Sunday, September 30, 2018

कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित

कर्मयोगी कै. अंकुशराव टोपे यांच्‍या जन्‍मदिनीनिमित्‍त दिनांक 26 सप्‍टेबर रोजी अंबड येथे झालेल्‍या कार्यक्रमात यशवंतराव चव्‍हाण साहित्यिक व सांस्‍कृतीक प्रतिष्‍ठान, जालना, समर्थ दूध संघ तसेच मत्‍स्‍योदरी विद्यालयातर्फे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे विद्यापीठात विस्‍तार शिक्षण संचालक असताना त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली सन 2013-14 व 2014-15 साली मराठवाडयातील दुष्‍काळी पार्श्‍वभुमीवर विद्यापीठाच्‍या वतीने मोसंबी फळबाग वाचविण्‍यासाठी विशेष मोहिम राबविण्‍यात आली होती तसेच त्‍यांच्‍याच काळात विविध विस्‍तार कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आले. या त्‍यांच्‍या कृषि विस्‍तार क्षेत्रातील योगदानाबाबत त्‍यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानीत करून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास आमदार मा श्री राजेश टोपे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष श्री सतीश टोपे, श्री विलास शिंदे, मध्‍यवर्ती बॅकेचे अध्‍यक्ष श्री मनोज मरकड, डॉ निसार देशमुख, श्री उत्‍तमराव पवार, श्री भाऊसाहेब कनके, श्री रघुनाथ तौर, श्री सतीश होंडे, प्राचार्य श्री भगवतराव कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कारही प्रदान करण्‍यात आले. कार्यक्रमास मोठया संख्‍येने नागरिक उपस्थिती होते.
सदरिल पुरस्‍कार हा माननीय कुलगुरू यांनी मराठवाडयातील शेतकरी तसेच मोसंबी फळबाग वाचविण्‍यासाठी विशेष मोहिम राबविण्‍यात अविरत परिश्रम केलेल्‍या संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र येथील शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक तसेच कृषि विभागातील कृषि विस्‍तारकांना समर्पित करून त्‍यांच्‍याच सहकार्याने ही मोहिम राबविण्‍यात आल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Saturday, September 29, 2018

सामाजिक विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

परभणी : वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिना साजरा करण्यात आलाकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्या डॉ हेमांगिनी सरंबेकर या होत्‍यायाप्रसंगी महाविद्यालयाच्या सहाय्यक माहिती अधिकारी डॉजया बंगाळे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 या विषयी मार्गदर्शन केलेअध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करतांना प्राचार्या डॉहेमांगिनी सरंबेकर म्‍हणाल्‍या कीमाहिती अधिकारांतर्गत असलेल्‍या प्रत्‍येकांना आपल्‍या कर्तव्याची जाणीव असली पाहिजेयावेळी जागतिक हृदयरोग दिना निमित्तही उपस्थितांना हृदय स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन करण्‍यात आलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्षा डॉसुनिता काळे यांनी केलेयावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीप्राध्यापक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Thursday, September 27, 2018

कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी प्रामाणिकपणा व कठिण परिश्रमाशिवाय पर्याय नाही.......स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे

वनामकृवित आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
महाविद्यालयीन जीवनातील चार वर्ष हे आयुष्‍यातील अतिशय महत्‍वाचे वर्ष असतात, या वर्षात स्‍वत:चे व्‍यक्‍तीमत्‍व विकसित करण्‍याची संधी असते. या मोलाच्या काळात नकारात्‍मक गोष्‍टीत वेळ न घालवता, आपले ध्‍येय निश्चित करा. अनेक विद्यार्थ्‍यी ध्‍येयविना जगतात आणि भविष्‍यात अयशस्‍वी होतात. कोणत्‍याही क्षेत्रात यश प्राप्‍त करण्‍यासाठी प्रामाणिकपणा व कठिण परिश्रमाशिवाय पर्याय ना‍ही, असे प्रतिपादन स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने नेतृत्‍व विकास व भारतीय सशस्‍त्र दलातील रोजगार संधी या विषयावर दिनांक 27 रोजी आयोजित व्‍याख्‍यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ हिराचंद काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होते.

स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे पुढे म्‍हणाले की, आज स्‍पर्धेचे युग आहे, स्‍वत:तील बलस्‍थाने व कमतरता ओळखा, कमतरतेवर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न करा. बाहेरून कोणी कीतीही मार्गदर्शन केले तरी तुम्‍ही आतुन पेटले पाहिजे तरच यश मिळते. स्‍वत:तील आत्‍मविश्‍वास वाढला पाहिजे, त्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करा. 

अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी मर्यादांचे पालन केले पाहिजे. विद्यापीठात उपलब्‍ध सुविधांचा विद्यार्थ्‍यींनी चांगला उपयोग करावा व आपले करियर घडवावे. स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे यांच्‍या बाबत विद्यापीठास सार्थ अभिमान असुन त्‍यांच्‍या सारखे अनेक विद्यार्थ्‍यी विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांच्‍या करिअरच्‍या दृष्‍टीने विविध शंकाचे निरासरन श्री प्रकाश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

श्री प्रकाश शिंदे हे भारतीय वायुसेनेत स्क्वाड्रन लिडर म्‍हणुन कार्यरत असुन कुंटूबाच्‍या हलाखीच्या परिस्थितीत परभणी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातुन २००९ साली बी. टेक. पदवी पुर्ण केली. कृषि महाविद्यालयाच्‍या २००८ बॅचचे राष्‍ट्रीय छात्र सेनेचे ते छात्रसैनिक होत. देशाचे माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्‍या मराठवाडा दौऱ्याप्रसंगी विमानाच्या वैमानिक पथकात ही त्‍यांनी कार्य केले असुन गेल्‍याच आठवडयात त्‍यांना माननीय पंतप्रधानासोबत काही वेळ संवाद साधण्‍याची संधी त्‍यांना प्राप्‍त झाली होती.


इटलापूर येथे बालकांचा विकासांक व शालेय संपादणूक वृध्दिंगत करण्यासाठी कार्यशाळा संपन्न

वसंतराव मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे इटलापूर येथे बालकांचा विकासांक व शालेय संपादणूक वृध्दिंगत करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत बालविकास शास्त्रज्ञ व मानव विकास विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी बालकांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यावी, बालकांच्या वाढांकाचे महत्त्व व त्याचे मूल्यमापन करण्याची शास्त्रोक्त पध्दती, विद्यार्थ्‍यांमध्ये कल्पनाशक्ती कशी वाढवावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे संवर्धन याबाबत प्रात्याक्षिकासह व्याख्यान दिले. यावेळी उपस्थित बालकांपैकी उत्कृष्ट वाढांक असलेल्या बारा विद्यार्थ्‍यांना व त्यांच्या पालकांना बेस्ट चाईल्ड, बेस्ट पॅरेन्टस् अॅवार्ड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेत दिलेल्या माहिती आधारे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्‍यांना व पालकांना गोल्डन स्टार अॅवार्ड प्रमाणपत्र देण्‍यात आली. दिव्यांग बालके असणा-या पालकांचे  प्रा. विशाला पटनम समुपदेशन केले. प्रत्येक गावक-यांना कुटुंबाच्या कल्याणासाठी सक्षम आई व्हायच मलाव किशोरवयीन मुलीसाठी माझी काळजी मीच घेणारया दोन पुस्तिका विनामुल्य देण्यात आल्या. कार्यशाळेत 130 हूनही अधिक पालक, आजी-आजोबा, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्‍या व विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला.

Monday, September 24, 2018

बदलत्या हवामानात मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती शेतकरी बांधवांना आधार ठरेल.....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

