Wednesday, July 4, 2018

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे जांब येथे वृक्ष लागवड व वृक्षदिंडीचे आयोजन

कृषी दिनाच्‍या पार्श्‍वभुमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांच्‍या कृषीकन्‍यांनी मौजे जांब (ता.जि. परभणी) येथे दिनांक 3 जुलै रोजी वृक्ष लागवड व वृक्षदींडीचे आयोजन केले होते. कार्यक्रमास सरपंच संजय स्‍वामी, उपसरपंच अजय रेंगे, मुख्‍याध्‍यापक श्री वैद्य, श्री कुरेवार, प्रगतशील शेतकरी भगवानराव रेंगे, डॉ पपिता गौरखेडे, डॉ स्‍वाती झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृ‍षीकन्‍यांनी गावातुन वृक्षदींडी काढली तसेच शाळेच्‍या परिसरात वृक्ष लागवड करण्‍यात आली. शेतक-यांना मोगरा, अशोका, लिंबोनी, चिंच, आवळा आदीं‍ विविध रोपांचे वाटप करण्‍यात आले. स्‍वच्‍छता अभियान घेण्‍यात येऊन प्‍लॉस्टिक मुक्‍तीचा संकल्‍प करण्‍यात आला. शालेय विद्यार्थ्‍यांसाठी शेतीविषयावर निबंधस्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले, उत्‍कृष्‍ट निबंधास मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बक्षीस वाटप करण्‍यात आले. प्रगतशील शेतकरी भगवानराव रेंगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गौरखेडे यांनी तर सुत्रसंचालन कृषीकन्‍या तेजस्‍वीनी भद्रे हिने केले. यावेळी मनेष यादव, बाकळे मॅडम, सुतार मॅडम आदीसह गावकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ पपिता गौरखेडे व डॉ स्‍वाती झाडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषिकन्‍यांनी पुढाकार घेतला.