वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अभिनव संकल्पनेतुन मराठवाडयातील शेतक-यांकरिता कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने विविध पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) व फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत ऑनलाईन कृषि संवाद मालिका आयोजित करण्यात येत असुन दिनांक २० सप्टेंबर रोजी सदर मालिकेचा नववा भाग माननीय कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या संवाद कार्यक्रमात कृषि अधिकारी, कृषि विस्तारक आणि शेतकरी बांधव यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
तांत्रिक सत्रामध्ये सोयाबीन वरील सद्यस्थितीत किडींचे व्यवस्थापन या विषयावर किटकशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात डॉ. राजेंद्र जाधव यांनी हिरवी घाटे अळी व तंबाखुची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावेत. शेतात इंग्रजी टि (T) अक्षरासारखे पक्षीथांबे लावावेत. सद्यस्थितीवरील सोयाबीनवर पाने खाणा-या अळया, खोडमाशी, पाने खाणा-या अळया, चक्री भुंगयाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीवर गेल्यास पाने खाणा-या अळीसाठी फ़्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी 3 मिली किंवा स्पायनेटोरम ११.७ एससी ९ मिली प्रती १० लिटर पाणी मिसळुन फवारावे. खोडमाशी व चक्रीभुगयासाठी थायामिथॉक्झाम १२.६ अधिक लॅमडा साहॅलोथ्रीन ९.५ झेडसी २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी किंवा 3 मिली किंवा बिटासायफल्युथ्रीन ८.४९ + इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ७ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करण्याचा सल्ला दिला.
वनस्पती रोग तज्ञ डॉ. गजेंद्र जगताप यांनी सोयाबीनवरील चारकोलरॉट व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले तर डॉ. अरुण गुटटे यांनी मार्गदर्शनात म्हणाले की, केडीएस-७२६, केडीएस-७५३ या सोयाबीनच्या जातींच्या झाडांची तसेच पावसाचा ताण पडल्यामुळे पाने जास्त प्रमाणात पिवळी पडुन गळत आहेत. ज्या शेतक-यांनी मायक्रोन्युट्रींयट ग्रेड-१, सल्फर व पोटॅशयुक्त खते दिली त्यांच्या शेतात पाने पिवळी पडण्याचे प्रमाण कमी दिसुन आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात किटकशास्त्रज्ञ
डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी कृषि संवाद कार्यक्रमाची माहिती
दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले. सदर कृषि संवाद कार्यक्रमातील सल्ला शेतकरी बांधवा उपयुक्त
ठरल असल्याचे मत सहभागी शेतकरी व कृषि अधिकारी यांनी व्यक्त केले. सदर कृषि संवाद कार्यक्रमास लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक
श्री. साहेबराव दिवेकर, विभागीय
कृषि सहसंचालक श्री. रमेश जाधव, विभाग प्रमुख (कृषि किटकशास्त्र) डॉ. पुरुषोत्तम
नेहरकर, डॉ.
शिवाजीराव म्हेत्रे, डॉ. गजेंद्र जगताप, क्रॉपसॅप समन्वयक अधिकारी डॉ. अनंत लाड, किटकशास्त्रज्ञ
डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजरतन खंदारे, डॉ.
योगेश मात्रे, श्री. दिपक लाड आदीसह कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व मराठवाड्यातील शेतक-यांनी सहभाग नोंदवला.