Wednesday, January 30, 2019

कृषि विद्यापीठ तंत्रज्ञानाचे खंद्दे प्रचारक प्रगतशील शेतकरी कै शहाजीराव गोरे यांना भावपुर्ण श्रध्‍दांजली

उस्‍मानाबाद जिल्‍हयातील मौजे गोरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी शहाजीराव संभाजीराव गोरे यांचे मुंबई येथे दिनांक २९ जानेवारी रोजी अल्‍पशा आजाराने दु:खद निधन झाले. कृषि विद्यापीठ विकसित विविध कृषि तंत्रज्ञानाचा ते स्‍वत: च्‍या शेतीत अवलंब करून चांगले उत्‍पादन काढीत असत, तसेच त्‍यांच्‍या कृषि ज्ञानाचा फायदा परिसरातील इतर शेतकरी मोठया प्रमाणात घेत असत. ते परिसरातील इतर शेतक-यांसाठी शेती उत्‍पादन वाढविण्‍यासाठी सातत्‍याने मार्गदर्शन व प्रोत्‍साहित करित असत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कार्यकारी परिषदेचे ते माजी सदस्‍य होते, त्‍यांना १९९४ मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने शेतीमित्र पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले आहे. ते आंबेडकर कारखान्‍याचे चेअरमन अरविंददादा गोरे यांचे लहान बंधु होत. कृषि विद्यापीठ तंत्रज्ञानाचा एक खंद्दे प्रचारक व पुरस्‍कर्ते विद्यापीठाने गमवला असल्‍याचे भावना शब्‍दात व्‍यक्‍त करून कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या वतीने त्‍यांना भावपुर्ण श्रध्‍दांजली वाहली.



संग्रहित छायाचित्र
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाचे कुलगुरूपद स्‍वीकारल्‍या नंतर कै शहाजीराव गोरे यांची मौजे गोरेवाडी येथे जाऊन भेट घेतली असता जनसामान्‍यात व शेतक-यांमध्‍ये कृषि विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्‍यासाठी अनेक सुचना त्‍यांनी केल्‍या.

Tuesday, January 29, 2019

शेती व शेतकरी केंद्रबिदु ठेऊनच शाश्‍वत विकास शक्‍य....माजी मुख्‍य सचिव मा श्री रत्‍नाकर गायकवाड