औरंगाबाद येथे रब्बी विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्ला समितीची बैठक संपन्‍न
औरंगाबाद : कमी पावसामुळे मराठवाड्याचा खरीप हंगाम आणि येणारा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.  जमिनीत ओल अत्‍यंत कमी झाली असुन खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस मुख्‍य पिके सुकत आहेत. शेती पुढील नैसर्गिक संकटे कमी होत नाही, केवळ त्‍यांचे स्‍वरूप बदलत आहे. बदलत्या हवामानाचा विचार करता मराठवाड्यात एकात्मिक शेती पद्धती शेतकरी बांधवांसाठी निश्चित आधार ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्‍या सभागृहात दिनांक 24 सप्‍टेबर रोजी रब्बी विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्ला समितीची बैठक पार पडली, बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, औरंगाबादचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, लातुरचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डी जी मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, मराठवाडयात फळबाग लागवडीखालील क्षेत्र मोठया प्रमाणात असुन यावर्षी या फळबागा वाचविण्‍याचे मोठे आव्‍हान आहे. सन 2012 या अवर्षण प्रवण वर्षात विद्यापीठाचा विस्‍तार शिक्षण संचालक असतांना कृषि विभागाच्‍या सहकार्याने मोसंबी फळबाग वाचविण्यासाठी मोठे अभियान राबविण्‍यात आले होते, यासारखे अभियान याही वर्षी राबविण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
बैठकीत संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर हे आवर्जून जिल्ह्यानिहाय प्रत्याभरणावर विशेष लक्ष देऊन तो प्रश्न त्‍वरीत संबंधित कृषी शास्त्रज्ञाकडून सोडवून घेत होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान व सल्‍ले विविध माध्‍यमातुन शेतकरी बांधवांच्या बांधपर्यत गेले पाहिजे, या परिस्थितीत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहे असा विश्‍वास शेतक-यांना वाटला पाहिजे, असे मत व्‍यक्‍त केले.  
बैठकीस विद्यापीठाच्या वतीने विविध कृषी विभागाचे प्रमुख, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, विभागीय विस्तार कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आदींचा सहभाग होताबैठकीत सद्यस्थितीतील खरिप पिके व येणा-या रबी हंगामाबाबत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच कृषी विभागाच्या वतीने मांडण्‍यात आलेल्‍या विविध शेतक-यांच्‍या समस्याचे निराकरणाबाबत चर्चा करण्‍यात आली. विद्यपीठ विकसित रब्बी पिकांचे बियाणे उपलब्ध असल्याचे संबंधित शास्त्रज्ञाने सभागृहास अवगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. एस. आर. जक्कावाड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य
रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद

Monday, September 17, 2018

शेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषि विभाग व कृषी विद्यापीठ यांनी समन्‍वयाने कार्य करण्‍याची गरज....कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे

वनामकृवित रबी शेतकरी मेळावा संपन्‍न



हवामान बदलामुळे शेती पुढे अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, शेतीतील उत्‍पादन खर्च वाढत आहे, परंतु त्‍याप्रमाणात उत्‍पादन वाढ होत नसुन, शेतीतील प्रत्‍यक्ष नफा कमी होत आहे. शेतक-यांच्‍या समृध्‍दीसाठी शेतकरी, शासन, कृषि विभाग व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित काम करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. खा. अॅड. संजयरावजी धोत्रे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासनयांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेबर रोजी आयोजित रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा. डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. अजय गव्‍हाणे, मा. श्री. बालाजी देसाई, मा. श्री लिंबाजी भोसले, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा श्रीमती भावनाताई नखाते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बी आर शिंदे, संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, शिक्षण संचालक डॉ व्‍ही डि पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा. ना. अॅड. संजयरावजी धोत्रे पुढे म्‍हणाले की, अनेक शेतकरी संशोधक आहेत, आपआपल्‍या परिस्थितीनुसार शेतीतील शेतक-यांचे अनेक प्रयोग यशस्‍वी झाले आहेत. यावर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत कृषि विभाग व कृषि विद्यापीठांनी मोठी जागृती केली, त्‍यामुळे मोठया प्रमाणात कामगंध सापळे शेतक-यांनी लावल्‍यामुळे सद्यस्थितीत गुलाबील बोंडअळी नियंत्रणात आहे. आपण ब-यापैकी अन्‍नसुरक्षाचे उष्द्दिट साध्‍य करू शकलो, आज गरज आहे, ती पौष्टिक अन्‍न सुरक्षेची. परभणी कृषी विद्यापीठाने लोह व झिंक याचे प्रमाण अधिक असलेले ज्‍वारीचे परभणी शक्‍ती नावाचे वाण निश्चितच उपयुक्‍त आहे. सद्यस्थिती सोयाबिनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. शेतक-यांच्‍या पिक नुकसानीच्या सर्व्‍हेक्षणासाठी रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याची गरज आहे. शेतक-यापुढे शेतमाल बाजारपेठेचा मोठा प्रश्‍न आहे, यासाठी शेतमाल प्रक्रिया क्षेत्रात काम करण्‍याची गरज असुन फुलशेती, औषधी वनस्‍पती लागवडीस मोठा वाव आहे.

अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर आज शेतीत अनेक समस्‍या निर्माण होत आहेत. एक समस्‍या संपत नाही की, दुसरी नवी समस्‍या शेती पुढे उभी राहत आहे. शेतमाल बाजारपेठाचा मोठा प्रश्‍न असुन एक मजबुत बाजार व्‍यवस्‍था आपणास निर्माण करावी लागेल. तसेच शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याच्‍या माध्‍यमातुन आपण काही प्रमाणात मात करू शकतो. जे विकते तेच पिकविण्‍याची गरज आहे. शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्‍यासाठी विद्यापीठ माहिती तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर करीत असुन प्रसार माध्‍यमांची मोठी साथ विद्यापीठास लाभत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

मा. डॉ. लाखन सिंग आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने निर्माण केलेले सोयाबिन पिकांचे वाणाचा मोठया प्रमाणात शेतकरी अवलंब करीत असुन शेतकरी त्‍यापासुन चांगले उत्‍पादन घेत आहेत. मराठवाडयातील कोरडवाहु शेतीत सुक्ष्‍मसिचंन पध्‍दतीचा वापर वाढविण्‍याची गरज आहे. हवामान अंदाजात अचुकता आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रमात श्रीमती भावनाताई नखाते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ सुनिता काळे यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी मानले. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचे उदघाटन व विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिक व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्‍तिका व घडीपुस्‍तीकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक चर्चासत्रात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.






Friday, September 14, 2018

वनामकृवित सोमवारी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात दिनांक 17 सप्‍टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता करण्‍यात आला असुन मेळाव्‍याचे उदघाटन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. अॅड. संजयरावजी धोत्रे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा. डॉ. लाखन सिंग हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे राहणार आहेत. तसेच मेळाव्‍यास परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. श्रीमती उज्‍वला राठोड, परभणी लोकसभा सदस्‍य मा. खा. श्री. संजय जाधव, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. सतिश चव्‍हाण, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. अब्‍दुल्‍ला खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते, विधानपरिषद सदस्‍य मा. आ. श्री. विपलव बाजोरिया, परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील, जिंतुर विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. विजय भांबळे, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. मधुसुदन केंद्रे, पाथरी विधानसभा सदस्‍य मा. आ. श्री. मोहन फड, परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मिनाताई वरपुडकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनाचा समावेश असलेल्‍या कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन तांत्रिक चर्चासत्रात रबी पिक लागवड, पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापन आदीवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. सदिरल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, परभणीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  श्री बी आर शिंदे व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले आहे.

Wednesday, September 12, 2018

भावी हरित क्रांतीत सुक्ष्‍म जीवाणुची महत्‍वाची भुमिका ....डॉ विलास पाटील

वनामकृवित आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानात प्रतिपादन
जमिनीची सुपिकता, आरोग्‍य व उत्‍पादकतेत मातीतील जैव विविधता व सुक्ष्‍म जीवाणु यांची मोठे महत्‍व असुन भावी हरित क्रांतीत यांची मोठी भुमिका राहणार असल्‍याचे प्रतिपादन व्‍याख्‍याते शिक्षण संचालक तथा मृदा शास्‍त्रज्ञ डॉ विलास पाटील यांनी केले. भारतीय मृदविज्ञान संस्थानवी दिल्ली व शाखा परभणी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 सप्‍टेबर रोजी आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु माडॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणी अध्यक्ष डॉ. सय्यद इस्माईल व सचिव डॉमहेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थित होती.
डॉ विलास पाटील पुढे म्‍हणाले की, सुक्ष्म जिवाणुंच्या परस्परक्रिया व मृदसंकरणाचा अन्नद्रंव्यांचा गतिशीलतेवर परिणाम होऊन जमिनीच्‍या आरोग्‍याची जपवणुक होते, हे संशोधनाच्‍या आधारित सिध्‍द झाले आहे. भारतीय संस्‍कृतीत वट, पिंपळ व उंबर या वृक्षास मोठे महत्‍व आहे, या वृक्षाखालील माती ही अधिक जैवसमृध्‍द असुन या मृदाचे संकरण कृषी उत्‍पादन वाढीसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. यावेळी डॉ पाटील यांनी शेतक-यांच्‍या शेतावर घेतलेल्‍या प्रयोगातील निर्ष्‍कशाचे सादरिकरण केले. 
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात कार्य करणा-या शास्त्रज्ञ, विद्यार्थ्‍यी, शेतकरी व विस्‍तार कार्यकर्ता या सर्वांनी कृषि विकासासाठी ए‍कत्रित कार्य करण्‍याची गरज आहे. देशातील विख्‍यात मृद शास्‍त्रज्ञांच्‍या संशोधनातील योगदानाबाबत माहिती देऊन बौध्‍दीक संपदा वाढीसाठी अशा व्‍याख्‍यानाचे वेळोवेळी आयोजन करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले.    

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. सय्यद इस्माईल यांनी मृदा शास्‍त्रज्ञ कै. डॉ. बी. व्ही. मेहता यांच्‍या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ महेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्त्रज्ञ व पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.