वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या विस्तार शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र
शासनाचा कृषि विभाग व गृह विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिनांक 3 जानेवारी, 2014 शुक्रवार रोजी
सकाळी 11.00 वाजता कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात महिला शेतकरी मेळावा आयोजित
करण्यात आला असुन मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त मा डॉ
उमाकांत दांगट यांच्या हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा
कुलगूरू श्री संजीव जयस्वाल राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणुन बारामती येथील कृषि
विकास प्रतिष्ठाणाच्या विश्वस्त तथा भिमथडीच्या संयोजिका मा श्रीमती
सुनंदाताई राजेंद्र पवार तर शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ विश्वास
शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, लातुर येथील महिला उद्योजिका श्रीमती
आशाताई भिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्यात विद्यापीठातील शास्त्रज्ञ
शेतकरी महिलांना मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचे आयोजन देखिल करण्यात आले
आहे. मेळाव्यास महिला शेतकरी, शेतकरी बांधवानी व उद्योजकांनी मोठया संख्येने
उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, गृह विज्ञान
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता
प्रा विशाला पटनम व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ राकेश अहिरे यांनी केले
आहे.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼
Monday, December 30, 2013
Sunday, December 29, 2013
विविध पिक वाणांच्या बीज शुध्दतेकरिता प्रयत्न करणे गरजेचे... विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या
वनस्पती रोगशास्त्र विभाग व नवी दिल्ली येथील
भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ‘अन्नसुरक्षे करिता
पिकांवरील रोगांचे निदान व एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावरील दोन
दिवशीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोपात मार्गदर्शन करतांना विस्तार शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण, व्यासपीठावर डॉ. डि. बी. देवसरकर, डॉ. व्हि. व्हि. दातार, डॉ. के. के. झोटे , डॉ डी एन धुतराज, डॉ ए
पी सुर्यवंशी, डॉ एम ए पाटील आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या
वनस्पती रोगशास्त्र विभाग व नवी दिल्ली येथील
भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ‘अन्नसुरक्षे करिता
पिकांवरील रोगांचे निदान व एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावरील दोन
दिवशीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप दिनांक 28 डिसेंबर 2013 रोजी झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण होते तर
प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डि. बी. देवसरकर
उपस्थित होते. भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ.
व्हि. व्हि. दातार, सोलापुर येथील डाळींब
संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. व्ही. टी. जाधव, भारतीय कृषि संशोधन
संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख माजी प्रमुख डॉ. के. के. झोटे , बदनापुर कृषि
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डी एन धुतराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोपीय भाषणात विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्हणाले की, विद्यापीठाने
विकसित केलेली विषाणुजन्य रोगांना प्रतीकारक भेंडीची परभणी क्रांती हे वाण
विदेशात ही घेतले जाते, परंतु अशुध्द बियाणामुळे यावर ही विषाणुजन्य रोगांचा
प्रार्दुभाव आढळुन येत आहे. याकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या
रोग व कीड प्रतीकारक वाणांच्या बीज शुध्दते करिता पिक पैदासकार व पीक रोगशास्त्रज्ञानी
प्रयत्न करणे गरजेचे आहे. या दोन दिवशीय राष्ट्रिय परिसंवादामुळे सहभागी युवा
शास्त्रज्ञांना संशोधनात कार्य करण्यास प्रेरणा मिळेल, तसेच परिसंवादातील
शिफारशींचा भावी संशोधन कार्यक्रम आखण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी
त्यांनी व्यक्त केली.
या परिसंवादातील चार तांत्रिक सत्रात साधारणता 50 शास्त्रज्ञांनी
संशोधन लेखांचे सादरीकरण केले. या सादरीकरणातील शिफारशी संबंधीत तांत्रिक सत्रातील
अध्यक्ष डॉ के के झोटे, डॉ आर सी गुप्ता, डॉ एम ए पाटील, डॉ पी जी बोरकर व डॉ
गाडे यांनी समारोप कार्यक्रमात सादर केल्या, याचा अहवाल भारतीय वनस्पती रोगशास्त्र
संस्थेच्या वार्षिक बैठकीत मांडण्यात येणार आहेत. तसेच डॉ. व्हि. व्हि. दातार
यांनी प्रा एम जे नरसिंहम मेरिट अवार्डासाठी श्री डी पी कुलधर व श्रीमती प्रतिभा
निकम या पिक रोग शास्त्राज्ञांचे नामांकनासाठी नाव घोषीत केले. सहभागी शास्त्रज्ञापैकी
निलंगा येथील डॉ भगवान वाघमारे, दापोली येथील डॉ मकरंत जोशी व गुजरातमधील डॉ वनिता
सोळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ ए पी सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन डॉ नंदु भुते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एस एल बडगुजर यांनी केले.