वनामकृवित ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत बैठक संपन्‍न
देशाच्‍या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) कृषि क्षेत्राचा वाटा केवळ १७ टक्के असला तरी आजही ५० टक्के लोकांचा रोजगार हा शेतीवरच अवलंबुन आहे. त्‍यामुळे देशाचा किंबहूना ग्रामीण भागातील शाश्‍वत विकास करण्‍यासाठी शेती व शेतकरी केंद्रबिंदु ठेऊनच विकास करावा लागेल, यासाठी माननीय मुख्‍यमंत्री महोदय यांच्‍या संकल्‍पेतुन महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राज्‍यातील एक हजार गावात राबविण्‍यात येत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्‍य सचिव मा श्री रत्‍नाकर गायकवाड यांनी केले. महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत दिनांक २९ जानेवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित बैठकित ते बोलत होते. बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर अभियानाचे कार्यकारी संचालक तथा माजी विभागीय आयुक्‍त मा श्री उमाकांत दांगट, जिल्‍हाधिकारी मा श्री पी शिवशंकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री बी पी पृथ्‍वीराज, मुख्‍य परिचालन अधिकारी श्री धनंजय माळी, अभियान व्‍यवस्‍थापक श्री दिलीपसिंग बयास, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, केरवाडी येथील स्‍वप्नभुमी प्रकल्‍पाचे प्रमुख श्री सुर्यकांत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत महाराष्‍ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्‍ठान व कृषि विद्यापीठ यांची शाश्‍वत ग्राम साम‍ाजिक परिवर्तनासाठी संभाव्‍य ज्ञान व तंत्रज्ञान भागीदारी याबाबत चर्चा करण्‍यात आली.
सदरिल अभियांनाबाबत माहिती देतांना माजी मुख्‍य सचिव मा श्री रत्‍नाकर गायकवाड पुढे म्‍हणाले की, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत गावे सक्षम करणे व गावांचा अंतर्गत व बाहय परिवर्तन घडविण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार आहेत. ग्रामीण भागांमध्‍ये केवळ मुलभुत सुविधा निर्माण करणे एवढाच या अभियानाचा हेतु नसुन शाश्‍वत विकासासह गावे सक्षम बनविणे हे मुख्‍य उदिष्‍टे आहे. यासाठी कृषी व कृषी संलग्‍न क्षेत्राचा विकासावर भर द्यावा लागेल, यात कृषि विद्यापीठाची कृषि ज्ञानात्‍मक व तंत्रज्ञात्‍मक भुमिका महत्‍वाची राहणार आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्‍हा प्रशासन, जिल्‍हा परिषद, कृषि विद्यापीठ, कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्‍या, गैर शासकीय संस्‍था, इतर सर्व यंत्रणासह लोकांचे सहकार्य घेण्‍यात येणार आहे. यात अनेक कंपन्‍या त्‍यांच्‍या संस्‍थात्‍मक सहभाग देणार असुन खाजगी संस्‍थेचे आर्थिक व तांत्रिक सहकार्य देणार आहेत. अभियानीची प्रभावीपणे व कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा अभियान परिषदेची स्‍थापन करण्‍यात आली आहे. अभियानांतर्गत राज्‍यातील एक हजार गावांची निवड करण्‍यात आली असुन निवडलेल्‍या गावांत विकास योजना व धोरण निश्चितीसाठी ग्राम विकास सुक्ष्‍म आराखडा तयार करण्‍यात येऊन नियोजनात ग्रामस्‍थाच्‍या सहभाग घेण्‍यात येणार आहे. सदरिल गावांत शासकीय योजनांतर्गत प्राप्‍त निधीचा प्रभावीपणे वापर करण्‍यात येणार आहे. अभियांनात निवडण्‍यात आलेली गावे शासनाच्‍या सर्व योजनांतर्गत संरक्षित केली जाणार आहेत, अशी माहिती त्‍यांनी दिली.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे माननीय मुख्‍यमंत्री यांच्‍या संकल्‍पनेतुन राज्‍यातील एक हजार गावामध्‍ये राबविण्‍यात येणारा एक महत्‍वकांक्षी कार्यक्रम आहे, यामुळे गावांचा शाश्‍वत विकास साध्‍य करणे शक्‍य होणार आहे. हे अभियान म्‍हणजे गावांचा आर्थिक व सामाजिक कायापालट करण्‍याची संधीचे दालन असुन गावांतील कृषि व कृषि संलग्‍न क्षेत्रातील विकासासाठी परभणी कृषि विद्यापीठाचे संपुर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
माजी विभागीय आयुक्‍त मा श्री उमाकांत दांगट आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मराठवाडयास मोठा सांस्कृतिक वारसा असुन मोठया प्रमाणात सुपिक जमिन उपलब्‍ध आहे. परंतु जागतिककरणामुळे शहरीकरण व औद्योगिककरणाच्‍या काळात शेती पुढे अनेक प्रश्‍न निर्माण झाल्या आहेत. औरंगाबाद वगळता इतर जिल्‍हयाचा मानवी विकास निर्देशांक कमी असुन गावांचा शाश्‍वत विकासासाठी कृषि व कृषि संलग्‍न क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. लोकसहभागातुन सार्वजनिक खाजगी तत्‍वावर सदरिल अभियांन राबविण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी मानले. बैठकीस विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख व संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, January 26, 2019

वनामकृवित ७० वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७० वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी कुलसचिव श्री रणजित पाटील, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उद्य खोडके, प्राचार्य डॉ हेमांगिनी सरंबेकर, प्राचार्य डॉ तुकाराम तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माननीय कुलगुरू यांनी सर्वांना प्रजासत्‍ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या तर राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी छात्रसेना अधिकारी लेफ्ट डॉ आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्य वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, January 25, 2019

महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यींनीनी समाजमाध्‍यमांचा वापर करतांना विशेष काळजी घ्‍यावी.....कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृवित विद्यार्थीनींसाठी डिजीटल शक्‍ती कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यीनी व महिला कर्मचा-यांसाठी राष्ट्रीय महिला आयोग, सायबर पिस फाऊंडेशन, नवी दिल्ली आणि फेसबूक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 जानेवारी रोजी डिजीटल शक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरु मा. अशोक ढवण यांचे हस्‍ते झाले तर नवी दिल्ली येथील सायबर पीस फांउडेशनचे श्री. अमेय पारटकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. हेमांगीनी सरंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॅा. अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यींनीनी इंटरनेट व डिजीटल गॅजेट वापर करतांना आपल्‍या वैयक्‍तीक माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो, याचे नेहमी भान ठेवावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यींनी इंटरनेट व समाजमाध्‍यमांचा वापर करतांना विशेष काळजी घेण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
कार्यशाळेत मार्गदर्शक श्री अमेय पारटकर यांनी विद्यार्थीनींना डिजीटल साक्षरता, डिजीटल टेक्नॉलॉजी विषयी काळजी व सुरक्षितता, ऑनलाईन जबाबदारी व वर्तणुक आदींबाबीवर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांनी आजच्या युगात डिजीटल साहित्याचा उपयोग व त्यापासून होणारे धोके या विषयी तरुणाईत जागरुकता निर्माण करण्याची आवश्‍यकता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. कार्यशाळेस विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्या.

