Pages

Sunday, February 17, 2013

शेतीच्‍या शाश्‍वत विकासासाठी पाणलोट क्षेत्राचा विकासाशिवाय तरणोपाय नाही ........ कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे

     बदलत्‍या हवामान परिस्थितीमध्‍ये शेतीच्‍या व फळबागांच्‍या शाश्‍वत विकासासाठी पाणलोट क्षेत्राचा विकासाशिवाय तरणोपाय नाही, या भागात त्‍यासाठी मोठा वाव आहे  असे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मा डॉ किशनराव गोरे यांनी केले.
    मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्‍तार शिक्षण संचालनालयामार्फत लिंबुवर्गीय फळपिकांवर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण मेळावा कृषि विभागाच्‍या सहकार्याने औरंगाबाद जिल्‍हयातील पैठण तालुक्‍यातील थाप‍टी तांडा, देवगांव येथे दि 16 फेब्रूवारी 2013 रोजी आयोजीत मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्‍हणाले कि, पडलेल्‍या पाउसाचे पाणी आडवीने व जिरवीणे गरजेचे असुन त्‍या पाण्‍याच्‍या तंतोतंत वापरासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी यासारखे उपक्रमाव्‍दारे विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावर त्‍यांच्‍या समस्‍या सोठविण्‍यासाठी येत आहेत.
    या कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, राष्ट्रिय फलोत्‍पादन अभियानाचे आयुक्‍त मा श्री गोरखसिंग व महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन विभागाचे संचालक मा श्री डि जी बकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, जिल्‍हा कृषि अधिक्षक श्री डि आय गायकवाड उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतक-यांनी माती परिक्षण करूनच फळपिकांसाठी उपयुक्‍त जमीनीवर लागवड करावी, गेली दोन महिने विद्यापीठ मराठवाडयातील टचांईग्रस्‍त मोसंबीबांगादाराना लिंबुवर्गीय फळपिकांसाठी तंत्रज्ञान अभियानातंर्गत कृषि विभागाच्‍या सहकार्याने मेळाव्‍यातुन मार्गदर्शनकरित आहे याचा निश्चितच फायदा होतांना दिसत आहे.
     याप्रसंगी टचांईग्रस्‍त मोसंबीबांगाचे व्‍यवस्‍थापन या विषयावर डॉ एम बी पाटील यांनी तर कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ एम बी सरकटे, लागवड तंत्रज्ञानावर डॉ एस पी जिंतुरकर, योग्‍य जमीनीची निवड यावर डॉ पी डब्‍ल्‍यु एंगडे, रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ पी एम ठोंबरे आदींनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री दिपक जोशी यांनी केले. मेळावा यशस्‍वीतेसाठी डॉ एन डी देशमुख, तालुका कृषि अधिकारी श्री जी एम पायघन, श्री शहादेव ढाकणे, उपसंरपंच श्री अर्जुन ठोकळ व कृषि विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास परिसरातील फळबागायतदार मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील टचांईग्रस्‍त मोसंबीबांगाना मान्‍यवरांनी व शास्‍त्रज्ञांनी भेटी दिल्‍या.