कार्यक्रमास वनस्पती रोग शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी
मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ के टी आपेट, प्रा आर डब्लु
देशमुख, डॉ जे पी जगताप, डॉ व्ही एम
घोळवे, डॉ के डी नवगीरे, डॉ डी जी
हिंगोले, डॉ पी एच घंटे, प्रा आर व्ही
देशमुख, डॉ रवि चव्हाण तसेच विविध समित्याच्या सदस्यांनी परीश्रम
घेतले.
राष्ट्रिय परिसंवादात सहभागी युवा शास्त्रज्ञ |
Friday, December 27, 2013
अन्नसुरक्षेचे उदिष्ट साध्य करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाची भुमिका महत्वाची...मा. डॉ. चारुदत्त मायी
मार्गदर्शन करतांना आंतरराष्ट्रीय नामांकित शास्त्रज्ञ तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी |
अध्यक्षीय भाषण करतांना प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे |
देशातील एकुण 11.6 दशलक्ष हेक्टर कापुस
क्षेत्रापैकी 10.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाचे तंत्रज्ञान पोहचले आहे.
भविष्यात देशाने निश्चीत केलेले अन्न सुरक्षेचे उदिष्ट साध्य करण्यासाठी
जैवतंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नामांकित शास्त्रज्ञ
तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.
चारुदत्त मायी यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत असलेल्या वनस्पती रोगशास्त्र विभाग व नवी दिल्ली
येथील भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्था (Indian Phytopathological Society, IARI, New Delhi) यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजीत ‘अन्नसुरक्षे करिता पिकांवरील रोगांचे
निदान व एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावरील
राष्ट्रीय परिसंवादाचे (पश्चिम क्षेत्रीय) उदघाटनाप्रसंगी
बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे होते तर विस्तार शिक्षण संचालक
डॉ. अशोक ढवण, हैद्राबाद येथील राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थेचे
संचालक डॉ. ए. यु. एकबोटे, भारतीय कृषि संशोधन
संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. व्हि. व्हि. दातार, सोलापुर येथील डाळींब संशोधन
केंद्राचे माजी संचालक डॉ. व्ही. टी. जाधव, भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख माजी प्रमुख
डॉ. के. के. झोटे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डि. बी. देवसरकर यांची
प्रमुख उपस्थिती होती.
डॉ मायी पुढे म्हणाले की, सन 2002 पर्यतंच्या
दोन दशकात कापसाचे उत्पादन 14 ते 15 दशलक्ष गाठीपर्यंत स्थिरावले होते ते आता 35
दशलक्ष पर्यंत पोहचले आहे. तसेच 2003 साली कापसाची निर्यात नगण्य होती, ती आज 10
दशलक्ष गाठीपर्यत पोहचली आहे. सध्या देशामध्ये बिटी कापसाप्रमाणेच
जैवतंत्रज्ञानावर आधारीत विविध पिकांतील साधारणत: 10 प्रकारचे वाण तयार असुन मान्यतेची
वाट पहात आहेत. यामध्ये भरपुर जीवनसत्व अ युक्त भातामधील गोल्डन राईस, बिटी
वांगे, बिटी मका, जास्त प्रथिनयुक्त बटाटेचे वाण आदिंचा समावेश होतो. शेतक-यांना
कीड व रोग व्यवस्थापनावर मोठा खर्च करावा लागतो, रोग व कीड प्रतीकारक वाण
निर्मीतीमुळे शेतक-यांना कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न मिळु शकते. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मार्फत संशोधीत केलेले तुर, हरभरा, मुग आदीच्या रोग
प्रतीकारक वाण देशातच नाही तर विदेशात ही वापरले जातात. कृषि पदविधरांनी कृषिच्या
मुलभूत संशोधनात योगदान देणे आवश्यक असुन राष्ट्रिय पातळीवरील कृषि क्षेत्रातील
संशोधकांच्या पदाकरीत प्रयत्न करण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी कृषि
पदविधरांना दिला.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे म्हणाले की, अन्न सुरक्षा व
पिकांचे रोग व्यवस्थापन यात निकडचा संबंध आहे. दरवर्षी पिकांमध्ये रोग व कीडी
मुळे 37 ते 40 टक्के नुकसान होते, त्याची अंदाजे किंमत 2 अब्ज अमेरिकन डॉलर
होते. 2050 सालीच्या देशाची लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी शेतीचे उत्पादन
दुप्पट करावे लागेल. यासाठी पिक रोगशास्त्र व कीडशास्त्राचे योगदान मोलाचे
ठरणार आहे. विशेषता जैवीक व अजैवीक ताण, हवामान बदल, नैसर्गीक संसाधनाची कमतरता,
काढणी पश्चात अन्नधान्याची होणारी हानी यामुळे अन्न सुरक्षेचे उदिदष्ट गाठण्यास
अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यादृष्टिने हा राष्ट्रिय परिसंवाद अत्यंत महत्वाचा
आहे.
