Wednesday, August 29, 2018

मौजे मानोली (ता.मानवत) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न


वसंतराव नाईक, मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण (आत्मा) कृषि विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 ऑगस्‍ट रोजी मौजे मानोली (ता.मानवत) येथे शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास संरपंच ज्ञानोबा शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण बॅकाचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. भिसे, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ सी बी लटपटे, डी. डी. भिसे, पी.एम. जंगम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सी. बी. लटपटे यांनी गावातील शेतकरी पुरुषोत्तम शिंदे यांच्‍या शेतावर तुती लागवटीची पटटा पध्दत, खत पाणी व्यवस्थाप, रेशीम कीटक संगोपनासाठी रॅकची रचना आदी विषयी प्रात्यक्षिकाव्‍दारे मार्गदर्शन केले. तसेच कापसावरील गुलाबी बोडअळीचे एकात्मिक व्यवस्‍थापनावर मार्गदर्शन करतांना शेतक-यांनी प्रती एकरी आठ कामगंध सापळे लावण्‍याचा सल्‍ला दिला. कापसाच्या डोम कळया गोळा करुन नष्ट करून योग्‍य किटकनाशकाची फवारणी करावी, फवारणी करतांना डोळयावर गॉगल,  हॅन्ड ग्लोज,  चेह-यावर मास्क वापरण्याचा सल्ला दिला. डी. डी. भिसे आणि पी. एम. जंगम यांनी शेतक-यांनी बँके कडून कर्ज घेण्यासाठी प्रस्ताव परिपुर्णरित्या तयार करुनच दाखल करण्याविषयी सुचवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि पर्यवेक्षक जी. आर. शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन शंकर मांडे यांनी केले तर आभार कृषि विभागाचे श्री. माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सुनिल शिंदे, तलाठी अरंविद चव्हाण, शंकर मांडे आदीसह समस्त गावक-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाशेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, August 28, 2018

परभणी कृषि महाविद्यालयाची कु. रंगोली पडघन हिला रासेयोचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कार

महाराष्‍ट्र शासनाचा राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१७१८ साठीचा सर्वोत्‍कृष्‍ट स्‍वयंसेवक पुरस्‍कारासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्याल याची विद्यार्थ्‍यींनी कु. रंगोली अरूण पडघन हिची निवड झाली असुन कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्‍कारासाठी औंढा नागनाथ येथील एम. आय. पी. अन्‍नतंत्र महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. श्री खाजा अब्‍दुल खदीर यांची निवड झाली आहे. याबाबत दोघांचा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते दिनांक २८ ऑगस्‍ट रोजी सत्‍कार करण्‍यात आला, यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ पपिता गौरखेडे, श्री अरूण पडघन, श्री डोईजड आदी उपस्थित होते. पुरस्‍काराबाबत अभिनंदन करतांना कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यी व कर्मचारी यांचा सन्‍मान हे विद्यापीठासाठी गौरवाची बाब असुन मुलीं विविध क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करित आहेत. रासेयोनेच्‍या माध्‍यमातुन सामाजिक सेवा करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी प्राप्‍त होते. सदरिल पुरस्‍कार हा रासेयो अंतर्गत नि:स्‍वार्थ भावनेने व निष्‍ठेने समाजाची सेवा करणा-यांना प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांचा सेवेचा यथोचित गौरव करण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍य शासनाकडुन देण्‍यात येतो.

Saturday, August 25, 2018

परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी केरळच्‍या पुरग्रस्‍तांसाठी जमा केला मदतनिधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी प्रकाश इंगोले, सुमित कामन्‍ना व रोहित देशमुख यांनी केरळच्‍या पुरग्रस्‍तांना मदतनिधी म्‍हणुन विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी यांनी स्‍व: इच्‍छेने देऊ केलेली मदत जमा करून दिनांक 24 ऑगस्‍ट रोजी जिल्‍हाधिकारी मा. श्री. पी. शिवशंकर यांना प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या हस्‍ते सुपूर्त करण्‍यात आली. सदरिल कार्यासाठी प्रा. आर व्‍ही चव्‍हाण व प्रा. पी के वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Friday, August 24, 2018

