Wednesday, November 1, 2017

वनामकृवित १५ वी महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सव इंद्रधनुष्‍य २०१७ स्‍पर्धेचे आयोजन

राज्‍यातील २० विद्यापीठातील विद्यार्थी कलावंत विविध २४ कलाप्रकारांत आपली कला सादर करणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात १५ वी महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सव इंद्रधनुष्‍य २०१७ स्‍पर्धेचे आयोजन दिनांक ५ ते ९ नोव्‍हेबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन उदघाटन विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या मैदानावर दिनांक ५ नोव्‍हेबंर रोजी सकाळी १० वाजता परभणीचे आमदार माडॉराहुल पाटील यांच्‍या हस्‍ते होणार असुन प्रसिध्‍द कवी माप्राइंद्रजित भालेराव यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती लाभणार आहेकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू माडॉबीव्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेततर दिनांक ९ नोव्‍हेबर रोजी समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम परभणीचे खासदार माश्रीसंजय जाधव यांच्‍या प्रमुख उपस्थित पार पाडणार आहे.
राज्‍यातील महाविद्यालयीन युवकांमधील कलागुणांना वाव मिळावा या हेतुने दरवर्षी सदरिल स्‍पर्धेचे आयोजन माननीय राज्‍यपाल कार्यालयाच्‍या आदेशानुसार करण्‍यात येतेयावर्षी आयोजनाचा मान प्रथमच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास प्राप्‍त झाला आहेमहोत्सव आयोजनाच्या तयारीचा राज्यपाल कार्यालयाने आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या आहेतसंगीतनृत्यसाहित्यरंगमंचीय आणि ललित कला अशा विभागांतील विविध २४ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कला सादर करणार आहेतमहोत्सवात शास्त्रीय गायनतालवाद्यसूरवाद्यआदिवासी नृत्यप्रश्नमंजुषावक्तृत्त्ववादविवादएकांकिकाप्रहसनमूक अभिनयनकलाचित्रकलापोस्टर मेकींगमातीकलाव्यंगचित्रेरांगोळीस्पॉट फोटोग्राफी अशा विविध २४ कलाप्रकारांत विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करतील.
सदरिल स्‍पर्धेत राज्‍यातील २० कृषी व अकृषि विद्यापीठातील साधारणतएक हजार स्‍पर्धक विद्यार्थ्‍यीविद्यार्थ्‍यीनी व राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील स्‍पर्धा निरिक्षक सहभागी होणार आहेसदरिल स्‍पर्धेचे आयोजन राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती माश्रीचेविद्यासागर राव यांच्‍या आदेशान्‍वय करण्‍यात आले आहेविद्यापीठात स्‍पर्धेची जय्यत तयारी करण्‍यात येत असुन माननीय कुलगुरू माडॉबीव्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍पर्धा यशस्‍वीतेसाठी विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले आहेअशी माहिती आयोजक शिक्षण संचालक डॉ विलास पाटील व आयोजन सचिव विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी दिली आहे.