Tuesday, August 22, 2017

वनामकृविच्या किटकशास्त्र विभागात जागतिक मधुमक्षिका दिनानिर्मित्त कार्यशाळा संपन्न



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने जागति मधुमक्षिका दिनानिमित्‍त दिनांक 19 ऑगस्‍ट रोजी कृषिक्षेत्रात मधमाश्याचे महत्व या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्‍न झाली.  कार्यशाळेचे उदघाटन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या हस्‍ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ कार्यकरणीचे सदस्य मा. श्री. रविंद्र पतंगे होते. लातूर येथील मधुमक्षिका पालक श्री. दिनकर पाटील, मधुमक्षिका तज्ञ डॉ. एस. एन. कुलकर्णी, सहयोगी अधिष्ठाता (निरुस्तर) डॉ. डी. बी. देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. श्री. रविंद्र पतंगे यांनी विद्यापीठाव्दारे मधुमक्षिका पालनावर अधिक संशोधन करण्‍याचे मत आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केले तर तर शेतीमध्ये अन्नधान्य उत्पादन वाढीत वनस्‍पतीतील परागिकरण महत्‍वाचे असुन या परागीकरणात मधमाशांची भुमिका महत्‍वीची असल्‍याचे डॉ. बी. बी. देवसरकर यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी मधमाश्यांच्या पालनासाठी संवर्धनाकरीता शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. मधुमक्षिका ज्ञ डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी कृषिक्षेत्रात मधमांश्याचे महत्व याविषयावर सादरीकरणाव्दारे मार्गदर्शन केले तसेच मधमाश्यांचे संवर्धन करण्याविषयी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले. मध उत्पादक शेतकरी श्री. दिनकर पाटील यांनी आपल्या मध उत्‍पादन व्यवसायातील अनुभव सांगुन शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाकडे वळण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले. कार्यक्रामाचे प्रास्ताविका विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी मधुमक्षिका दिनाचे महत्व विषद केले. कार्यक्रमास किटकशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य श्री. रमेश लाड, प्रगतशील शेतकरी श्री.  जंवजाळ, श्री. प्रल्हाद बोरगड, श्री. रोकडोबा सातपुते, श्री. प्रल्हाद रेंगे, डॉ. बी. एम. वाघमारे, डॉ. यू. एल. खोडके, डॉ. तांबे, डॉ. बी. एम. ठोंबरे आदीसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नरेशकुमार जायेवार यांनी केले.