Saturday, May 12, 2018

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रास उत्‍कृष्‍ट सादरिकरण पुरस्‍कार


कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्‍था (अटारी), पुणे व राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 5 ते 7 मे रोजी तीन दिवसीय वार्षिक विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेत गुजरात, गोवा व महाराष्‍ट्र राज्‍यातील एकुण 79 कृषि विज्ञान केंद्राचा सहभाग घेतला. कार्यशाळेचे उदघाटनास राहुरी येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. के पी विश्‍वनाथा, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ ए के सिंग, परभणी वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले तसेच इतर कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत तिन्‍ही राज्‍यातील कृषि विस्‍तारात वापरलेल्‍या विविध तंत्रज्ञान व पध्‍दतीची चर्चा करण्‍यात येऊन प्रत्‍येक कृषि विज्ञान केंद्राच्‍या विस्‍तार कार्याचा आढावा घेण्‍यात आला तसेच सन 2018-19 साली घेण्‍यात येणा-या कृषि विस्‍ताराच्‍या कार्यक्रमाविषयी सादरीकरण करण्‍यात आले. कार्यशाळेच्‍या समारोपात तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राने 2017-18 साली केलेल्‍या कृषि विस्‍तार कार्याचे कौतुक करून उत्‍कृष्‍ट सादरीकरणाचा पुरस्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते देण्‍यात आला. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महा‍संचालक डॉ व्‍ही पी चहल, अटारीचे संचालक डॉ लखन सिंग, परभणी कृषि विद्यापीठाचे डॉ पी जी इंगोले, डॉ किरण कोकाटे आदी मान्‍यवर उपस्थित होते.