Pages

Saturday, January 26, 2013

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप


    विस्ताराकांनी व शिक्षकांनी आपली गुणवत्‍ता सुधारण्‍यासाठी अधिकाधीक मेहनत घ्‍यावी. ग्रामीण भागातील लोकांचे व शेतकरयांचे जीवनमान सुधारण्‍यासाठी आवश्‍यक शास्‍त्रीय माहीती त्‍यांच्‍या पर्यत पोहचविण्‍यात प्रसारमाध्‍यमाचा व माहीती तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचे कौशल्‍य कृषि शास्‍त्रज्ञ व विस्ताराकांना अवगत पाहिजे असे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे यांनी केले.
   मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली प्रायोचित 'विस्ताराकांसाठी संवाद व व्यवस्थापन कौशल्य' या विषयावर राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षणाचे  १६ ते २५ जानेवारी २०१३ दरम्यान आयोचन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे यांची उपस्थिती होते. 
   या प्रशिक्षण कार्यक्रमात प्राप्‍त ज्ञानाचा आपल्‍या व्‍यक्‍तीगत जीवनात उपयोग करावा असा सल्‍लाही सहभागी प्रशीक्षणार्थीना मा. कुलगुरूनी दिला.     
   शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे  यांनी गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला पट्टणम, विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल व प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्‍वीरीत्‍या पुर्ण केल्‍याबददल अभिनंदन केले.
    यावेळी मा डॉ किशनराव गोरे यांनी कुलगूरूपदाचा दोन वर्ष यशस्‍वीरित्‍या पूर्ण केल्‍याबददल सत्‍कार करण्‍यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील विविध कृषी विद्यापीठातील २५ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विस्तारक सहभागी झाले होते. या प्रशीक्षणार्थीना आपले मनोगत यावेळी व्‍यक्‍त केले. प्रशिक्षणात विस्ताराकांसाठी आव्यशक संवाद व व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा कृषी विकासात उपयोग, व्यक्तीमत्व विकास, विविध प्रसारमाध्यमांसाठी आव्यशक कौशल्य या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन केले. गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम यांनी प्रास्ताविक केले तर विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रवीण कापसे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी आदीं मोठया संख्येने उपस्थित होते.  
मकृवितील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपा प्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे व्यासपीठावर  डॉ विश्वास शिंदे , प्रा विशाला पट्टणम, डॉ प्रभा अंतवाल आदी 
मकृवितील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपा प्रसंगी  सहभागी प्रशीक्षणार्थी समवेत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे, डॉ विश्वास शिंदे , प्रा विशाला पट्टणम, डॉ प्रभा अंतवाल, डॉ प्रवीण कापसे आदी 

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याची नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास भेट दिली

देशाचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी कृषी उत्पन्नात वाढ आव्यशक आहे, यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षण पाहिजे, त्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व मनुष्यबळ विद्यापीठाने निर्माण केल्या पाहिजेत. त्यादिशेने मराठवाडा कृषी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादास व आचार्य पदवीसाठी देशातील विविध विद्यापीठात पाठविण्यात येत आहे  विद्यार्थांना ही द्विपदवीच्या संधी प्राप्त करून देण्यात येत आहे असे प्रतिपादन कुलगुरू मा.डॉ.किशनराव गोरे यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील उच्चस्तरिय अधिकाऱ्याच्या भेट दरम्यान केले.

दि २४ जानेवारी रोजी  मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठतील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी भेट दिली. यामध्ये संशोधन संचालक डॉ एस व्ही सरोदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ व्ही के माहोरकरशिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ व्ही एम भाले, डॉ डी ए भारती आदींचा समावेश होता. एक महिन्यापूर्वीच अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ रविप्रकाश दाणी यांनी विद्यापीठास भेट दिली होती, विद्यापीठातील विविध उपक्रम पाहून प्रभावीत होऊन यांनी हि भेट आयोचीत केली होती.

मा कुलगुरू पुढे म्हणाले की विविध विद्यापीठातील नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास प्रत्यक्ष भेट देऊन  विद्यापीठातील शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यामध्ये  विचारांची देवाण - घेवाण होऊन कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यास दिशा प्राप्त होईल, या प्रकारच्या भेटी सातत्याने व्हावीत. 