सोयाबीनवर विविध किड व रोगांचा प्रादुर्भाव

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
शेंगा करपा

सध्या बहुतांश: ठिकाणी सोयाबीन पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असुन यावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी त्‍वरीत कीटकनाशकाची फवारणी करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यू. एन. आळसे व किडकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी दिला आहे. प्रती एकर ६० मिली क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % किंवा १४० मिली इंडाक्झाकार्ब १५.८ % किंवा १८० मिली स्पाइनेटोरॅम ११.७ %, किंवा ५० मिली थायमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.३ % यापैकी कोणत्‍याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. हे किटकनाशकाचे प्रमाण फवारणी पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकर याप्रमाणेच वापरावे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनवर काही ठिकाणी शेंगा करपा व  चारकोल रॉट दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून प्रती एकरी कार्बेन्डेझिम १२% + मॅन्कोझेब ६३% या संयुक्त बुरशीनाशकाची २०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.
शेंगा पोखरणारी अळी


तंबाखूवरील पाने खाणारी अळी

Sunday, August 19, 2018

जो व्‍यक्‍ती आपल्‍या सामर्थ्‍यांचा सदोपयोग करतो, तोच खरा मनुष्‍य... प्रसिध्‍द विव्‍दान पंडीत बृजेश शास्‍त्री

वनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन

बौध्‍दीक कौशल्‍य, वाणी कौशल्‍य, शारीरिक शक्‍ती, मनशक्‍ती आणि आत्‍मीक शक्‍ती या पाच सामर्थ्‍याचा उपयोग समाजाच्‍या प्रगतीसाठी झाला पाहिजे. जो व्‍यक्‍ती आपल्‍या सामर्थ्‍यांचा सदोपयोग करतो, तोच खरा मनुष्‍य आहे, असे प्रतिपादन गाजीयाबाद (उत्‍तर प्रदेश) येथील प्रसिध्‍द विव्‍दान पंडीत बृजेश शास्‍त्री यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक १६ ऑगस्‍ट रोजी मनुष्‍य जीवन की सार्थकता या विषयावर आयोजित व्‍याख्‍याना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते, तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ एच व्‍ही कालपांडे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंडीत बृजेश शास्‍त्री पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीला सन्‍मान पाहिजे असतो, प्रत्‍येकाला सन्‍मान दिला तर सन्‍मान मिळतो. दुस-याच्‍या सुख - दु:खात आपण सहभागी झाले पाहिजे. आधी स्‍वत: मध्ये सुधारणा करा, तेव्‍हा जग सुधारेल. स्‍वत:तील कमतरता ओळखा, स्‍वत:तील चुकांचा स्‍वीकार करा तरच सुधारणा शक्‍य आहे.  
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, आज प्रत्‍येक व्‍यक्‍ती संपत्‍ती कमावण्‍यात व्‍यस्‍त आहे, त्‍यामुळे आपण मुल्‍य शिक्षणापासुन दुर जात आहोत. विशेषत: विद्यार्थ्‍यी मुल्‍य शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. आपल्‍या देशाला मोठा सांस्‍कृतिक वारसा लाभला आहे. वाचन संस्‍कृती बंद होत आहे, वाचन संस्‍कृती जपण्‍याची गरज आहे. सतत चिंतन प्रक्रिया चालु पाहिजे. मनातील नकारत्‍मक विचार कमी केल्‍यानंतर मनातील रिकामी झालेल्‍या जागेत सकारत्‍मक विचार भरण्‍याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, August 18, 2018

