक. (कृषि अभियांत्रिकी)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
सुर्यकांत तरटे
एम. टेक. (अन्‍न तंत्रज्ञान)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
प्रशांत साहनी
एम. बी. ए. (कृषि)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
प्रणिल काळे
एम. एस्‍सी (कृषि)
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र
2014-15
स्‍व. श्री. भिकु रामजी वराडे रौप्‍य पदक
संगिता मेदी
बी. एस्‍सी. (कृषि)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
आर्या पी.
बी. एस्‍सी. (उद्यानविद्या)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
शिवेंदु सोलंकी
बी. एस्‍सी. (कृषि जैवतंत्रज्ञान)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
मंजिरी सोनोने
बी. एस्‍सी. (गृहविज्ञान)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
मृणाल बारभाई
बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक
अंकित कुमार
बी. टेक. (अन्‍न तंत्रज्ञान)
2014-15
विद्यापीठ सुवर्ण पदक तथा स्‍व. सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकु सुवर्ण पदक
सय्यद झुबेर सय्यद तुराब
शैक्षणिक वर्ष 2015-16
बी. एस्‍सी (कृषी)
2015-16
विद्यापीठ सुवर्ण पदक
प्रिया नवणे
बी. एस्‍सी (उद्यानविद्या)
2015-16
विद्यापीठ सुवर्ण पदक
मोनिका
बी. एस्‍सी (कृषि जैवतत्रज्ञान)
2015-16
विद्यापीठ सुवर्ण पदक
जयश्री दुधभाते
बी. एस्‍सी (गृहविज्ञान)
2015-16
विद्यापीठ सुवर्ण पदक
प्रतिभा ठोंबरे
बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी)
2015-16
विद्यापीठ सुवर्ण पदक
स्‍नेहल कदम
बी. टेक. (अन्‍न तंत्रज्ञान)
2015-16
विद्यापीठ सुवर्ण पदक तथा स्‍व. सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकु सुवर्ण पदक
रोहण देशपांडे
इतर मानकरी
एम. एस्‍सी. (कृषि)
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र
2013-14
भारतीय मृद विज्ञान संस्‍था परभणी शाखा रोख पारितोषिक
गौरी काकडे
एम. एस्‍सी. (कृषि)
किटकशास्‍त्र
2013-14
स्‍व. गोपाल किशन काळे रोख पारितोषिक
चंद्रकांत सावंत
एम. एस्‍सी. (कृषि)
कृषि वनस्‍पतीशास्‍त्र
2013-14
नॅशनल सिम्‍पोझिम ऑन हेटेरोसीस एक्सप्‍लोऐटेशन 1987 रोख पारितोषिक
दिव्‍या रवदा
एम. एस्‍सी. (कृषि)
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र
2014-15
भारतीय मृद विज्ञान संस्‍था परभणी शाखा
महेश जजोरिया
एम. एस्‍सी. (कृषि)
किटकशास्‍त्र
2014-15
स्‍व. गोपाल किशन काळे रोख पारितोषिक
प्रसाद शिंदे
एम. एस्‍सी. (कृषि)
कृषि वनस्‍पतीशास्‍त्र
2014-15
नॅशनल सिम्‍पोझिम ऑन हेटेरोसीस एक्सप्‍लोऐटेशन 1987 रोख पारितोषिक
अंबिका चौधरी
एम. एस्‍सी. (कृषि)
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र
2014-15
स्‍व. डॉ घनशाम उर्कुडा मालेवार रोख पारितोषिक
संगिता मेदी
एम. एस्‍सी. (गृहविज्ञान)
2014-15
मा. माजी राज्‍यमंत्री प्रा. फौजिया तहसिन खान रोख पारितोषिक
स्‍नेहल माद्रप