Friday, June 30, 2017

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात शेतकरी आत्महत्याच्या बाबींची मिमांसा प्रकल्पातंर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय आणि राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येत असलेला 'शेतकरी कुटुबांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीतुन शेतकरी आत्‍महत्‍याच्‍या बाबींची मिमांसा' या प्रकल्‍पांतर्गत स्‍वयंसेवकांसाठी दिनांक 29 जुन रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी विस्‍तार शिक्षणाचे विभाग प्रमुख  डॉ. आर. डी. अहिरे, डॉ. जे. व्‍ही. एकाळे, डॉ. पी. एस. कापसे, डॉ एम व्‍ही कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत पतियाला येथील पंजाब विद्यापीठाचे वरिष्‍ठ संशोधन छात्र डॉ. अमनदिप सिंग यांनी तणावग्रस्‍त शेतक-यांचे मानसशास्‍त्र याविषयावर स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत डॉ. आर. डी. आहिरे यांनी शेतकरी आत्‍महत्‍या आणि कारणेया विषयावर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. सदरिल प्रकल्‍प प्राचार्य डॉ. डी .एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीवर भर देण्‍यात येणार असुन तणावग्रस्‍त शेतक-यांचा संशोधनात्‍मक अभ्‍यास करण्‍यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांतुन स्‍वयंसेवकाची निवड करून त्‍यांना प्रशिक्षीत करण्‍यात येणार आहे. या कार्यशाळेत कृषि पदवीच्‍या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्‍यीनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पी. एस. कापसे यांनी तर आभार डॉ जी बी अडसुळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री चंद्रशेखर नखाते, श्री खताळ, श्री वैजनाथ दुधारे आदींनी परीश्रम घेतले. 

१ जूलै ते ५ जुलै हवामान अंदाज व कृषि सल्ला

Friday, June 23, 2017

संशोधनाच्‍या माध्‍यमातुन कीड व रोग प्रादुर्भावाचा अंदाज वर्तवण्‍यासाठी स्‍वयंचलित यंत्रणा निर्माण करावी लागेल.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
क्रॉपसॅप प्रकल्‍पामाध्‍यमातुन मागील आठ वर्षात कीड व रोग प्रादुर्भाव सर्वेक्षणामुळे शेतक-यांना योग्‍य सल्‍ला दिल्‍यामुळे निश्चितच शेतक-यांना लाभ झाला आहे. या प्रकल्‍पात कीड – रोग प्रादुर्भावाबाबत मोठी आकडेवारी संकलीत करण्‍यात आली आहे, स्‍वयंचलित हवामान यंत्रणे प्रमाणेच या संकलीत आकडेवारीचा उपयोग करून संशोधनाच्‍या माध्‍यमातुन कीड व रोग प्रादुर्भावाचा अंदाज वर्तवण्‍यासाठी स्‍वयंचलित यंत्रणा निर्माण करण्‍यात यावी. जेणे करून कमी मनुष्‍यबळात व कमी वेळेत शेतक-यांपर्यंत कीड व रोग प्रादुर्भावाचा पुर्वानुमान पोहचविता येईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅप) प्रकल्‍पांतर्गत दिनांक 22 व 23 जुन रोजी कृषि विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, या प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डि एन गोखले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी आर शिंदे, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, प्र‍गत देशात उपग्रहाच्‍या मदतीने कीड व रोग प्रादुर्भावाचा अंदाज बाधण्‍यात येतो. हवामानातील तापमान, आर्द्रता व पर्जन्‍य आदीचा अंदाज घेऊन कीड – रोग प्रादुर्भावाचा अंदाज वर्तवण्‍यासाठी स्‍वयंचलित यंत्रणा विकसित करण्‍यासाठी संशोधनाची गरज आहे.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आठ वर्षापुर्वी सोयाबीनवर पडलेल्‍या लष्‍करी अळीच्‍या उद्रेकामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते, त्‍याच वेळी क्रॉपसॅप प्रकल्‍पाचा प्रारंभ करण्‍यात आला. प्रकल्‍पाच्‍या उपयुक्‍तता पाहता, प्रकल्‍पाची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात आली. सदरिल प्रकल्‍पामुळे गेली आठ वर्ष कीड - रोग प्रादुर्भावाबाबत शेतक-यांमध्‍ये मोठी जागृती झाली आहे. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे म्‍हणाले की, यावर्षी राज्‍यातील कापसाचा पेरा वाढण्‍याची शक्‍यता असुन सदरिल प्रकल्‍पामाध्‍यमातुन योग्‍य सल्‍ला दिल्‍या गेल्‍यास निश्चितच शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी मदत होईल.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आनंद बडगुजर यांनी केले तर आभार डॉ डी पी कुळधर यांनी मानले. कार्यक्रमास कृषि विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. तांत्रिक सत्रात डॉ बी बी भोसले, डॉ पी आर झंवर, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ ए पी सुर्यवंशी, प्रा अरविंद पांडागळे, प्रा बी व्‍ही भेदे, डॉ डि जी मोरे, डॉ ए जी बडगुजर आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