मराठवाडयात काही ठिकाणी कापसावर आकस्मीक मर

वनामकृविच्या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला
कापुस पीक सध्या फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत असुन मराठवाडयात मागील तीन आठवडयापासुन पावसाचा खंड पडला आणि त्यानंतर दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. त्याचा परीणाम असा झाला की, कापसामध्ये आकस्मिक मर दिसुन येत आहे. हा कुठला रोग नसुन कापसातील विकृति आहे. सतत १५ दिवस पाण्याचा ताण पडला आणि पाणी दिले किंवा पाऊस पडला तरी मर होते. प्रखर सुर्यप्रकाश किंवा सतत ढगाळ वातावरण यामुळे ही मर दिसते. जास्त पाणी झाले तरीही मर होते. या विविध कारणांपैकी एक कारण मर येण्यासाठी पुरेसा आहे. अशा परिस्थितीत कापुस पीक मुळावाटे अन्न घेवू शकत नाही. अन्नपुरवठा बंद झाल्यामुळे पीक मलूल होते व सुकल्यासारखे दिसते. यासाठी शेतकरी बंधुनी घाबरुन न जाता साधे सोपे उपाय करावेत. प्रथमत: शेतामधुन पाण्याचा निचरा करावा. जास्तीचे पाणी शेतातून काढून टाकावे. त्यानंतर १५ ग्रॅम युरिया + १५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश + ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात टाकून चांगले मिसळून घ्यावे. हे द्रावण १०० ते १५० मि. ली. उमळलेल्या झाडाला टाकून आळवणी करावी. यामुळे पीकाला लगेच अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर करावा. जसजस वापसा होईल तसतसे पीकात सुधारणा होईल. जमिनीत हवा आणि पाण्याचे प्रमाण सारखे झाले की मुळे अन्न घ्यायला सुरुवात करतात आणि मर विकृति हळूहळू कमी होते, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी दिला.

Friday, August 17, 2018

शेतकरी समाजातील अत्‍यंत प्रामाणिक व्‍यक्‍ती.......प्रा. डॉ. सरबजित सिंह

वनामकृवित आयोजित स्‍वयंसेवकाची प्रबोधन कार्यशाळेत प्रतिपादन

देशात अनेक व्‍यक्‍ती कर्जबाजारी आहेत, परंतु ते आत्‍महत्‍या करण्‍याचा विचारही करित नाहीत. परंतु कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्‍महत्‍या करत आहे. शेतकरी हा समाजातील अति महत्‍वाचा घटक असुन तो अत्‍यंत प्रामाणिक आहे, तो  संवेदनशील आहे, असे प्रतिपादन लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठाचे कृषि पत्रकारीता विभागाचे प्रा. डॉ सरबजित सिंह यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असेलेल्‍या कृषी महाविद्यालयातील विस्‍तार शिक्षण विभाग व राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शेतकरी कुटूबांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीच्‍या माध्‍यमातुन शेतकरी आत्‍महत्‍या बाबींची मिमांसाया प्रकल्‍पांतर्गत दिनांक 16 ऑगस्‍ट रोजी आयोजित स्‍वयंसेवकांची प्रबोधन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ डि बी देवसरकर, डॉ राकेश आहिरे, मनोविकार तज्ञ डॉ तारिक अन्‍सारी, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ किशोर सुरवसे, डॉ अमर गाडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. सरबजित सिंह पुढे म्‍हणाले की, शेतकरी हा अन्‍नदाता आहे, शेतक-यांप्रती समाजातील संवेदशीलता कमी होत आहे. व्‍यक्‍ती–व्‍यक्‍ती मधील संवाद कमी होत आहे. शेतक-यांना आर्थिक पाठबळासोबतच सामाजिक व मानसिक आधाराची गरज आहे. शेती व शेतीशी निगडीत बाबींमुळे शेतकरी विवंचनेत आहेच, त्‍याच सोबतच मुलींचे लग्‍न, लग्‍नात होणार खर्च, हुंडाप्रथा, मुलांचा शैक्षणिक खर्च आदीं बाबींही यास कारणीभुत आहेत, यासाठी साधेपणाने लग्‍न, सामुदायिक विवाह आदी गोंष्‍टी समाजात रूचवाव्‍या लागतील.  
अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ विलास पाटिल म्हणाले की, कृषिचे विद्यार्थ्‍यी अनेक सामाजिक कार्यात हिरारिरीने सहभाग घेत आहेत. विद्यापीठाचा उमेद कार्यक्रम व विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतकरी उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यत तंत्रज्ञान पोहचविण्‍यासोबतच शेतक-यांना मानसिक आधार देण्‍याचा विद्यापीठ प्रयत्‍न करित आहेत. यावर्षी विद्यार्थ्‍यी कृषीदुत व कृषिकन्‍या गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत विविध गावांत माहिती देत आहेत, निश्चितच ही कौतुकास्‍पद बाब असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 
कार्यशाळेत मनोविकार तज्ञ डॉ तारिक अन्‍सारी यांनी स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना अत्‍यंत तणावात असलेल्‍या व्‍यक्‍तींची लक्षणे सांगुन अशा शेतक-यांना तातडीने मानस उपचाराची गरज असते, यासाठी सरकारी दवाखान्‍यात प्रेरणा या प्रकल्‍पाच्‍या वैद्यकिय अधिका-यांशी संपर्क साधावा किंवा हेल्‍पलाईन नंबर 104 या क्रमांकावर त्‍वरित संपर्क करावा.
कार्यशाळेत स्‍वयंसेवक निलेश बोरे यांनी प्रकल्‍पात कार्य करतांना आलेला अनुभव सांगितला. कार्यक्रमात प्रकल्‍पांतर्गत उत्‍कृष्‍ट कार्य केलेल्‍या स्‍वयंसेवकांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचलन विभाग प्रमुख डॉ. राकेश आहिरे यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले.


कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जे व्‍ही एकाळे, डॉ पी आर देशमुख, डॉ आर पी कदम, श्री आर बी लोंढे, श्री सी एच नखाते, श्री खताळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Thursday, August 16, 2018

वनामकृवितील केरळच्‍या विद्यार्थ्‍यांनी फुलांची पारंपारिक रांगोळी काढुण साजरा केला ओणम

ओणम राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्रतिक......कुलगरू मा. डॉ. अशोक ढवण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण घेत असलेले केरळ राज्‍यातील विद्यार्थ्‍यांनी दिनांक १६ ऑगस्ट रोजी ओणम सण साजरा केला. केरळ राज्‍यातील सर्वात मोठा सण असुन या सणात फुलांच्‍या रांगोळीचे विशेष महत्‍व असते, या रंगोळीला ओणमपुक्‍कलम असे म्‍हणतात. विद्यापीठातील केरळच्‍या विद्यार्थ्‍यांनी फुलांची पारंपारीक रंगोळी काढली. या रांगोळीचे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी प्रशंसा केली. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. विशेषत: विद्यापीठात विविध कार्यासाठी आलेले मान्‍यवरांनीही हजेरी लावली होती, यात पंजाब कृषि विद्यापीठाचे कृषि पत्रकार विभागाचे प्रा. डॉ. सरबजीत सिंग, गाझीयाबाद (उत्‍तर प्रदेश) येथील विव्‍दान पंडित ब्र‍जेश शास्‍त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, पंजाब, उत्‍तर प्रदेश व महाराष्‍ट्र आदी विविध राज्‍यांतील व्‍यक्‍ती केरळ राज्‍यातील विद्या‍र्थ्‍यी साजरा करत असलेल्‍या ओणम सणात सहभागी आहेत, हे एक राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्रतिक आहे.

देशाला अन्‍नसुरक्षा मिळुन देण्‍यात कृषि विद्यापीठांची निर्णायक भुमिका.....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित स्‍वांतत्र्य दिन उत्‍साहात साजरा

