Wednesday, August 23, 2017

विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्सचा शेतक-यांमध्ये वापर वाढत आहे.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी विशेष विस्‍तार उपक्रमाचे उदघाटन
आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात मराठवाडयातील अनेक शेतकरी आज पुढे येत असुन विविध कृषि तंत्रज्ञानावर आधारीत विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍सचा शेतकरी मोठया प्रमाणात वापर करित आहेत. मर्यादित मनुष्‍यबळामुळे प्रत्‍येक शेतक-यांपर्यंत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ पोहचने शक्‍य नाही, विद्यापीठ विकसित मोबाईल अॅप्‍सच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ तंत्रज्ञानाचा प्रसार प्रभावीपणे शक्‍य होत आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. विदयापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात येणार विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी विशेष विस्‍तार उपक्रमाच्‍या उदघाटनाप्रसंगी (दिनांक 23 ऑगस्‍ट रोजी) ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, कृषि विकास अधिकारी श्री बी एस कच्‍छवे, प्र‍गतशील शेतकरी श्री विठ्ठलराव जवंजाळ, श्री प्रतापराव काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आज शेतीत अनावश्‍यक किडनाशकांचा वापर वाढत असुन विद्यापीठाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी या नाविण्‍यपुर्ण उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन पोहचविणे गरजेचे आहे.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले आपल्‍या भाषणात सद्यस्थितीत मराठवाडयात पडलेल्‍या पाऊसाच्‍या पाण्‍याचे योग्‍य संवर्धन व नियोजन यावर शेतक-यांना मार्गदर्शनाची गरज असल्‍याचे सांगितले. विद्यापीठ आपल्‍या दारी उपक्रमाचा शेतक-यांना मोठा उपयोग होत असल्‍याचा अनेक शेतक-यांनी प्रतिक्रिया दिल्‍या असल्‍याचे मत कृषि विकास अधिकारी श्री बी एस कच्‍छवे यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कृषिविद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ एस जी पुरी यांनी केले तर आभार डॉ डि डि पटार्इत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृविच्‍या वतीने दि. २३ ऑगस्‍ट ते ७ सप्‍टेंबर दरम्‍यान यावर्षी विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी उपक्रम राबविण्‍यात येत असुन परभणी व हिंगोली जिल्‍हयाकरीता जिल्‍हा / तालुकास्‍तरीय / गाव पातळीवर तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आला आहे. विदयापीठ तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी विदयापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या सहकार्याने विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रपरभणी यांच्‍या माध्‍यमातून व सर्व महाविदयालये, संशोधन योजनांच्‍या सहकार्याने विशेष विस्‍तार उपक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने प्रत्‍येक तालुक्‍यातील चार गावाचा समावेश करण्‍यात आला असुन प्रत्‍येक दिवशी या चारही गांवाचा दौरा करण्‍याचे नियोजित असुन एकूण चार विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचे चमु करण्‍यात आले आहेत. यात कृषिविदयाकिटकशास्‍त्रवनस्‍पती विकृतीशास्‍त्रउदया‍नविदया, विस्‍तार शिक्षण आदी पाच विषयतज्ञांचा समावेश करण्‍यात आला आहे. छोटे मेळावेगटचर्चामार्गदर्शन प्रक्षेत्र भेट अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असुन हंगामी खरीप पिकेऊसफळपिकेभाजीपाला पिकेपीक संरक्षण व मुलस्‍थानी जलसंधारण आदी विषयावर तसेच रब्‍बी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांना शास्‍त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमात दोन्‍ही जिल्‍हयातील एकूण ५२ गांवे कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने प्रस्‍तावित केली असून एकूण प्रवास अंदाजे अंतर ४१०० कि. मी. होणार असून त्‍यासाठी अंदाजे १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.