अकोला येथील कृषी विद्यापीठचे संशोधन संचालक डॉ एस वि सरोदे म्हणाले की, मराठवाडा कृषी विद्यापीठाने देशाला अनेक कुलगुरू दिले आहेत. कुलगुरू मा. डॉ गोरे हे नेहमी राज्यस्तरीय बैठकीत कृषी विद्यापीठाच्या विकासाच्या मुद्यावर आग्रही असतात. जास्तीतजास्त निधी प्राप्त होण्यासाठी व त्याच्या योग्य नियोचनासाठी प्रयत्नशील असतात. याभेटीत अनेक नवीन उपक्रमाच्या माहितीचा आम्हास निश्चितच लाभ होईल.
याप्रसंगी कृषी विद्यापीठातील सिंचन स्रोत विकास प्रकल्प, सौर उर्जा पार्क, लिम्बुवर्गीय तंत्रज्ञान अभियान येधील रोपवाटिका, ऊस लागवड प्रक्षेत्र, पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग येथील शेळी पालन व दुग्ध प्रक्रिया प्रयोगशाळा, मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र  प्रयोगशाळा, अन्नतंत्र प्रक्रिया प्रयोगशाळा, ऊती संवर्धन प्रयोगशाळा गृहविज्ञान महाविदयालय आदी नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास भेट दिली. 

यावेळी विद्यापीठाचे  शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागीरे, विद्यापीठ अभियंता श्री डी डी कोळेकर आदी उपस्थित होते.  

कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य प्रा विशाला पट्टणम, अन्नतंत्र   महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ पी एस कदम,  कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ अशोक कडाळे तसेच विभाग प्रमुखांनी व प्राध्यापकानी या विविध उपक्रमाची माहिती दिली. 
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे मार्गदर्शन केले
कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या सौर ऊर्जा पार्कास  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी माहिती देतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, डॉ अशोक कडाळे, प्रा डी डी टेकाळे  आदी. 
कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या  आधुनिक औचाराची माहिती  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना प्रा पी ए मुंढे. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, डॉ अशोक कडाळे  आदी. 
ऊती संवर्धन प्रयोगशाळेची माहिती  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना प्रा आनंद दौंडे . यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आदी. 
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे मार्गदर्शन केले
 लिम्बुवर्गीय तंत्रज्ञान अभियान येधील रोपवाटिकाची  माहिती  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना डॉ एम बी सरकटे. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्रा बोराडे, डॉ एन डी देशमुख आदी.
कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या नाविन्यपूर्ण विविध विस्तार उपक्रमा बाबत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी माहिती देतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व प्रा आनंद गोरे आदी. 
ऊस प्रक्षेत्राबाबत माहिती डॉ बी व्ही आसेवर व डॉ उदय खोडके डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना . यावेळी देतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्रा पी के वाघमारे आदी. 

Thursday, January 24, 2013

मा डॉ किशनराव गोरे यांचा मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या कुलगुरूपदी दोन वर्ष कार्यकाल पूर्ण


त्यानिमित्य सर्व विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हार्दिक शुभेच्छा   

मा कुलगुरू यांचे तंत्र अधिकारी  डॉ के व्ही देशमुख  यांचा मा कुलगुरू यांच्या कार्यबाबत लेख 

















Tuesday, January 22, 2013

मा ना श्री विजयरावजी कोलते यांची मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सिंचन स्रोत विकास प्रकल्पास भेट






महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष मा ना श्री विजयरावजी कोलते यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सिंचन स्त्रोत विकास प्रकल्पास भेटी प्रसंगी प्रकल्पाची माहिती देतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरेशिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदेविस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, विद्यापीठ अभियंता श्री डी डी कोळेकर, डॉ अशोक कडाळे, प्रा मदन पेंडके, प्रा संदीप पायाल, डॉ. डी एन गोखले, जल संपदा विभागाचे अधिकारी   आदी  







महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष मा ना श्री विजयरावजी कोलते यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठास भेटी दिली. यावेळी आयोचीत बैठकीत विद्यापीठाच्‍या अधिका-यानां संबोधित करतांना. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरेशिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदेविस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, कुलसचिव श्री का वि पागीरे, विद्यापीठ अभियंता श्री डी डी कोळेकर, विद्यापीठ नियंत्रक श्री एन जे सोनाकाबळे आदी.  

