Pages

Tuesday, November 28, 2017

राष्‍ट्रीय छात्रसेना दिवसानिमित्‍त रक्तदान शिबिर संपन्‍न


राष्‍ट्रीय छात्रसेना दिवसानिमित्‍ताचे औचित्‍य साधुन कृषि महाविद्यालय परभणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख डॉ. जी. एम. वाघमारे उपस्थित होते. रक्‍तदान शिबिरात 35 छात्रसैनिकांनी रक्तदान केले. या प्रसंगी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.कनकदंडे यांनी राष्‍ट्रीय छात्र सैनिकांना रक्तदान महत्व व गरज या विषयी मार्गदर्षन केले. शिबिराच्‍या यशस्वीतेसाठी राष्‍ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट  डॉ. ए. बी. बागडे, विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुब्बाराव, राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. डी. देशमुख व सिनिअर अंडर ऑफिसर वैभव ढोकरे यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, November 22, 2017

तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

सद्यपरिस्थितीत तूर पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील 3 - 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच आंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येऊ शकतो. काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळया व फुले फस्त करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कीडींचा प्रादुर्भाव कळया, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत आढळून येतो, त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.
शेंगा पोखरणारी अळी सुरुवातीच्या काळात अळया पिकाच्या कोवळया पानांवर, फुलावर किंवा शेंगावर उपजीवीका करतात, नंतर शेंगा भरतांना त्या दाणे खातात. दाणे खात असतांना त्या शरीराचा पूढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेऊन आतील कोवळया दाण्यावर उपजीवीका करतात. या कीडींमुळे तुर पिकाचे जळपास 60-80 टक्के नुकसान होते. प्रथीनांचे प्रमाण जास्त असलेल्या शेंगा/ दाण्यावर अळी उपजीवीका करतात.

किडींचे व्यवस्थापन :
1. तुरीमध्ये एकरी 4 कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) घाटेअळीच्या पतंगासाठी पिकांच्यावर एक फुट उंचीवर लावावेत.
2. तुरीवरील मोठया अळया वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
3. पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
4. अळया लहान अवस्थेत असतांनाच एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची 250 एल.ई. प्रति हेक्टरप्रमाणे फवारणी करावी.
5. जर कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास क्विनलफॉस 25 ईसी. 28 मिली., लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6. अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेझोएट 5 एस जी 4.5 ग्रॅम, इंडोक्झाकार्ब 14.5 एस  सी. 8 मिली किंवा स्पिनोसॅड 45 एस सी 3 मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एस. सी. 2 मि.ली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एस सी 3 मिली  प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Ø पावर स्प्रेसाठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे.
Ø किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास 10 दिवसाच्या अंतराने करावा.
Ø शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हतमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षितेची योग्य ती काळजी घ्यावी.

अशा प्रकारे तुरीवरील शेंगा पोखणारी अळीचे व्यवस्थापन करावेअसे आवाहन कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख  डॉ. पी. आर. झंवर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत बडगुजर, डॉ. बस्वराज भेदे यांनी केले आहे.

Monday, November 20, 2017

कृषिच्‍या विद्यार्थ्‍याना सक्षम करण्‍यासाठी प्रात्‍यक्षिकांवर भर देणे आवश्‍यक.......डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरू मा. डॉ विलास भाले