परिसंवादास महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतुन वनस्पती रोग शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बदनापुर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डी एन धुतराज यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ए पी सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ के टी आपेट, प्रा आर डब्लु देशमुख, डॉ जे पी जगताप, डॉ व्ही एम घोळवे, डॉ के डी नवगीरे, डॉ डी जी हिंगोले, डॉ पी एच घंटे, डॉ एस एल बडगुज, प्रा आर व्ही देशमुख, तसेच विविध समित्याच्या सदस्यानी परीश्रम घेतले.
परिसंवादास महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतुन वनस्पती रोग शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बदनापुर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डी एन धुतराज यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ए पी सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ के टी आपेट, प्रा आर डब्लु देशमुख, डॉ जे पी जगताप, डॉ व्ही एम घोळवे, डॉ के डी नवगीरे, डॉ डी जी हिंगोले, डॉ पी एच घंटे, डॉ एस एल बडगुज, प्रा आर व्ही देशमुख, तसेच विविध समित्याच्या सदस्यानी परीश्रम घेतले.
Thursday, December 26, 2013
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्पर्धामंचाच्या संकल्प व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प
मार्गदर्शन करतांना गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ विलास पाटील |
कृषि उपसंचालक श्रीमती रक्क्षा शिंदे |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्पर्धामंचाच्या 2013
यावर्षातील संकल्प व्याख्यानमालेचे शेवटच्या पुष्पात दि 25 डिसेंबर 2013 रोजी कृषि उपसंचालक श्रीमती
रक्क्षा शिंदे, उपजिल्हाधिकारी श्री जनार्धन विधाते, भारतीय सेनेतील कॅप्टन बालाजी
सुर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी डॉ अभय पडिले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्य
अध्यक्षस्थानी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ विलास पाटील होते तर व्यासपीठावर
ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्ही काळपांडे, मंचाचे अध्यक्ष
अमोल राठोड, उपाध्यक्ष शिवाजी येवतीकर, विद्यार्थीनी
अध्यक्ष कु स्वाती कदम, उपाध्यक्ष कु
प्रियांका शिंदे उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्पर्धामंच
विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थीनी मार्फत स्पर्धापरीक्षेच्या
तयारीसाठी मार्गदर्शन वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, चाचणी
परिक्षा असे विविध उपक्रम राबविले जातात त्या अंतर्गत या व्याख्यानमालेचे आयोजन
कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.
