Tuesday, April 11, 2017

विद्यार्थ्‍यांनी स्‍वत: तील बलस्‍थाने व मर्यादा ओळखल्‍या पाहिजेत....प्रसिध्‍द व्‍यक्‍ते डॉ. सचिन देशमुख

वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांना निरोप


जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी स्‍वत: तील बलस्‍थाने व मर्यादा ओळखल्‍या पाहिजेत. जीवनात समस्‍या येतात, त्‍यासोबत त्‍यांची उत्‍तरेही असतात. समस्‍यांना तोंड दिल्‍यास माणुस खंबीर बनतो, असे प्रतिपादन पुणे येथील स्‍त्री रोग तज्ञ तथा प्रसिध्‍द व्‍यक्‍ते डॉ सचिन देशमुख यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयातील कृषि पदवीच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा दिनांक ११ एप्रिल रोजी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ ए एस कदम, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ सचिन देशमुख पुढे म्‍हणाले की, मनुष्‍य अनेक काल्‍पनिक भीतीमुळे जीवनात तणावग्रस्‍त असतो. युवकांनी अर्थहिन वादविवादात वेळ व ऊर्जा वाया घालु नये. भुतकाळाचा विचार न करता, मी काय करू शकतो यांचा विचार करा. समाजासाठी कार्य करा, अपयश ही यशाची पहिली पायरी असुन आपले ज्ञान व कौशल्‍य वृध्‍दींगत करण्‍यासाठी सतत प्रयत्‍नशील रहावे.  
कार्यक्रमात अंतिम सत्रातील विद्यार्थ्‍यी संदिप खरबळ व मीरा आवरगंड यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात नुकतेच बॅकिंग व इतर स्‍पर्धा परिक्षेत यश प्राप्‍त केलेल्‍या महाविद्यालयाच्‍या एकतीस विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. निरोप समारंभाचे आयोजन सहाव्‍या सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या वतीने करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्‍त‍ाविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.