Saturday, January 19, 2019

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीची ज्वार संशोधन केंद्रास भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रास दिनांक 17 18 जानेवारी रोजी भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने (कुआरटी) भेट दिली. नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदे वतीने या समितीच्‍या माध्‍यमातुन दर पाच वर्षाने कृषि संशोधन केंद्राचा आढावा घेतला जातो. सदरिल समितीचे अध्यक्ष हिसार येथील चौधरी चरण सिंह कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. एस. खोकर हे होते तर सदस्य म्‍हणुन हैद्राबाद येथील आयआयएमआरचे माजी संचालक डॉ. जे. व्हि. पाटील, माजी प्रकल्प समन्वयक (बाजरा) डॉ. . व्हि. गोविला, बेंगलोर येथील माजी प्रकल्प समन्वयक डॉ. चन्नाबायरे गोवडा, आयआयएमआर, हैद्राबाद येथील मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. एच. एस. तलवार आदींचा समावेश होता. समितीने ज्वार संशोधन केंद्रावरिल प्रक्षेत्रास व प्रदर्शनास भेट देऊन रब्बी ज्वारीच्या विविध संशोधनात्‍मक प्रयोग नविन संशोधित वाणांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
कुलगुरू मा डॉ अशोक वण यांच्‍या अध्यक्षतेखाली सदरिल समिती सदस्‍यासोबत दि. 18 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेञे, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे आदीसह विविध विभागांचे शास्ञज्ञ, तसेच मौजे मानोली (ता. मानवत जि. परभणी) मौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील ज्‍वार उत्‍पादक शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत बोलतांना मा डॉ अशोक वण म्‍हणाले की, खरीप व रब्बी ज्वारी हे बदलत्या वातावरणामध्येही तग धरणारे पिक असुन यापासुन मनुष्‍यासाठी पोअन्‍न तर जनावरासाठी चांगल्या प्रतिचा कडबा मिळतो. आज ज्वारीपासुन मुल्यवर्धीत पदार्थ जसे रवा, शेवया, पोहे, बिस्कीट, लाहया आदींना मागणी वाढत आहे, त्यामुळे पुन्‍हा ज्‍वारीस आर्थिक महत्‍व प्राप्‍त होईल, असे मत व्‍यक्‍त केले. यावेळी मा. डॉ. के. एस. खोकर यांनी उपस्थित ज्‍वार उत्‍पादक शेतक-यांना नवीन ज्वारीचे वाण व संशोधानाबाबत अपेक्षा विचारल्‍या असता प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे यांनी कमी पाण्‍यालवकर येणारा प्रथिनांचे प्रमाण जास्त असणारा वाण विकसीत करण्‍याची गरज असल्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. मौजे वाई येथील शेतकरी नामदेव संभाजी लाखाडे यांनी ज्वार संशोधन केंद्राकडुन आदिवासी उपयोजने अंतर्गत वाई येथे राबविण्‍यात आलेल्‍या विविध वाणांच्या प्रात्यक्षिकांना आदिवासी शेतक-यांना लाभ झाल्‍याचे सांगितले.