कृषि उपसंचालक श्रीमती रक्क्षा शिंदे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या
कि, स्पर्धा परीक्षात यशासाठी तसेच नौकरी करीयर मध्ये चांगले काम करण्यासाठी
मुलींनी निर्णय क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. कष्ट, जिकाटी व वेळेचे नियोजन
हेच यशाचे गमक आहे. इंग्लीश व मराठी वृत्तपत्राचे नियमीत वाचन करण्याचा सल्लाही
त्यांनी दिला. श्री जनार्धन विधाते यांची यावर्षी उपजिल्हाधिकारी यापदावर नियूक्ती
झाली असून सध्या ते मंडल कृषि अधिकारी यापदावर कार्यरत आहेत. ते आपल्या भाषणात
म्हणाले की, मी सर्वसामान्य कुटुंबातुन दहावी व बारावीत जेमतेम मार्क घेउन ऊर्त्तीण
झालो तरी आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोनाच्या आधारे उपजिल्हाधिकारी होऊ
शकलो. विद्यापीठातील चार वर्षीचा शैक्षणिक काळ तुम्हाच्या आयुष्याची दिशा ठरविणार
असुन या काळात तुम्ही वाईट गोष्टीपासुन दुर रहावे. भारतीय सेनेतील कॅप्टन
बालाजी सुर्यवंशी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, माझी भारतीय सेनेत निवड झाली
यांचे श्रेय मी कृषि महाविद्यालयाला देतो. कृषि पदवीधरांनी राज्याच्या व देशाच्या
कृषि क्षेत्रात योगदान देण्याची गरज आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियमित वाचन
महत्वाचे आहे. वाचन करून विचार मंथन केल्यास विविध विषयावर स्वत:च्या व्यापक
दृष्टिकोन विकसित होतो. अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ विलास पाटील म्हणाले
की, विद्यार्थ्याचा स्पर्धामंचाचे विविध उपक्रम हे अत्यंत चांगले असुन यामुळे
अनेक विद्यार्थ्या घडत आहेत. विद्यार्थ्याची जिद्द व शंभर टक्के प्रयत्न हेच
परिक्षात यश मिळवुन देतात. या प्रसंगी डॉ अभय पडिले व डॉ एच व्ही काळपांडे
यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
नितिन लिंगायत यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सुनिल भालेकर यांनी तर
आभार प्रदर्शन देवानंद शेटे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुजित सानप, संदिप पवार, सतीश काकडे, गोपाल गजानन, अरूण सिरसाट, स्वाती
खाडे, पल्लवी पवार व मंचाच्या सदस्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास
विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते तसेच मान्यवरांनी विद्यार्थीशी
थेट संवाद साधुन स्पर्ध परिक्षेबाबत शंकाचे समाधान केले.
उपजिल्हाधिकारी श्री जनार्धन विधाते |
कॅप्टन बालाजी सुर्यवंशी |
डॉ एच व्ही काळपांडे |
डॉ अभय पडिले |
Friday, December 20, 2013
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या वनस्पती रोगशास्त्र विभाग व नवी दिल्ली येथील भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्था (Indian Phytopathological Society, IARI, New Delhi) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पिकांवरील रोग : निदान, एकात्मिक व्यवस्थापन आणि अन्नसुरक्षा’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे (पश्चिम क्षेत्रीय) आयोजन कृषि महाविद्यालय, परभणी येथे दि. 27 व 28 डिसेंबर, 2013 रोजी करण्यात आले आहे.
परिसंवादाचे
उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू मा. श्री संजीव
जयस्वाल (भाप्रसे) यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन
आंतरराष्ट्रीय नामांकित शास्त्रज्ञ तथा भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ, नवी
दिल्ली चे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे
शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बालासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदरील परिसंवादात पुणे येथील भारतीय कृषि संशोधन
संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. व्हि. व्हि. दातार, नवी दिल्ली येथील
वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञा डॉ. प्रतिभा शर्मा, सोलापुर
येथील डाळींब संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञा डॉ. ज्योत्स्ना शर्मा,
खांडवा (इंदौर) येथील सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.
जी. के. गुप्ता, हैद्राबाद येथील राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थेचे
डॉ.ए.यु.एकबोटे, सोलापुर येथील डाळींब संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. व्ही.
टी. जाधव, भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख माजी प्रमुख
डॉ. के. के. झोटे, महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ
डॉ. बी. पी. कुरुंदकर इत्यादी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाराष्ट्र,
गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतुन वनस्पती रोग शास्त्रज्ञ, प्राध्यापक,
विद्यार्थी या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे
गठण करण्यात आले आहे. कृषि क्षेत्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापकवृंद आणि
विद्यार्थ्यांनी परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन परिसंवादाचे आयोजन सचिव व विभाग
प्रमुख डॉ. ए. पी. सुर्यवंशी यांनी केले आहे. Friday, December 13, 2013
मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला
भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान
अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ
राहील. कमाल तापमान २७.० ते २९.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान ११.० ते १४.० अंश
सेल्सीअस राहील. वारा ताशी २.० ते १२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३९.० ते ७०.० टक्के तर
दुपारची सापेक्ष आर्द्रता १९.० ते ३२.० टक्के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात सौम्य थंडी राहून आकाश अंशतः
ढगाळ राहील.