Wednesday, June 21, 2017

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाआंतरराष्‍ट्रीय योग दिनाचे विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक २१ जुन रोजी आयोजन करण्‍यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्‍य अधिकारी डॉ सुब्‍बाराव व योगशिक्षक प्रा­­­. दिनकर जोशी यांच्‍यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) मा. डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मागदर्शन करतांना शिक्षण संचालक मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, आरोग्‍यदायी समाज निर्मितीसाठी योगाची गरज आहे. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त योग मर्यादीत न राहता योग हा सर्वाच्‍या जीवनपध्‍दतीचा अविभाज्‍य भाग व्‍हावा, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डि एफ राठोड यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, June 19, 2017

कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी विद्यापीठाचे कमी खर्चिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवावे...... प्राचार्य डॉ डि एन गोखले

परभणी कृषि महाविद्यालयाचा ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्बोधन कार्यक्रम संपन्‍न
मराठवाडयातील शेती ही मुख्‍यत: पावसावर अवलंबुन आहे, दिवसेदिवस शेतीत लागणा-यां निविष्‍ठांचा खर्च वाढत आहे, त्‍यामुळे शेतीतील खर्च कमी करण्‍यासाठी विद्यापीठाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषिच्‍या विद्यार्थ्‍यीनी ग्रामीण कृषि कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहचवावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्‍यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन दिनांक १७ जुन करण्‍यात आले होते, त्‍या प्रसंगी अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे, शिक्षण विभागाचे प्रभारी प्रा. एन जे लाड आदीसह विषयतज्ञ व कार्यक्रम अधिकारी उपस्थिती होते.  
प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले पुढे म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयातील कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करावा तसेच स्‍वत:तील संवाद कौशल्‍य विकसित करावेत. 
कार्यक्रमात विषयतज्ञ प्रा. एन. जी. लाड, डॉ. के. डि. नवगिरे, डॉ. एल. एन. जावळे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ राजेश कदम, डॉ डि आर कदम, डॉ सचिन मोरे, डॉ पपिता गौरखेडे, डॉ आय ए बी मिर्चा, प्रा. डि. व्‍ही. बैनवाड, डॉ आर जी भाग्‍यवंत आदींनी विद्यार्थ्‍यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रावे समन्‍वयक डॉ. आर. डि. आहिरे यांनी केले तर सुत्रसंचालन रावे प्रभारी अधिकारी डॉ. पी. एस. कापसे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. जयश्री एकाळे, डॉ. ए आर मंत्री, डॉ आनंद बडगुजर, डॉ केदार, प्रा. सुनिता पवार, डॉ अमोल भोसले, प्रा एस पी झाडे, प्रा. डि जी दळवी आदीसह कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते. कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात विद्यार्थी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करतात. यावर्षी महाविद्यालयाचे २३६ विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.