माडॉविलास भाले यांची डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरू म्‍हणुन निवडीबाबत भारतीय कृषिविद्या संस्‍थेच्‍या परभणी शाखेच्‍या वतीने सपत्‍नीक सत्‍कार
कोणत्‍याही क्षेत्रात यश प्राप्‍त करण्‍यासाठी काम करण्‍याची इच्‍छा, निष्‍ठा व कामा प्रती पुर्ण समर्पण पाहिजे, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍यासाठी प्रात्‍यक्षिकांवर जास्‍त भर देणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरू मा. डॉ विलास भाले यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषिविद्या संस्‍थेच्‍या परभणी शाखेच्‍या वतीने कृषि महाविद्यालयात दिनांक 20 रोजी शाश्‍वत शेतीकरिता संसाधन व्‍यवस्‍थापन याविषयावर कुलगुरू मा. डॉ विलास भाले यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रंसगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुल माजी शिक्षण संचालक डॉ एम व्‍ही ढोंबळे हे उपस्थित होते. शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ ए एस कडाळे, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. विलास भाले आपल्‍या व्‍याख्‍यानात पुढे म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष फवारणी, नांगरणी, ट्रॅक्‍टर चालविणे, खुरपणी आदी आले पाहिजे, तरच ते सक्षम बनतील. राज्‍यातील 80 टक्के शेती ही कोरडवाहु असुन शेतीसाठी एक ते दोन संरक्षित पाण्‍याची सोय झाली तर शेतक-यांचे उत्‍पादन दुप्‍पट होऊ शकते हे प्रयोगांती सिध्‍द झाले आहे. राज्‍यातील विद्यापीठे सक्षम करण्‍यासाठी विद्यापीठ मॉडेल अॅक्‍ट राबविण्‍याची गरज असुन देश पातळीवर विद्यापीठाचे मुल्‍यांकन सुधारण्‍यासाठी सर्वांना गांभीर्यानी प्रयत्‍न करावी लागतील. अकोला कृषि विद्यापीठाचा कुलगुरू म्‍हणुन काम करतांना परभणीच्‍या कृषि विद्यापीठात कार्यरत असतांना केलेल्‍या कामाच्‍या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय समारोप कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केला तर माजी शिक्षण संचालक डॉ एम व्‍ही ढोंबळे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, मा. कुलगुरू डॉ विलास भाले यांचे परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या जडणघडणीत मोठे योगदान आहे.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू म्‍हणुन नियुक्‍तीबाबत मा. डॉ विलास भाले यांचा सन्‍मानपत्र देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार डॉ डब्‍लु एन नारखेडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, November 18, 2017

लातूर येथील कृषी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न

लातूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील लातुर येथील कृषि महाविद्यालयात दिनांक ११ नोव्हेंबर रोजी विविध कलाक्षेत्रात विशेष नाविन्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कुलगुरू मा. डॉ. बी.व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अच्युत हांगे, ग्रामीण पोलीस स्थानक लातूरचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. बी. भोसले, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. ए. पी. सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विविध क्षेत्रात यश प्राप्‍त केलेल्‍या विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापकांचे अभिनंदन करून भविष्यातही विद्यार्थ्यांनी कठोर परिक्षम घेऊन यश प्राप्‍त करावे असे सांगुन महाविद्यालयाचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये विविध क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या ६० विद्यार्थी-विद्यार्थीनिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. कौतुक सोहळयाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सोबतच विविध राष्ट्रीय परिसंवाद, कार्यशाळा येथे विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव २०१७ मध्ये औरंगाबाद येथे हरयानवी लोकनुत्य प्रकारात व्दितीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थीनीने तसेच लावणी या प्रकारात उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांने आपल्या कलेचे सादरीकरण केले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठात विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करीत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती देशमुख व डॉ. विजय भांबरे यांनी केले व आभार डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांनी मानले.

Wednesday, November 15, 2017

बाजारभावाची अद्यावत माहिती व हवामान अंदाजातील अचुकता यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे ..... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

शेती क्षेत्रामध्‍ये माहीती तंत्रज्ञानाचा वापरावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी व महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्‍ट्री आणि अॅग्रीकल्‍चर व ठाकुर इंस्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट स्‍टडीज, करिअर डेव्‍हलपमेंट व रिसर्च यांचे संयुक्‍त विदयमाने कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्रात दिनांक 14 नोव्‍हेबर रोजी शेती क्षेत्रामध्‍ये माहीती तंत्रज्ञानाचा वापर यावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्‍न झाली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्‍ट्री आणि अॅग्रीकल्‍चर चे उपाध्‍यक्ष श्री. समीर दुधगांवकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, प्राचार्य डॉ. ए. एस. कडाळे, डॉ. यु. एन. आळसे, ठाकुर इंस्टिटयुट, मुंबई च्‍या डॉ. वनिता गायकवाड, प्रगतशील शेतकरी श्री. सोपानराव आवचार, श्री. पाडुरंगराव आढाव, श्री प्रताप काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या गरजेनुसार तंत्रज्ञान असले पाहिजे. अनेक शेतकरी कृषि तंत्रज्ञान प्राप्‍त करण्‍यासाठी अॅप्‍स व मोबाईलचा वापर करत असुन उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञान शेतकरी लगेच आत्‍मसात करतात. माहिती तंत्रज्ञानाचा हवामान अंदाजातील अचुकता वाढवण्‍यासाठी होणे आवश्‍यक आहे. बाजारभावाची अदयावत माहीती व कृषि रसायनांच्‍या वापरातील बारकावे शेतक-यांना तात्‍काळ अवगत करणे, बियाणे व इतर निविष्‍ठांची माहीती देणे याबाबीसाठी माहिती तंत्रज्ञान वापर होणे गरजेचे आहे.
यावेळी श्री. समीर दुधगांवकर यांनी महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्‍ट्री अँड अॅग्रीकल्‍चर या संस्‍थेची कार्यप्रणाली सांगितली तसेच मुबंई येथे फेब्रुवारी मध्‍ये आयोजित माहिती तंत्रज्ञानाचा कृषि व पोषण विकासावरील आंतरराष्‍ट्रीय परिषदेबाबत माहिती देऊन सदरिल परिषदेत विद्यार्थ्‍यी व शास्‍त्रज्ञांनी शोध निबंध पाठवुन सहभाग घ्‍यावा, असे आवाहन केले. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी विदयापीठाद्वारे विकसीत विविध अॅप व समाज माध्‍यमांचा वापर शेतकरी करीत असल्‍याचे नमुद केले.

