Sunday, April 23, 2017

गृहविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थींनीनी केले प्रशिक्षणाचे यशस्‍वी आयोजन

अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागातील अंतिम सत्रात शिक्षण घेत असलेल्‍या अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रम अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थीनींनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक 15 ते 20 एप्रिल दरम्‍यान आयोजन केले होते. सदरिल विद्या‍र्थीनींनी पाच दिवसीय बेसीक स्टिचिंग विथ हाय स्‍पीड मशीन्‍स व तीन दिवसीय वारली चित्रकला व हस्‍तकला यावर प्रात्‍यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्‍वीरित्‍या आयोजन केले. यात शहरातील वीस गृहिनी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थींनी सहभाग नोंदविला. पदवीच्‍या आठव्‍या सत्रात म्‍हणजेचे अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रमात घेतलेल्‍या ज्ञान व कौशल्‍याच्‍या आधारे विद्यार्थींनीनी सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन करून सहभागी महिलांना प्रशिक्षित केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोपात प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांच्‍या हस्‍ते विद्यार्थीनीनीचे अभिनंदन करून प्रमाणपत्र वितरीत करण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षण विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर व प्रा. इरफाना सिद्दीकी यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यार्थींनी आरती भारस्‍वाडकर, गितांजली फोफसे व ऐश्‍वर्या शिंदे यांनी आयोजित केले होते.