Wednesday, December 6, 2017

जमिनीचे आरोग्‍याचे सवंर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य..... शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

जागतिक मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणिक भारतीय मृदविज्ञान संस्था, शाखा परभणी संयुक्त विद्यमाने दिनांक 5 डिसेंबर रोजी आयोजीत जागतिक जागतीक मृदा दिन साजरा करण्‍यात आला. मृदा आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोणातुन शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील व विभाग प्रमुख डॉ सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर विद्यार्थी यांच्या सहकार्याने सकाळी 6.00 वाजता विद्यापीठ परीसर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी मृदा आरोग्याबाबत जनजागृती पत्रक नागरीकांना वाटुन मृद संवर्धन, सरंक्षण मृदा आरोग्याविषयी सगज करण्यात आले. मृदा दिन कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ सय्यद इस्माईल, डॉ. अे. एल. धमक, डॉ महेश देशमुख आदींची उस्थिती होती. मार्गदर्शन करतांना डॉ पाटील म्हणाले की, कृषि व्यावसायाचे जमिन हे मुख्य भांडवल असुन  मृदा आरोग्‍याचे मुलभुत शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य बिघडल्यास पीक उत्पन्नावर त्याचे अनिष्ट परिणाम होतात. त्यासाठी जमिनीचे आरोग्य सवंर्धन, सरंक्षण आणि जतन करणे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. यावेळी डॉ. सय्यद इस्माईल यांनी मृदा आरोग्यासाठी माती तपासणी तंत्राचा उपयोग हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास अत्यंत गरजेचे असल्‍याचे विशद केले. याप्रसंगी मृद विज्ञान संस्थेतर्फे मृदे विषयी जनजागृती करण्यासाठी जमिन आरोग्य पत्रिकाचे मान्यवंराच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. स्वाती झाडे तर आभार डॉ पपीता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागातील डॉ अनिल धमक, डॉ सुदाम शिराळे, डॉ गणेश गायकवाड, प्रा. सुनिल गलांडे, प्रा. प्रभाकर अडसुळ, श्री अनिल मोरे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री एस.एम. महावलकर, श्री अजय चरकपल्ली, गजानन क्षिरसागर व इतर कर्मचारी, श्री प्रमोद शिंगारे, मंगेश घोडे, वैभव बोंद्रे, प्रथम व व्दितीय वर्षातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.