Tuesday, November 7, 2017

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव - एकांकीका क्षणचित्रे

एकांकीका पाहतांना प्रेक्षकांचे डोळेही पाणावलेइंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सात एकांकिका स्‍पर्धेत एकुण 19 विद्यापीठ संघाने सहभाग घेतला होता. यावेळी परिक्षक म्‍हणुन सतीश पाटील, बाळकृष्‍ण धायगुडे, डॉ राजु पाटोदकर यांनी काम पाहिले. यात ट्राफिक, ड्रॉप, ती ते आणि...., तो पाऊस आणि टाफेरा, लकीर, आराधना, माणसं, हिय्या, मित्‍तर, बायोलॉजीकल वेस्‍ट, बुंद, कळत नकळत, एका स्‍वपन गर्भाचा मृत्‍यु, वो, द आऊटब्रस्‍ट आदी एकांकीका नाटकांनी प्रक्षेकांनी मोठा प्रतिसाद दिला. यात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने माणसातील माणुस संपत असुन माकडयाच्‍या मनातील संवेदना 'माणस' एकांकीकेस प्रक्षेकांनी दाद दिली. एकांकीका 'एका स्‍वपन गर्भाचा मृत्‍यु' यात द्रारिद्रयाचे विदारक चित्र सादर केले तर देवाच्‍या शोधात माणुस अंधश्रध्‍दा, बुवाबाजीच्‍या मागे कसा फरफट जात आहे, याचे चित्रण केलेल्‍या 'द आऊटब्रस्‍ट' एकांकीका पाहतांना प्रेक्षकांचे डोळे पाणावले. आजही समाजात विविध स्‍तरावर व पातळी स्‍त्रीयांना पुरूषांच्‍या वासनेस तोंड द्यावे लागते, स्‍त्रीयांची होणारी कुचंबणा एकांकीका 'वो' च्‍या माध्‍यमातुन सादर केली. विद्यार्थ्‍यांनी सादर केलेल्‍या सामाजिक प्रश्‍नावरील एकांकीका प्रेक्षकांच्‍या मनाला भिडल्‍या.दिनांक 6 नोंव्‍हेबर रोजी मृद कला स्‍पर्धेत एकुण 14 स्‍पर्धकांनी सहभाग घेऊन कामगार तसेच बालपणातील खेळ या विषयावर माती पासुन उत्‍कृष्‍ट कलाकृ‍ती साकारल्‍या. तसेच दिनांक 7 नोंव्‍हेबर रोजी व्‍यंत्रचित्र स्‍पर्धेत आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय राजकारण तसेच गर्दी या विषयावर बोलकी व्‍यंत्रचित्रे काढली, यात एकुण 15 स्‍पर्धक सहभागी झाले होते.