कृषि
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर नवीन आव्हाने आहेत. कृषि विद्यापीठाच्या
संशोधनास दिशा मिळण्यासाठी व प्रगतीसाठी आंतर-विद्यापीठीय विद्यार्थी व शास्त्रज्ञ
यांच्यात विचारांचे आदान-प्रदान होणे आवश्यक आहे. मराठवाडा कृषि वि़द्यापीठात विदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी
येत आहेत हि निश्चितच अभिमानाची बाब आहे. भविष्यात कृषि शिक्षणासाठी हे विद्यापीठ विदेशातील विद्यार्ध्यानमध्ये आकर्षण ठरेल असे प्रतिपादन डॉ.
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. रविप्रकाश दानी यांनी दिनांक 25 डिसेंबर 2012 रोजी वि़द्यापीठाच्या
सदिच्छा भेटी दरम्यान केले.
पशु-संवर्धन व दुग्धशास्त्र विभागास भेटी दरम्यान
विद्यापीठातील उस्मानाबादी शेळीवरील संशोधन लहान शेतक-यांनसाठी उपयुक्त आहे असे
मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे,
शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कृषि
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, विभाग प्रमुख
डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. विलास पाटील, डॉ. ए. टि. शिंदे, प्रा.लोंढे उपस्थित
होते.
गृहविज्ञान महाविद्यालयाच्या भेटी प्रसंगी मा.
कुलगुरू डॉ. रविप्रकाश दानी म्हणाले कि,
गृहविज्ञान महाविद्यालय असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव कृषि विद्यापीठ आहे, ज्यामुळे
येथे ग्रामीण महीलासह संपुर्ण्ा
कूटुंबाचा विचार केला जातो. महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्या
प्रा. विशाला पटटणम यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहीती दिली. या
प्रसंगी विभाग प्रमुख डॉ.प्रभा अंतवाल, डॉ.जयश्री झेंड, डॉ.सुनीता काळे आदी उपस्थित होते.
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक प्रा. आनंद
गोरे यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती मा.
कुलगुरू डॉ. रविप्रकाश दानी यांना दिली. मा.डॉ.रविप्रकाश दानी म्हणाले कि, विद्यापीठाच्या माहिती
तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांमुळे शेतक-यांमध्ये जिज्ञासा निमार्ण होत आहे.
अधिक बियाणे उत्पादनासाठी सिंचनस्त्रोत विकास प्रकल्पाची माहिती सहयोगी अधिष्ठाता
तथा प्राचार्या डॉ. अशोक कडाळे, प्रा. मदन पेंडके व प्रा. संदिप पायाळ यांनी दिली
तर कृषि अभियांत्रिक महाविद्यालयच्या सौरउर्जा पार्कची माहीती प्रा.टेकाळे,
प्रा.संजय पवार यांनी दिली. तसेच कृषि अभियांत्रिक मधील विविध औजाराची माहिती
प्रा. पोटेकर व प्रा. गोपाल शिंदे यांनी दिली. लिंबुवर्गीय तंत्रज्ञान
अभियानांतर्गत रोपवाटीकेची माहिती डॉ. सरकटे व डॉ. एंगडे यांनी दिली. यावेळी डॉ.
एस. पी. जिंतुरकर, डॉ. एन. डी. देशमुख उपस्थित होते. उस संशोधन प्रक्षेत्राची
माहिती सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्या डॉ. उदय खोडके व प्रा. आसेवार यांनी
दिली. कार्यक्रम यशस्वीते साठी डॉ. काळपांडे, प्रा.अनिस कांबळे, प्रा.महेश
देशमुख, प्रा.रवि शिंदे आदिनी परिश्रम घेतले
|
कुलगुरू मा डॉ रविप्रकाश दानी यांनी ऊस प्रक्षेत्रास भेट दिली त्या प्रसंगी, सोबत मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ विश्वासराव शिंदे, विस्तार शिंक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ गोवर्धन खंडागळे, डॉ उदय खोडके, डॉ आसेवर, श्री वाघमारे आदि |