Tuesday, June 6, 2017

कोरडवाहु शेती तंत्रज्ञानावरील मोबाईल अॅप शेतक-यांच्‍या सेवेत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पामार्फत कोरडवाहु शेती तंत्रज्ञान विकसीत करण्‍यासाठीचे संशोधन कार्य केल्‍या जाते. कोरडवाहु शेती यशस्‍वी करण्‍यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसीत करण्‍यात आलेले आहे. यात कोरडवाहु शेतीत आंतरपिक पध्‍दती, पिक पध्‍दती, खतांची मात्रा, व्‍यवस्‍थापन, लागवडीचे अंतर, पीक पेरणीचा कालावधी, आपत्‍कालीन पीक नियोजन, आपत्‍कालीन पीक व्‍यवस्‍थापन, मृद व जलसंधारण, शेततळे, लागवड पध्‍दती, विहिर व कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान यांचा प्रामुख्‍याने समावेश होतो.
सदरील तंत्रज्ञान हे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्‍वाचे असुन त्‍यातील प्रत्‍येक तंत्रज्ञान व घटकांची अंमलबजावणी योग्‍य वेळेवर, योग्‍य पध्‍दतीने होणे गरजेचे आहे. त्‍यादृष्‍टीने या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार विद्यापीठाचे खरीप, रब्‍बी व महिला मेळावे, विविध शेतकरी चर्चासत्रे, प्रशिक्षणे वर्ग तसेच वृत्‍तपत्रे, मासिके व आकाशवाणी, दुरदर्शन यांच्‍या माध्‍यमातुन वेळोवेळी शेतकरी, कृषि विभाग यांचे पर्यंत पोहचविण्‍यात येते.
आज मोबाईलचा वापर शेती क्षेत्रात वाढत आहे. शेतकरी मोबाईलवर शेतीची माहिती घेत आहेत. अशा वेळी त्‍यांना तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाची तसेच जलसंधारण, विहिर व कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञानाची माहिती अतिशय नेमक्‍या पध्‍दतीने तसेच संबंधित छायाचित्रे, चित्रफितीच्‍या माध्‍यमातुन पोहचविण्‍यासाठी कोरडवाहु शेतीचे सुधारीत तंत्रज्ञान तसेच  जलसंवर्धन व जल पुर्नभरण या दोन अॅपची निर्मिती अखील भारतील समन्‍वीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातर्फे या करण्‍यात आली आहे.
या दोन्‍ही अॅपचे लोकार्पण संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीच्‍या उद्घाटन प्रसंगी दि. २९ मे २०१७ रोजी कृषि व फलोत्‍पादन मंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर, महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. डॉ. श्री. राम खर्चे, कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु यांचे हस्‍ते तर कृषि परिषदेचे महासंचालक डॉ. नागरगोजे, कुलगुरु मा. डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरु मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, कृषि आयुक्‍त मा. श्री. सुनिल केंद्रेकर, संशोधन संचालक मा. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर व चार ही कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या उपस्थितीत पार पडले.

सदरील अॅप मध्‍ये कोरडवाहु शेती तंत्रज्ञान व जलसंधारण व विहिर आणि कुपनलिका पुनर्भरणावर तंत्रज्ञानाची माहिती विविध शिर्षकाअंतर्गत बोटाच्‍या एका स्‍पर्शावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आली असुन विविध तंत्रज्ञानाची छायाचित्रे, चित्रफिती यामुळे शेतक-यांना संबंधित तंत्रज्ञान समजण्‍यास सोपे आहे. सदरील अॅप शेतकरी बंधु भगिनी आपल्‍या स्‍मार्ट मोबाईल हॅन्डसेट मध्‍ये – गुगल प्‍ले स्‍टोअर – व्हिएनएमकेव्‍ही – कोरडवाहु व व्हिएनएमकेव्‍ही जलसंवर्धन लिंग वरुन डाऊनलोड करु शकतात. सदरील अॅप हे कुलगुरु मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु व मा. संचालक संशोधन मा. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आले असुन यासाठी डॉ. बी. व्‍ही. आसेवार, प्रा. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. आनंद गोरे, श्री. माणीक समिंद्रे, श्री. अभिजीत कदम यांनी परिश्रम घेतले आहेत. तरी शेक-यांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येंने या अॅपचा उपयोग व त्‍यातील तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे अवाहन कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पातर्फे करण्‍यात येत आहे.