Friday, January 18, 2019

वनामकृवितील राजमाता जिजाऊ वसतिगृहात मुलींनी साजरा केला मकरसंक्रातीचा सण



मकरसंक्रातीचे औचित्य साधुन दिनांक 15 जानेवारी रोजी परभणी कृषि महाविद्यालयांतर्गत राजमाता जिजाऊ पदव्युत्तर मुलींचे वसतिगृहामध्ये तिळगुळाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सौ. उषाताई अशोक ढवण प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या तर अन्नतंत्र व आहार, विभागाच्‍या प्रमुख डॉ. विजया नलावडे, डॉ. शा विलास पाटील, सौ. उज्वला धर्मराज गोखले, डॉ. पपिता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ. उषाताई अशोक ढवण आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, भारतीय संस्‍कृतीत विविध सणांचे महत्‍व आहे, समाजातील व्‍यक्‍ती-व्‍यक्‍ती मधील संबंधात गोडवा नियमित राहण्‍याचा संदेश आपणास मकरसक्रांती सणापासुन मिळतो. हा सण विविध राज्‍यात विविध प्रकारे हा सण साजरा केला जातो, असे त्‍यांनी सांगितले. डॉ शा पाटील यांनी मुलींना संतुलीत आहारा संबधी मार्गदर्शन केले तर डॉ विजया नलावडे यांनी नियमित व्यायाम व योगासनाचे महत्त्व पटवुन दिले. सौ उज्वला धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. तुळशीच्या रोपांचे वाण म्‍हणुन वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावि डॉ. स्वाती झाडे यांनी केले. सुत्रसंचालन श्रध्दा एडके यांनी केले तर आभार आशा चव्हाण हीने मानले. सदरिल कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले आणि मुख्य वसतिगृह अधिक्षक डॉ. आर. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Tuesday, January 15, 2019

परभणी कृषि महाविद्यालयतील रासेयो वतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्‍वामी विवेकानंद जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी रासेयोच्‍या डॉ पपिता गौरखेडे, डॉ स्‍वाती झाडे आदीसह स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका मोठया संख्‍येने उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व स्‍वामी विवेकांनद यांच्‍या कार्याबाबत स्‍वयंसेवक कृ‍ष्‍णा उफाड, पुनम सावंत, धनश्री जोशी, मोनाली रायकर आदींनी आपले विचार मांडले. सुत्रसंचालन शुभांगी आवटे हिने केले तर आभार विशाल सरोदे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी भागवत ठाकरे, प्रतिक्षा गुंन्‍ड्रे, शुभांगी देशमुख, शितल गाडेकर आदीसह रासेयोच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविकांनी परिश्रम घेतले.

Saturday, January 12, 2019

विविध फुलांनी बहरला वनामकृवितील उद्यानविद्या विभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागातील प्रक्षेत्रावर शेवंती, ग्‍लेडियोलस, गुलाब, निशीगंध आदी फुलांच्‍या विविध जातींची लागवड करण्‍यात आली असुन सद्या हा परिसर फुलांनी बहरला आहे. यामुळे सदरिल सुभोभित प्रक्षेत्र बघण्‍यासाठी परिसरातील नागरीक व शैक्षणिक सहलीचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने येत आहेत. फुलझाडासह ब्रोकोली, कांदा, वांगी, डाळिंब आदी पिकांवरील प्रात्‍यक्षिके प्रक्षेत्रावर आहेत. पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाचा भाग व संशोधनाचे प्रयोग म्‍हणुन विद्यार्थ्यीच सदरिल भाजीपाला, फुलझाडे यांची लागवड करून निगा राखतात. अनुभव आधारी शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यींच आंतरमशागत, काढणी, विक्री आदी कामे करतात.
सदरिल प्रक्षेत्रास विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक वण दिनांक 10 जानेवारी रोजी भेट दिला, यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना नौकरीच्या मागे न लागता कृषि उद्योजक होण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटी, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. तुकाराम तांबे, डॉ एस एस यदलोड, डॉ एस जे शिंदे, डॉ व्हि एन शिंदे, डॉ ए एम भोसले, डॉ आर व्हि भालेराव, पी एम पवार, बी के शिंदे आदींसह विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्‍यी उपस्थित होते.

Thursday, January 10, 2019

सेंद्रीय शेती संशोधनात शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक... संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर

वनामकृवित लातुर जिल्‍हयातील शेतक-याकरिता आयोजित दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचा समारोप
सेंद्रीय शेती ही व्यापक संकल्पना असून यामध्ये शास्त्रीय बाब पडताळुन पाहणे आणि अचुक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. शेतकरी आज सेंद्रीय शेती विविध पध्दतीने करित असुन त्या पध्‍दतींचा शास्त्रीय अभ्यास करावा लागेल. सेंद्रीय शेती संशोधन कार्यात शेतकऱ्यांचे अनुभव व सहभाग आवश्यक असल्‍याचे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या मराठवाडयातील शेतक-यांकरिता जिल्‍हयानिहाय दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, या श्रृंखलेमधील लातूर जिल्हयासाठीचा सेंद्रीय शेती प्रशिक्षणाच्‍या समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानावरून दिनांक 9 जानेवारी रोजी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर प्रगतशील शेतकरी श्री. अभिनय दुधगांवकर, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जी. के. लोंढे, पशुशक्तीचा योग्य वापर योजनाच्‍या प्रभारी अधिकारी श्रीमती डॉ. एस. एन. सोळंकी, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, सेंद्रीय प्रमाणीकरण तज्ञ हर्षल जैन, डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर पुढे म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास अनन्य साधारण महत्व असुन यासाठी जिल्हानिहाय गट तयार करुन प्रमाणीकरणासाठी प्रयत्न करता येतील. गटाच्‍या माध्‍यमातुन सेंद्रीय शेतीमध्ये तंत्रज्ञान आत्मसात करुन बाजारपेठ व्यवस्थापन यशस्वीपणे करता येईल. सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण ही एक दीर्घकालीन प्रक्रीया असून शेतकरी, शाश्वत विस्तारक यांच्यात कायम संवाद होणे आवश्यक आहे. चारापिकांचे तंत्रज्ञान, मृद-विज्ञान तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पध्दती असे अनेक उपक्रम शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहेत. कमी खर्चाचे तंत्रज्ञान आणि स्वत:च्या निविष्ठा स्वत: तयार केल्यास कमी खर्चात जमिनीचे रोग्य राखण्यास आणि उत्पादन व उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. अपरंपरागत शेती पध्दतीची जोड देवुन सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल. बाजारपेठेचा बाजारभावाचा प्रश्न शेतकरी एकत्र येवुन सोडवु शकतात, यासाठी शेती पध्दती बदल केल्यास बाजार व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल. शेवगा, कडीपत्ता, हदगा अशा नियमित मागणी असलेल्या पिकांची लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन व योग्य बाजारभाव मिळविता येईल. शेतकऱ्यांच्या सेंद्रीय शेतीच्या उत्पादनास ब्रँड देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील असल्‍याचे यावेळी त्‍यांनी सांगितले.  
प्रगतशील शेतकरी श्री अभिनय दुधागावकर आपल्‍या मार्गदर्शनता म्‍हणाले की, सेंद्रीय शेती ही एक चळवळ असून आज सेंद्रीय उत्पादनासाठी मोठी मागणी आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांनी पीकनिहाय गट तयार करुन उत्पादन व विक्री केल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल. तसेच डॉ. जी. के. लोंढे असे म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये तांत्रिक कौशल्य व्यवस्थापन आत्मसात करणे गरजेचे असुन यासाठी विद्यापीठ सदैव तयार आहे. चारापिकांचे योग्य नियोजन केले तर वर्षभर चारा उपलब्ध होऊअप्रत्यक्षपणे सेंद्रीय शेतीलाही कमी खर्चात आधार देता येईल. डॉ. पी. आर. देशमुख यांनी सेंद्रीय शेती मध्ये प्रशिक्षणाचे महत्व असुन त्यामध्ये अदययावत प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्‍याचे सांगितेल तर डॉ. एस. एन. सोळंकी यांनी सेंद्रीय शेतीमध्ये बैलचलीत अवजारांचा योग्य वापर केल्यास मजुरांवरील अवलंबीत्व कमी करता येईल असे सांगितले.

प्रास्ताविकात डॉ.आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदिदष्ट आणि सेंद्रीय शेती मधील सद्यस्थिती यावर माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. आर एन खंदारे यांनी तर आभार अभिजित कदम यांनी मानले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास लातुर जिल्हयातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.  यावेळी सहभागी शेतकरी श्रीमती अन्नपुर्णा झुंजे, अमोल बिर्ले, मनोहर भुजबळ, राजकुमार बिरादार, भागवत करंडे, शरद पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यापिठाचे आभार व्यक्त केले.
तांत्रिक सत्रामध्ये प्राचार्य डॉ नितिन मार्केंडेय यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधन व्यवस्थापन, श्री आर.के. सय्यद यांनी जैविक कीड व्यवस्थापक, डॉ. एस. एल. बडगुजर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, श्री हर्षल जैन यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण, डॉ. एस. जी. पाटील यांनी सेद्रीय फळपिक लागवड तंत्रज्ञान, डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधनाचे महत्व, डॉ. एस. एस. धुरगुडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचा उपयोग व महत्व, डॉ. सय्यद इस्माईल यांनी जैविक खत निर्मिती व वापर तसेच डॉ. के.टी. आपेट यांनी जैविक बुरशी संवर्धनाची निर्मिती व उपयोग आणि जैविक बुरशी संवर्धने निर्मिती केंद्रास भेट देवुन प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
सदरिल दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्‍हयानिहाय मराठवाडयातील आठही जिल्हयांसाठी करण्यात आलेले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्‍दारका काळे, मनिषा वानखेडे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रनेर, दिपक शिंदे, नागेश सावंत आदींनी पुढाकार घेतला.