कार्यशाळेत प्रगतीशील शेतकरी, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विदयार्थी यांच्‍या मध्‍ये या विषयावर सविस्‍तर चर्चा झाली.   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पी.आर. देशमुख यांनी केले तर कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी प्रा. पी. एस. चव्‍हाण, प्रा. डी. डी. पटाईत, श्री. के. डी. कौसडीकर, श्री. बापुसाहेब कदम व महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Friday, November 10, 2017

कीटकनाशकांचा सुरक्षित वापर याबाबत विविध स्‍तरावर जनजागृती करण्‍याची गरज.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत किटकनाशकांचा सुरक्षित वापर यावरील विभागीय कार्यशाळा संपन्‍न

किटकनाशकांच्‍या फवारणी पासुन विषबाधा होऊन यवतमाळ जिल्‍हयात अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले, याप्रकारच्‍या घटना ओरिसा व तामिळनाडु राज्‍यात ही घडल्‍या आहेत. मराठवाडयात यासारख्‍या घटना होऊ नयेत म्‍हणुन शेतक-यांमध्‍ये कीटकनाशकांचा सुरक्षित वापराबाबत जागृतीसाठी कृषि विभाग व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना प्रयत्‍न करावी लागतील, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन, कापूस आणि तूर व हरभरा पिकावरील कीड - रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत दिनांक १० नोव्हेबर रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठातील जिल्हा समन्वयक शास्त्रज्ञ यांच्यासाठी किटकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयावर विभागीय कार्यशाळा व मध्यहंगाम प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला, कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री आर एस भताने हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी (परभणी) श्री बी आर शिंदे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी (नांदेड) श्री पी एस मोटे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्रकल्‍प संचालक श्री आर एस चोले, श्री एम एल चपळे, श्री आर टी सुखदेव, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ पी आर देशमुख, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विस्‍ताराकाबरोबरच किटकनाशक विक्रत्‍यांना ही याबाबत प्रबोधन करणे गरजेचे असुन कीटकनाशकांचा सुरक्षीत वापरावरील पोस्‍टर व मार्गदर्शिका गावागावात व कीटकनाशक विक्री केंद्रावर उपलब्‍ध करून देण्‍यात यावेत. किटकनाशकांची बाधा झाल्‍यास प्रथमोपचारासाठी घ्‍यावयाची दक्षतेबाबत गावातील प्राथमिक आरोग्‍य केद्रातील वैद्यकिय अधिकारी यांच्‍याशी ही समन्‍वय राखणे गरजेचे आहे.
विभागीय कृषि सहसंचालक श्री आर एस भताने आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, तुर, कापुस व रब्‍बी हंगामातील हरभरा पिकांवरील कीड - रोग व्‍यवस्‍थापन करतांना कीटकनाशकांचा वापर योग्‍यरित्‍या करण्‍यासाठी कृषि विभागातील क्षेत्रीय अधिका-यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करावे. कार्यशाळेत अवगत केलेले तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत त्‍वरीत पोहचवावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले तर आभार श्री आर टि सुखदेव यांनी मानले. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ पी आर झंवर, डॉ ए जी बडगुजर, डॉ बी व्‍ही भेदे व डॉ डि पी कुळधर लिखित कीटकनाशकांचा सुरक्षित वापर मार्गदर्शिकेचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमास कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व विद्यापीठातील जिल्‍हा समन्‍वयक, शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळेत कीटकनाशकांचा किफायतशीर वापर, वर्गीकरण, हाताळणी यावर तसेच कपाशीवरील शेदरी बोंडअळी, तुर पिकावरील किडींचे व्‍यवस्‍थापन व किडींचे सर्वेक्षण यावर मार्गदर्शन करण्‍यात आले. शास्‍त्रशुध्‍द फवारणीचे प्रात्‍यक्षिकही कार्यशाळेत दाखविण्‍यात आले. कार्यशाळे यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Thursday, November 9, 2017

