Tuesday, October 10, 2017

वनामकृवित मृदशास्त्रज्ञाचे राज्यस्तरीय परिसंवादाचा समारोप


भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने 78 ऑक्टोबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मृद शास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, या परिसंवादाचा समारोप दिनांक 8 ऑक्टोबर रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू हे होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. . बी कडलग, डॉ. के. डी. पाटील, डॉ. विलास खर्चे व डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. महेश देशमुख आदीची प्रमुख उपस्थिती होत. कार्यक्रमात कु. निहाला जबीन या विद्यार्थीनीला युवा शास्त्रज्ञ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले तसेच उत्कृष्ट भित्तीपत्रक सादरीकरणाचा पुरस्कार डॉ. नंदकीशोर मेश्राम यांना देण्यात आला तसेच सहभागी शास्‍त्रज्ञांना प्रमाणपत्र देण्यात आले.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरुल म्‍हणाले की, शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संशोधनाच्‍या माध्‍यमातुन राज्‍यातील जमिनीची विभागवार पृथ:करण करून सुपीकता दर्शक नकाशे तयार करावेत. परिसंवादातील सहभागामुळे विद्यार्थ्यामध्ये संशोधनात्मक गुणवत्ता वाढीस मदत होते. मृद विज्ञान विषयात संशोधनावर आधारित लेख आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित करावेत, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
सदरिल दोन परिसंवादाच्‍या तांत्रिक सत्रा बदलत्या गरजेनुसार जमिन व पिकांचे शाश्वत आरोग्य या विषयावरील संशोधनावर सखोल चर्चा करण्यात आली. तांत्रिक सत्रातील शिफारसी सादर करण्‍यात आल्‍या असुन याचा भविष्यात उद्योग कृषि विकास यांना सुसंग तसेच जमिन व्यवस्थापन संबधीचे धोरण निश्चित करण्यास मदत होणार आहे. परिसंवादास राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील सुमारे 200 शास्त्रज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सय्यद ईस्माईल यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. परिसंवादाच्या याशस्वीतेसाठी डॉ. महेश देशमुख, सचिव डॉ. गणेश गायकवाड, उपसचिव तसेच डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. अनिल मोरे, डॉ. आर. एन. खंदारे, डॉ. एस. टी. शिराळे, प्रा. प्रभाकर अडसुळ, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, प्रा. गजभिये, डॉ. सदाशिव अडकिने, संतोष पिल्लेवाड, श्रीमती महावलकर, अजय चरकपल्ली व पदव्‍युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रमपुर्ण प्रयत्न केलेपुढील वर्षी भारतीय मृद विज्ञान संस्थाच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय परिसंवादाचे आयोजन राहुरी येथील हात्‍मा फुले कृषि विद्यापीठात होणार आहे.