मराठवाडयातील शेतकरी बांधवाना कृषि सल्ला
रब्बी
ज्वार
|
खोडमाशी
|
हलक्या प्रतिच्या जमीनीत ज्वारीची पेरणी
केली असल्यास खुरपणी करून संरक्षीत हलके पाणी द्यावे. मध्यम ते भारी जमीनीत
पेरणी केलेल्या ज्वारीचे पीक खुरपणी करून तणविरहीत ठेवावे. डुकराचा
प्रादूर्भाव ज्या ठिकाणी दिसून येत असेल अशा ठिकाणी तातपुरते तारेचे तयार
करावे.
|
करडई
|
मावा
|
करडईचे पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याचे
नियंत्रणासाठी डायामिथोएट ३० टक्के १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मिली प्रति
१० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
|
हळद
|
कंद माशी
|
हळदीचे पिकास नियमीत पाणी द्यावे. ज्या ठिकाणी कंद
माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असेल अशा ठिकाणी फोरेट १० जी हेक्टरी ६ किलो
जमीनीतून द्यावे.
|
केळी
|
|
केळीच्या मृगबागेस खते देणे बंद करावे. केळीचे बागेस
नियमीत पाणी द्यावे. केळीची कांदे बाग लागवड केली असल्यास नत्राचा दुसरा हप्ता
८२ ग्रॅम युरीया दिला नसल्यास प्रति झाड देउन पाणी द्यावे. थंडीपासून सरंक्षण
करणे करिता बागेस सजिव कुंपणाची वाढ होउ द्यावी.
|
आंबा
|
|
नविन लागवड केलेल्या आंब्याच्या बागेस नियमीत पाणी
द्यावे. जुन्या बागेचे पाणी देणे बंद ठेवावे. आंब्यावरील तुडतुडे किडीच्या
नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन खोडासह फवारणी
करावी. मागील पंधरवाडयात झालेल्या अवकाळी पाउस व धुक्यामुळे भुरीरोगाचा प्रादूर्भाव
आढळुन येत आहे. त्याचे नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारा गंधक २५ ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
|
अंजीर
|
|
आंबेबहार धरण्याकरीता अंजीराचे बागेस अंतरमशागतीची कामे
करून बाग स्वच्छ ठेवावी. हस्तबहार घेतलेल्या बागेतील पक्व फळांची काढणी व
प्रतवारी करून कागदी पेटयातून विक्रीसाठी पाठवावीत.
|
चिकु
|
|
बागेस नियमीत पाणी द्यावे.
|
फुलशेती
|
|
अॅस्टरची लागवड केलेल्या फुलपिकास नत्राची मात्रा देउन
पाणी द्यावे. गुलाबाच्या फुलांची नियमीत काढणी करून विक्रीसाठी पॅकींग करून
बाजार पेठेत पाठवावी. पिकास नियमीत पाणी द्यावी.
|
कृषि अभियांत्रीकी : परतीच्या मान्सुन ज्या ठिकाणी
पडला तेथे सध्या पिकांना पाणी देण्याची आवश्यकता नाही. पूर्ण रब्बी हंगामात
पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे. शेतीच्या पाण्याचे काटेकोरपणे
नियोजन गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळयात पाण्याची कमतरता येणार नाही.