स्‍वातंत्रोत्‍तर काळामध्‍ये देशाला अन्‍नसुरक्षा मिळुन देण्‍यात कृषि विद्यापीठांची एक निर्णायक अशी भुमिका असुन राज्‍यातील तसेच मराठवाडयातील कृषी विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थ्‍यी आणि संपुर्ण समाज यांच्‍या सामाजिक व आर्थिक उन्‍नतीसाठी विद्यापीठ सतत कार्यरत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७२ व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ हेमांगिनी संरबेकर, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, कृषि विकासात विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या तिन्‍हीच्‍या समन्‍वयातुन योग्‍यरित्‍या कार्य करत आहे. कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाने देशाला व राज्‍याला अनेक अधिकारी व कर्मचारी दिले आहेत. परंतु आज गरज आहे, कृषि उद्योजक निर्माण करण्‍याची, यासाठी गेल्‍या वर्षी विद्यापीठाने स्‍वीकारलेल्‍या पाचव्‍या अधिष्‍ठाता समिती शिफारशीं निश्चितच उपयुक्‍त ठरणार आहे. विविध पिकांचे वाण विद्यापीठाने विकसित केली आहेत, त्‍याचा शेतक-यांना निश्चितच फायदा होत आहे. यावर्षी विद्यापीठाने विकसित केलेला देशातील पहिला जैवसमृध्‍द परभणी शक्‍ती या ज्‍वारीच्‍या वाणांची भर पडली आहे. यापुढेही कृषि संशोधनात भरीव कामगिरी करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. मनुष्‍यबळाच्‍या मर्यादा असतांनाही कृषि तंत्रज्ञानाच्‍या विस्‍ताराचे कार्य योग्‍यरित्‍या चालु आहे. विशेषत: यावर्षी गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापन मोहिमेत कृषि पदवीचे कृषिदुत व कृषिकन्‍या चांगले कार्य करित आहेत. विद्यापीठाचा संपुर्ण परिसर स्‍वच्‍छ, सुंदर व पर्यावरण पुरक करण्‍याचा आपण सर्व प्रयत्‍न करत आहोतच, परंतु यासर्व बाबीं केवळ अभियांनापुरते मर्यादी न राहता, आपल्‍या सवयीचा भाग झाला पाहिजे. प्राध्‍यापक हे समाजातील आदर्श व्‍यक्‍ती असुन प्राध्‍यापकांच्‍या प्रत्‍येक कृ‍तीकडे समाजाचे लक्ष असते, त्‍यामुळे प्राध्‍यापकांचे आचरण आदर्शवत असले पाहिजे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. देशाच्‍या स्‍वातंत्र्याकरिता ज्‍यांनी आपले बलिदान दिले व स्‍वातंत्र्यानंतर ज्‍यांनी सुराज्‍य निर्मातीसाठी आपले आयुष्‍य वेचले, त्‍या सर्वांना त्‍यांनी अभिवादन करून स्‍वातंत्र्य दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. 
यावेळी राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी छात्रसेना अधिकारी लेफ्ट डॉ आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांनी तंबाखु मुक्‍तीची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्य वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


Saturday, August 11, 2018

कापसातील सद्यस्थित दिसत असलेल्‍या डोमकळया त्‍वरित वेचुन नष्ट करा......किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर

वनामकृवि व कृषि विभागाच्‍या वतीने परभणी जिल्‍हयातील विविध गावात राबविण्‍यात येत आहे गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन विषेश मोहिम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात येणारा विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतीवरी उपक्रम, कृषि विभाग व परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या रावेच्‍या कृषिकन्‍या यांच्‍या माध्‍यमातुन दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी मानवत तालुक्‍यातील देऊलगांव आवचार, मानोली, कोल्‍हा, झरी आदी ठिकाणी गुलाबी बोंडअळी व्‍यवस्थापन मोहिम राबविण्‍यात आली. कार्यक्रमास किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, तालुका कृषि अधिकारी श्री. के एस गायकवाड, डॉ अनंत बडगुजर, डॉ एस जी पुरी, डॉ पपिता गौरखेड, कृषी अधिकारी जी आर शिंदे, डॉ एन आर सिरस आदीसह गावातील सरपंच उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना किटकशास्‍त्रज्ञ डॉ पी आर झंवर म्‍हणाले की, सद्यस्थितीत निबोंळी अर्क, प्रोफेनेफोस व प्रोफेनेफोस अधिक सायपरमेथ्रिन हे संयुक्‍त किटकनाशकांची फवारणी उपयुक्‍त ठरणार असुन कापसात दिसत असलेल्‍या डोमकळया त्‍वरित वेचुन नष्‍ट करण्‍याचा सल्‍ला दिला. तर डॉ अनंत बडगुजर यांनी कामगंध सापळयाचे महत्‍व सांगुन सामुदायिकरित्‍या सर्व शेतक-यांनी कामगंध सापळे मोठया प्रमाणात लावल्‍यास कमी खर्चात गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापनास मोठा हातभार लाभणार आहे. कामगंध सापळयातील लुर वेळोवेळी बदलण्‍याची काळजी शेतक-यांनी घ्‍यावी असे सांगितले. यावेळी काही शेतक-यांच्‍या शेतावरील कापुस पिकाच्‍या प्रक्षेत्राला देण्‍यात येऊन कामगंध सापळे योग्‍य पध्‍दतीने लावण्‍याचे प्रात्‍यक्षिकही दाखविण्‍यात आले.

