Tuesday, August 1, 2017

सामाजिक विज्ञान महाविद्यालयात नुतन शिक्षण संचालक व संशोधन संचालक यांचा सत्कार



सामाजिक विज्ञान महाविदयालयाच्या वतीने नुतन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील व नुतन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या सत्कार करण्‍यात आला. सत्काराला उत्तर देत्तांना संशोधन संचालक डॉ. वासकर यांनी त्यांच्या कार्यालयीन काळातील विविध अनुभवांचे कथन केले तर मा. डॉ विलास पाटील यांनी महाविद्यालयाला पुर्वापार लाभलेल्या पायाभुत शिस्तीचे कार्यक्षमतेचे कौतुक केले. विद्यापीठाचा दर्जा वाढविण्याच्या दुष्टीने महाविद्यालयातील प्राध्यापक  संचालकांनी मिळून कार्य करण्याची गरज असल्‍याचे त्‍यांनी व्यक्त केली. कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटनम उपाध्यक्षा जीमखाना डॉ. सुनीता काळे यांनी केले.