|
सौजन्य
केंद्र प्रमुख, ग्रामिण कृषि
मौसम सेवा
कृषि
हवामानशास्त्र विभाग
पञक क्रमांकः ६६, दिनांकः १३.१२.२०१३
Wednesday, December 11, 2013
अयोग्य जीवनशैलीमुळे असाध्य रोगांच्या प्रमाणात वाढ...... आहारतज्ञा डॉ. रीता रघुवंशी
आहारतज्ञा डॉ रीता रघुवंशी यांचे स्वागत करतांना संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, प्रा विशाला पटणम, डॉ डी बी देवसरकर, डॉ अर्जना सिंग, डॉ विजया नलवडे आदी |
आहारतज्ञा डॉ रीता रघुवंशी मार्गदर्शन करतांना |
आजच्या अयोग्य जीवनशैलीमुळे मधुमेह,
हदयरोग, कॅन्सर, संधीवात या रोगांचे प्रमाणात वाढ होते आहे. देशात एका बाजुला
कुपोषण तर दुस-या बाजुस अतिरीक्त व अयोग्य आहारामुळे लठ्ठपणा अशा दोन्ही समस्या
भेडसवत आहे, असे प्रतिपादन पंतनगर येथील जे बी पंत कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठांतील
गृहविज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा आहारतज्ञा डॉ रिता रघुवंशी यांनी
केले.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘जीवनशैलीमुळे निर्माण होणा-या
रोगाच्या प्रतिबंधासाठी आहार’ याविषयावर गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि
महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत व्याख्यानात मार्गदर्शन करतांना
त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर होते तर बिकानेर येथील राजस्थान कृषि विद्यापीठाच्या गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ अर्जना सिंग, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी
अधिष्ठाता प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डि बी
देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ
रीता रघुवंशी पुढे म्हणाल्या की, संतुलित आहार व आदर्श जीवनशैलीमुळे अनेक
रोगांना आपण प्रतिबंध करु शकतो. यामध्ये दररोज तीस मिनीटे शारीरीक व्यायाम,
वजनावर नियंत्रण व संतुलित आहार ह्या महत्वाच्या बाबी आहेत. यावेळी त्यांनी
विविध जीवनसत्वाचा व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा रोग प्रतिबंधामध्ये असलेली
भुमिका स्पष्ट केली. टि. व्ही. पाहात जेवण करणे, रात्री उशीरा जेवण करणे, फास्ट
फुडचा वापर, व्यायामाचा अभाव ह्या अयोग्य जीवनशैली अनेक रोगास कारणीभुत आहे. वनस्पती
तुपात तयार केलेले पदार्थ आरोग्यास अत्यंत हाणीकारक असुन तिळ, शेंगदाणा,
सुर्यफुल, सोयाबीन या विविध तेलांचा संमिश्र वापर आहारात केला पाहिजे. जेवढे उष्मांक
आपण जेवणातुन घेतो, तेवढ्या उष्माकांचा वापर शरीराद्वारे झाला पाहिजे. मधुमेहामध्ये
मेथ्याचा वापर अत्यंत उपयुक्त असुन कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थाचा
वापर आहारात जास्तीत जास्त असला पाहिजे. जास्त रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी
मिठाचा आहारात प्रतिदिनी पाच ते सात ग्रॅम या प्रमाणात नगण्य वापर केला पाहिजे,
असा सल्ला त्यांनी दिला.
अध्यक्षीय
भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, भारत देश मधुमेहाची
राजधानी होत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवन पध्दती असुन लोकांमध्ये
आहाराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. ‘गृह विज्ञान आपल्या दारी’
या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण महिलांमध्ये याबाबत मार्गदर्शन होत आहे ही चांगली
बाब आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित
श्रोत्यांच्या शंकांचे समाधान डॉ. रीता रघुवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला पटणम यांनी केले तर प्रमुख वक्त्याचा परीचय डॉ
विजया नलवडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ आशा आर्या यांनी तर आभार
प्रदर्शन डॉ नाहीद खान यांनी केले. व्याख्यानास नागरीक, विद्यार्थी, प्राध्यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप करतांना संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर |
Monday, December 9, 2013
हिंगोली जिल्हातील मौजे हटटा, बोरी सावंत व आडगांव येथे ‘गृह विज्ञान आपल्या दारी, ........
मार्गदर्शन करतांना डॉ विजया नलवडे |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या गृह
विज्ञान महाविद्यालयातर्फे ‘गृह विज्ञान आपल्या दारी,
कुटूंबाचे कल्याण करी’ या अभियानांतर्गत तिर-या फेरीमध्ये
दि 7 डिसेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील मौजे हटटा, बोरी सावंत व आडगांव येथे
कार्यक्रम घेण्यात आले. मौजे हटटा येथे डॉ विजया नलवडे यांनी ‘गृह विज्ञानाचे शिक्षण’, तर डॉ फरजाना फारोखी यांनी ‘उत्तम पोषण उत्तम आरोग्य – हीच खरी कुटुंबाची दौलत’ याविषयावर तर डॉ जयश्री रोडगे यांनी ‘कौटुंबिक उत्पन्नास लावण्या हातभार – गृहिणींनो करा लघुउघोगाचा स्वीकार’ याविषयी इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन
उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी
तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनावर आधारित प्रश्न मंजुषा घेवून अचुक उत्तरे
देणा-या लाभार्थ्यांना ‘उत्कृष्ट श्रोता पुरस्कार’ देण्यात आले. या निवडक गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन संशोधन
सहयोगी अर्चना भोयर, रुपाली पतंगे, शितल राठोड यांनी केले. कार्यक्रमात गृह
विज्ञान महाविद्यालय निर्मीत कुटुंबयोगी पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री केली.