या व्‍यतीरिक्‍त दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी बायर कंपनी व कृषिदुत यांनी परभणी तालुक्‍यातील सोन्‍ना, उमरी, पिंपळगांव ढगे, मांडाखळी येथे मोहिम राबविली येथे किडकनाशकांची सुरक्षीत फवारणीचे प्रात्‍यक्षिक दाखवु मार्गदर्शन करण्‍यात आले तसेच एकात्मिक शेती पध्‍दती येथे कार्यरत असलेले कृषिदुतांना डॉ एस डी शिराळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मौजे पारवा येथे ही कार्यक्रम घेतला.

कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन व शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन विशेष मोहिम 27 कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील पाचशे पेक्षा जास्‍त गावात राबविण्‍याचा उद्दीष्‍ट आहे.

या आठवडयाभरात विविध संलग्‍न व घटक महाविद्यालयातील कृषिकन्‍या व कृषीदुतांना कृषि विभागाच्‍या सहकार्याने विविध ठिकाणी मोहिम राबविण्‍यात आली. यात कै. राजीव गांधी कृषी महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांना कुंभकर्ण टाकळी, नांदापुर, कोक, धर्मापुरी, मोहापुर या ठिकाणी कार्यक्रम घेतला. पाथरी येथील कृषी महाविद्यालयाने सिमुर गव्‍हाण व बोर गव्‍हाण येथे आत्‍मा विभागाच्‍या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कै. अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालयाने मिरखेल, माखणी, फुलकळस, बलसा, पांढरी या गावात कार्यक्रम घेतला. सेलु येथील कृषी महाविद्यालयाने खुपसा, मोरेश्‍वर, घोडके पिंप्री, वाघ पिंप्री, शिराळा, ताडबोरगांव, निपाणी टाकळी, किन्‍हाळा, भोगांव, पानेरा या गांवात मोहिम राबविली. मरखेल ता. देगलुर जि नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालयाने देगलुर तालुक्‍यातील सांगवी, होट्टल, दावनगिर, करखेड, करखेड वाडी, टाकळी, कारेगांव येथे ही विशेष मोहिम राबविली.







क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत विविध गावांत मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येत असलेल्‍या पिकावरील कीड - रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सर्वत्र कीड रोगाचे सर्वेक्षण करण्यात येत असून परभणी जिल्हयात काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आला आहे. त्या अनुषंगाने गुलाबी बोंडअळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी दिनांक ८ ऑगस्ट रोजी किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, तालूका कृषि अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी के. एम. जाधव यांनी परभणी जिल्‍हयातील विविध गावांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. यात पिंपळगाव (ठोंबरे), उमरी, बाभळगाव, झरी, मिर्झापूर, आर्वी साडेगाव येथील गुलाबी बोंडअळीग्रस्त क्षेत्राना भेटी देऊन उपाय योजना सुचविल्या.
जे साडेगाव येथे आयोजीत शेतकरी मेळयाव्यात बोलतांना डॉ. अनंत बडगुजर यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब केल्‍यास कमी खर्चात योग्य वेळी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करता येते असे सांगितले. शेतकरी बांधवांनी खालील प्रमाणे उपाययोजना तातडीने कराव्यात असे वाहन केले.
·        सुरुवातीस कीडीच्या संनियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे मोठया प्रमाणात पतंग एकत्रित गोळा करण्यासाठी हेक्टरी वीस कामगंध सापळे लावावेत जेणे करुन गुलाबी बोंडअळीचे पंतग एकत्रित मोठया प्रमाणात कर्षित होऊन नर मादी मिलनामध्ये अडथळा आणता येईल.
·        उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा ट्रॉयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधील माशीचा वापर करावा. (1.5 लाख अंडी / हेक्टर)
·        पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
·        कापूस पिकांच्या फुलामध्ये अळी असल्यास अळीग्रस्त फुले म्हणजेच डोमकळया हाताने तोडून अळीसकट नष्ट कराव्यात.
·        निंबोळी अर्काची फवारणी करावी.
·        आर्थिक नुकसानीची पातळी एक जिवंत अळी/10 बोंडे/फुले किंवा 8 पतंग/सापळा सलग 3 रात्री दिसून आल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर झाला आहे हे ग्रहीत धरुन योग्‍य त्‍या किटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.