Thursday, February 8, 2018

वनामकृविच्‍या प्रक्षेत्रावरील कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनासाठीच्‍या पी बी रोप संरक्षक धाग्‍याच्‍या प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनासाठीच्‍या पी आय इंडस्‍ट्रीजच्‍या पी बी रोप या संरक्षक धाग्‍याच्‍या प्रात्‍यक्षिके घेण्‍यात आले असुन प्रात्‍यक्षिक भेटीचे आयोजन दिनांक 8 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ जी के लोढे, कापुस विशेषतज्ञ डॉ के एस बेग, प्रभारी अधिकारी डॉ व्‍ही के खर्गखराटे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ एस एम तेलंग, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ आसेवार, डॉ यु एन आळसे, पी आय इंडस्‍ट्रीजचे संजय खर्चे, प्रविण जाधव व संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सन 2017 मधील खरिप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे राज्‍यातील कापसाचे अतोनात नुकसान झाले. पी बी रोप हे जपानी तंत्रज्ञान असुन भारतात पी आय इंडस्‍ट्रीजन आणले आहे. सद‍र पी बी रोप संरक्षक धाग्‍याची प्रक्षेत्र चाचणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कपाशीवर मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर घेण्‍यात आले आहे. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठातील प्रक्षेत्रावर घेण्‍यात आलेल्‍या प्रात्‍यक्षिकात आशादायक निर्ष्‍कष हाती आले असुन हे तंत्रज्ञान एकात्मिक किड वयवस्‍थापनामध्‍ये एक महत्‍वाची भुमिका बजावु शकतो व गुलाबी बोंडअळीचा कपाशीवरील प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.
सदरिल तंत्रज्ञान विषयी थोडक्‍यात माहिती
निसर्गात किटक हे विविध पध्‍दतींचा वापर करत रासायनिक संदेशवहनाने एकमेकांशी संवाद साधतात. पतंगवर्गीय किटकांमध्‍ये प्रौढ मादी ही एक अशाच प्रकारे संदेशवाहक सोडते, ज्‍याला कामगंध किंवा फेरोमन असेही म्‍हणतात. प्रौढ नर या कामगंधाकडे आकर्षित होऊन त्‍यांचे प्रजनन होते व पुढील पिढी जन्‍मास येते. किडनियंत्रणाच परंपरागत पध्‍दतीमध्‍ये कामगंधाचा वापर ही एक प्रभावी पण दुर्लक्षीत पध्‍दत आहे. कामगंध हा एकात्मिक किड व्‍यवस्‍थापनामध्‍ये एक महत्‍वाची भुमिका बजावतो. गुलाबी बोंडअळीची मादी ही गॉसिप्‍लुर नावाचा कामगंध सोडते, ज्‍याकडे गुलाबी बोंडअळीचा नर आकर्षित होऊन त्‍यांचे प्रजनन होते. पी बी रोप हा 20 सेमी धागा असुन ज्‍यामध्‍ये गॉसिप्‍लुर कामगंध भरलेला असतो. कपाशीचे पिक 35 ते 40 दिवसांचे असते, तेव्‍हा हा धागा शेतात एक वेळेसच बांधायचा असतो. हा धागा शेताच्‍या कडेने व आत समान अंतरावर बांधावयाचा असुन एकदा पी बी रोप बांधल्‍यावर 90 ते 100 दिवसांपर्यंत गॉसिप्‍लुर सोडत राहतो. या धाग्‍यातुन निघालेल्‍या गॉसिप्‍लुर मुळे गुलाबी बोंडअळीचा नर मादीला शोधु शकत नाही, ज्‍यामुळे गुलाबी बोंडअळीच्‍या प्रजननास आळा बसतो. हया कमी झालेल्‍या प्रजननामुळे गुलाबी बोंडअळीची संख्‍या पिढयानपिढया कमी होते व अशा प्रकारे गुलाबी बोंडअळीच प्रादुर्भावास अटकाव होतो. पी बी रोपचा वापर जास्‍त क्षेत्रावर केल्‍यावर त्‍याचा अधिक प्रभाव होतो. यामुळे गुलाबी बोंडअळीच्‍या नियंत्रणासाठीच्‍या किटकनाशकांचा वापर कमी होतो. त्‍यामुळे मित्र किटींची संख्‍येत वाढ होते.
सदरिल प्रात्‍यक्षिक कार्यक्रमास मराठवाडयातील अनेक शेतक-यांनी सहभाग नोंदवला व तंत्रज्ञानाची माहिती घेतली.