Monday, June 5, 2017

Friday, June 2, 2017

वैविध्‍दपुर्ण अॅग्रोटेक व्‍हीएनएमकेव्‍ही मोबाईल अॅपचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांच्‍या हस्‍ते लोकार्पण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ निर्मित अॅग्रोटेक व्‍हीएनएमकेव्‍ही (AgroTech VNMKV) मोबाईल अॅपचे लोकार्पण राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांच्‍या हस्‍ते दिनांक २९ मे रोजी संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीच्‍या उद्घाटन समारंभात करण्‍यात आले. यावेळी व्‍यासपीठावर महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे, कृषि व फलोत्‍पादन विभागाचे अप्‍पर मुख्‍य सचिव मा. श्री. विजय कुमार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. आर जी दाणी, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के पी विश्‍वनाथ, कृषि परिषदेचे महासंचालक मा. डॉ. के. एम. नागरगोजे, कृषि आयुक्‍त मा. श्री. सुनिल केंद्रेकर, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हाधिकारी मा. श्री. पी शिवा शंकर, विद्यापीठ कार्यकारी सदस्‍य मा. श्री. केदार साळुंके, मा. श्री अनंतराव चौदे, मा श्री रविंद्र पतंगे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आदीसह अनेक मान्‍यवर उपस्थित होते.

सदरिल अॅपची निर्मिती कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ प्रशांत देशमुख, डॉ प्रविण कापसे, डॉ नितीन तांबोळी, डॉ उद्य आळसे, प्रा. डी डी पटाईत, डॉ शंकर पुरी आदींनी केली आहे. विद्यापीठाच्‍या कृषि दैनंदिनीतील संपुर्ण माहिती या अॅपवर उपलब्‍ध असुन दर आठवडयात विद्यापीठाच्‍या वतीने प्रकाशित होणारा हवामान अंदाज व कृषि सल्‍ला, विद्यापीठातील चालु घडामोडी, प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे, चर्चासत्र, बातम्‍या आदींची माहिती या अॅपवर वेळोवेळी उपलब्‍ध होणार आहे. या अॅप मध्‍ये विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांचे वाण, कीड-रोग व्‍यवस्‍थापन, तण व्‍यवस्‍थापन, खत व्‍यवस्‍थापन, कोरडवाहु शेती, सेंद्रीय शेती, उद्यानविद्या, गृहविज्ञान, मृद विज्ञान, किफायतशीर पिक पध्‍दती, शेती पुरक जोडधंदे, कृषि अवजारे व यंत्रे, विद्यापीठ शिफारशी, विद्यापीठ अंतर्गत विविध कार्यालय व संपर्क क्रमाक आदी माहितीचा समावेश आहे. या अॅपव्‍दारे व्‍हीडिओ गॅलरी माध्‍यमातुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या मुलाखती व विद्यापीठ बातम्‍या देखिल पाहता येणार आहे. हा अॅप गुगल प्‍ले स्‍टोअर वर उपलब्‍ध असुन एकदा डाऊनलोड करून याचा वापर ऑफलाईन देखिल करण्‍यात येऊ शकतो. या वैविध्‍यपुर्ण असा अॅपच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नास उत्‍तर देण्‍याची सेवा विद्यापीठाव्‍दारे लवकरच सुरू करण्‍यात येणार आहे. अॅप वेळोवेळी शेतक-यांच्‍या सुचनेनुसार अद्यावत करण्‍यात येणार आहे. सदरिल अॅप शेतकरी, कृषिचे विद्यार्थ्‍यी, कृषि विस्‍तारक, कृषि अधिकारी, शास्‍त्रज्ञांना उपयुक्‍त असुन जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी याचा वापर करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी केले.