कार्यक्रमांना महिला, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Saturday, December 7, 2013
जीवनशैलीमुळे निर्माण होणा-या रोगाच्या प्रतिबंधासाठी आहार यावर डॉ रिता रघुवंशी यांचे व्याख्यान
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘जीवनशैलीमुळे
निर्माण होणा-या रोगाच्या प्रतिबंधासाठी आहार’ याविषयावर पंतनगर येथील जे बी पंत कृषि व तंत्रत्रान विद्यापीठांर्गत असलेल्या गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ रिता रघुवंशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि 11
डिसेंबर 2013 बुधवार सकाळी 10.30 वाजता कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात
आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे
राहणार असुन विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. व्याख्यानास विद्यार्थी, प्राध्यापकवृंद
व कर्मचारीवृंदानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ डि बी देवसरकर यांनी केले
आहे.
Wednesday, December 4, 2013
मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला
भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहून दिनांक ४ डिसेंबर रोजी जालना, बीड, उस्मानाबाद,लातुर व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २७.० ते ३२.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान १३.० ते २१.० अंश सेल्सीअस राहील. वारा ताशी ४.० ते १२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१.० ते ८५.० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८.० ते ५१.० टक्के राहील.
विशेष सुचना - या आठवडयात आकाश ढगाळ राहून दिनांक ४ डिसेंबर रोजी जालना, बीड, उस्मानाबाद,लातुर व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्याची शक्यता आहे.
शेतकरी बांधवाना कृषि सल्ला
गहू
|
वेळेवर पेरणी केलेल्या गव्हाचे पिकास नत्राची दुसरी मात्रा दिली नसल्यास हेक्टरी ५० किलो देण्यात यावी. गव्हाची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत पुर्ण करावी. हेक्टरी १००-११० किलो बियाण्याचा वापर करावा. पेरणीपुर्वी बियाण्यास अॅझेटोबॅक्टर या जैविक खताची बिजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी परभणी ५१, लोक-१, त्र्यंबक या वाणाची निवड करावी.
| |
हरभरा
|
घाटे अळी
|
हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याचे नियंत्रणासाठी २० टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस २० मिली किंवा क्विनॉफलफॉस १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
|
तुर
|
पोखरणारी अळी
|
तुरीचे पिकात शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत आहे. त्याचे नियंत्रणाकरीता प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४० टक्के २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
|
उस
|
सुरू उसाचे लागवडीसाठी मध्यमकाळी व उत्तम पाण्याचा उत्तम निचरा होणा-या जमीनीची निवड करून पुर्व मशागतीचे कामे पुर्ण करून घ्यावीत. पुर्व हंगामी लागवड केलेल्या उसाची पिकात खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवावे.
| |
डाळिंब
|
आंबेबहार धरलेल्या डाळिंबाचे बागेत अंतरमशागतीची काम पुर्ण करून बाग स्वच्छ ठेवावी. खोडावर बोर्डोपेस्ट लावावे.
| |
संत्रा मोसंबी
|
संत्रा व मोसंबीचे बागेत अंतरमशागतीची कामे पुर्ण करून घ्यावीत.
| |
पेरू
|
पेरूच्या पक्व फळांची काढणी करावी. फळांची प्रतवारी करून विक्रीसाठी प्लास्टीकच्या कॅटरस मधुन बाजार पेठेत पाठवावी.
| |
कागदीलिंबु
|
आंबेबहार धरण्यासाठी कागदी लिंबाचे बागेस पाणी देणे बंद करावे. आळयात टाचन करून घ्यावी. खोडावर बोर्डोपेस्ट लावावे.
| |
भाजीपाला
|
कोबीवर्गीय पिकातील अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
| |
पशुधन व्यवस्थापन : लाळया खुरकुत रोगाचे लसीकरण करून घ्यावे.
|
सौजन्य
केंद्र प्रमुख
ग्रामिण कृषि मौसम सेवा
कृषि हवामानशास्त्र विभाग, व.ना.म.कृ.वि. परभणी
पञक क्रमांकः ६३ दिनांकः ०३.१२.२०१३