वनामकृवित इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवाचा शानदार समारोप

मुंबई विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्‍हापुरच्‍या शिवाजी विद्यापीठास उपविजेतेपद 
मुंबई विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद
कोल्‍हापुरच्‍या शिवाजी विद्यापीठास उपविजेतेपद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात १५ वी महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सव इंद्रधनुष्‍य २०१७ स्‍पर्धेचे आयोजन दिनांक ५ ते ९ नोव्‍हेबर दरम्‍यान करण्‍यात आले होते, सदरिल महोत्‍सवाचा समारोप दिनांक ९ नोव्‍हेबर रोजी पार पाडला. कार्यक्रमास परभणीचे खासदार मा. श्री संजय जाधव यांची प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती होती तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, स्‍पर्धा निरिक्षक डॉ अनिल पाटील, डॉ अजय देशमुख, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, कुलसचिव डॉ दिनेश भोंडे, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार मा. श्री संजय जाधव आपल्‍या मार्गदर्शन म्‍हणाले की, परभणी ही संताची भुमी असुन संस्‍कृतीचे माहेरघरात पार पाडलेल्‍या युवक महोत्‍सवात सहभागी कलावंत विद्यार्थ्‍यीनी महोत्‍सवातील आठवणीसोबत घेऊन जाव्‍यात, असे सांगुन विजयी कलावंत विद्यार्थ्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या तर अध्‍यक्षीय समारोपीत कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी राज्‍यातील विविध विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कलावंतानी आपल्‍या कलागुणांचे मोठया शिस्‍तीत सादरिकरण केल्‍याबाबत कौतुक केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवाच्‍या उत्‍कृष्‍ट आयोजनाबाबत माननीय राज्‍यपाल नियुक्‍त स्‍पर्धेा निरीक्षक डॉ अजय देशमुख व डॉ अनिल पाटील यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्‍यी वैष्‍णवी पाठक, हर्षल गाडे, आकाश पाटील यांनी तसेच संघ प्रशिक्षक डॉ निलेश सावे व डॉ विजया पाटील यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनीही पार पडलेल्‍या महोत्‍सवाबाबत माहिती दिली तर प्रास्‍ताविक विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशा आर्या, डॉ दयानंद मोरे व प्रा. सुनिल तुरकमाने यांनी केले तर आभार अशोक खिल्‍लारे यांनी मानले.
मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विजयी संघाना पारितोषकांचे वितरण करण्‍यात आले. स्‍पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मुंबई विद्यापीठाने प्राप्‍त केला तर सर्वसाधारण उपविजेतेपदाचा बहुमान शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर यांनी प्राप्‍त केला. गोल्‍डन बॉयचा पुरस्‍कार शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थ्‍यी ऋषिकेश देशमाने यांनी पटकावला तर गोल्‍डन गर्लचा पुरस्‍कार मुबंई विद्यापीठाची विद्यार्थ्‍यीनी हेमांगी चौधरी हिने पटकावला.
मान्‍यवरांच्‍या हस्‍ते युवक महोत्‍सवाच्‍या ध्‍वजाचे आरोहण करण्‍यात येऊन सदिरल ध्‍वज पुढील वर्षी इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवाचे आयोजक यशवंतराव चव्‍हाण महाराष्‍ट्र मुक्‍त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनेश धोंडे यांना सुपूर्त करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यार्थ्‍यी विद्यार्थ्‍यीनी, प्राध्‍यापक, अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल महोत्‍सवात राज्‍यातील एकुण १९ कृषी व अकृषि विद्यापीठातील सुमारे ७१४ कलावंत सहभागी झाले होते. पाच दिवसीय युवक महोत्‍सवात संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय व ललित कला अशा विभागांतील विविध २४ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थांनी आपल्‍या कला सादर केल्‍या.
गोल्‍डन बॉयचा पुरस्‍कार शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थ्‍यी ऋषिकेश देशमाने
गोल्‍डन गर्लचा पुरस्‍कार मुबंई विद्यापीठाची विद्यार्थ्‍यीनी हेमांगी चौधरी
विविध कला प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद व उपविजेतेपद
वाडमयीन कला प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावले तर उपविजेतेपद मुंबर्इ विद्यापीठाने प्राप्‍त केले. ललीत कला प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी विद्यापीठाने तर उपविजेतेपद मुंबई विद्यापीठाने प्राप्‍त केले. संगीत विभागातील सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाने तर उपविजेतेपद शिवाजी विद्यापीठाना मिळविले. रंगमंचीय कला विभागात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्‍त केले तर उपविजेतेपद शिवाजी विद्यापीठाने प्राप्‍त केले तसेच नृत्‍य विभागात सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाने प्राप्‍त केले तर उपविजेतेपद शिवाजी विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास संयुक्‍त प्राप्‍त केले
शोभायात्रेतील उत्‍कृष्‍ट सादरिकरणाचे प्रथम पुरस्‍कार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी प्राप्‍त केला तर व्दितीय व तृतीय पुरस्‍कार अनुक्रमे महाराष्‍ट्र प्राणी व मत्‍स विद्यापीठ, नागपुर व सोलापुर विद्यापीठ, सोलापुर यांनी मिळविला.


इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव स्‍पर्धा – 2017 निकाल

संगीत विभाग
भारतीय शास्‍त्रीय गायन    
पहिला क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक  : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
शास्‍त्रीय वाद्य संगीत
(तालवाद्य)
पहिला क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर 
दुसरा क्रमांक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्‍ट्र राज्‍य मुक्‍त विद्यापीठ, नाशीक
तिसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
शास्‍त्रीय वाद्य संगीत
(स्‍वरवाद्य)
पहिला क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
दुसरा क्रमांक  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
तिसरा क्रमांक : स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
भारतीय सुगम संगीत
पहिला क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक  : स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
तिसरा क्रमांक : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली 
पाश्चिमात्‍य गायन (वैयक्‍तीक)
पहिला  क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
भारतीय समुहगीत
पहिला क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर व स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
पाश्चिमात्‍य समुहगीत
पहिला क्रमांक:  मुंबई विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक: शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
तिसरा क्रमांक: एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
लोकसंगीत वाद्यवृंद
पहिला क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
दुसरा क्रमांक : स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
तिसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई




नृत्‍य विभाग
लोक / आदिवासी नृत्‍य
पहिला क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
तिसरा क्रमांक : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य
पहिला क्रमांक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
दुसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : सोलापुर विद्यापीठ    

वाडमयिन कला प्रकार
प्रश्‍न मंजुषा 
पहिला क्रमांक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
दुसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
वत्‍कृत्‍व स्‍पर्धा
पहिला क्रमांक : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ
दुसरा क्रमांक : महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
तिसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई  
वादविवाद स्‍पर्धा
पहिला क्रमांक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
दुसरा क्रमांक : महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
तिसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
रंगमंचीय कला विभाग
एकांकीका   
पहिला क्रमांक: एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक: महाराष्‍ट्र प्राणी व मत्‍स्‍य विद्यापीठ, नागपुर  
लघुनाटीका
पहिला क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
दुसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व सोलापुर विद्यापीठ, सोलापुर
मुकनायक
पहिला क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
दुसरा क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
तिसरा क्रमांक : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर व सोलापुर विद्यापीठ, सोलापुर
नकला
पहिला क्रमांक : स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
दुसरा क्रमांक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक: राष्‍टसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ 
ललित कला विभाग
स्‍थळ चित्र  
पहिला क्रमांक : सोलापुर विद्यापीठ, सोलापुर
दुसरा क्रमांक :  सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
तिसरा क्रमांक:  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
चिकटकला  
पहिला क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
दुसरा क्रमांक :  मुंबई विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव
पोस्‍टर मेकींग
पहिला क्रमांक : शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
दुसरा क्रमांक :  मुंबई विद्यापीठ, मुंबई
तिसरा क्रमांक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद         
तिसरा क्रमांक : स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
माती कला  
पहिला क्रमांक : उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव
दुसरा क्रमांक :  शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
तिसरा क्रमांक : कवी कुलगुरु कालीदास संस्‍कृत विद्यापीठ, रामटेक