Friday, January 18, 2013

मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन


मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन 


Wednesday, January 16, 2013

गृहविज्ञान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

        मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली प्रायोचित 'विस्ताराकांसाठी संवाद व व्यवस्थापन कौशल्य' या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील दहा दिवसीय प्रशिक्षणाचे १६ ते २५ जानेवारी २०१३ दरम्यान आयोचन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्प संचालक मा. डॉ. एन. सुधाकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, दापोली माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक निर्बन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      आपल्या उदघाटनीय भाषणात मा. डॉ. एन. सुधाकर म्हणाले कि, प्रत्येक व्यक्तीला प्रभावी संवादाची गरज आहे. शेतकऱ्यांचा गरजेनुसार विस्तार शिक्षण असले पाहिजे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीमार्फत, योग्य व्यक्तीला ज्ञान देणे महत्त्वाचे आहे. यासाठी  माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. 
       शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे भाषणात म्हणाले कि, विद्यापीठाचे तंत्रज्ञान साधारणतः ३० - ३५ % शेतकऱ्यान पर्यंत पोहचले आहे. पारंपारिक विस्तार शिक्षण पद्धती सोबतच माहिती तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीचा वापर करावा. सध्या शेतकऱ्यांना बाजारविमुख विस्तार शिक्षणाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या विविध तंत्रज्ञानाच्या गरजा आहेत, कृषी विस्तार कार्यकर्त्यास नवीन विस्तार पद्धतीची माहितीसाठी व त्याच्या प्रभावी वापरासाठी या प्रकारच्या प्रशिक्षणाची आवशकता आहे. 
       विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण भाषणात म्हणाले कि, विस्तार कार्यकर्त्यास विस्तार पद्धतीचे ज्ञान तर पाहिजेच सोबतच संवाद कौशल्य विकसित करणे गरजेच आहे. 
   गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम यांनी प्रास्ताविक केले तर विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रवीण कापसे यांनी केले. यावेळी  विद्यार्धी, प्राध्यापक व कर्मचारी आदीं मोठया संख्येने उपस्थित होते.  
      या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील विविध कृषी विद्यापीठातील २५ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विस्तारक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणात विस्ताराकांसाठी आव्यशक संवाद व व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा कृषी विकासात उपयोग, व्यक्तीमत्व विकास, विविध प्रसारमाध्यमांसाठी आव्यशक कौशल्य या विषयावर मार्गदर्शन विविध क्षेत्रातील तज्ञ करणार आहेत.

गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील दहा दिवसीय प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण पुस्तिकिचे विमोचन करतांना  मा. डॉ. एन. सुधाकर, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे व विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार,  गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम, विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल आदी 

Monday, January 14, 2013

मराठवाडा कृषी विद्यापीठात संवाद व व्यवस्थापन कौशल्यावर प्रशिक्षणाचे आयोचन

मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली प्रायोचित 'विस्ताराकांसाठी संवाद व व्यवस्थापन कौशल्य' या विषयावर दहा दिवसीय लहू-प्रशिक्षणाचे १६ ते २५ जानेवारी २०१३ दरम्यान आयोचन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दि १६ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत हॉल क्रमांक १८ मध्ये सकाळी ११.०० वाजता हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्प संचालक मा. डॉ. एन. सुधाकर यांच्या हस्ते होणार असून विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनराव गोरे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती  राहणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील विविध कृषी विद्यापीठातील २५ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विस्तारक सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणात विस्ताराकांसाठी आव्यशक संवाद व व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा कृषी विकासात उपयोग, व्यक्तीमत्व विकास, विविध प्रसारमाध्यमांसाठी आव्यशक  कौशल्य या विषयावर मार्गदर्शन विविध क्षेत्रातील तज्ञ करणार आहेत. या उदघाटन कार्यक्रमास नागरिक, विद्यार्धी, प्राध्यापक व कर्मचारी आदींनी उपस्थिती रहावे असे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम व विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल यांनी केले आहे.


मराठवाडा कृषी विद्यापीठात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

मराठवाडा कृषी विद्यापीठात राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या निमित्य  विद्यापीठाचे कुलगुरू  मा. डॉ. किशनराव गोरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी कुलसचिव श्री का वि पागिरे, उपकुलसचिव श्री रवींद्र जुक्टे,  श्री बी एम गोरे, श्री. व्ही एन नागुला व विद्यापीठातील कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, January 10, 2013

वि़द्यापीठात प्रसिध्‍द विचारवंत श्री इ व्‍ही स्‍वामिनाथन यांचे व्‍याख्‍यान

मराठवाडा कृषि विद्या‍पीठात स्‍वामी विवेकानंद जयंतीनिमित्‍य राष्ट्रिय युवा दिनी मुंबईचे प्रसिध्‍द विचारवंत श्री इ व्‍ही स्‍वामिनाथन यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे.  दि 12 जानेवारी 2013 रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात सकाळी 9.30 ते 12.30 दरम्‍यान ते भावनिक अभियांत्रीकी, जीवन जगण्‍याची कला, तणावमुक्‍ती आदी विषयावर आपले विचार मांडणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ. किशनराव गोरे राहणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  या कार्यक्रमास जास्‍तीतजास्‍त संख्‍येने विदयार्थ्‍यानी, नागरिकांनी, प्राध्‍यापकांनी व कर्मचा-यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटटणम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ नागोराव पवार यांनी केले आहे.

Wednesday, January 9, 2013

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीची विद्यापीठांतर्गत असलेल्या बदनापूर येथील संशोधन प्रक्षेत्रास भेट