शिवाजी
महाराज याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यापासुन
प्रेरणा घ्यावी. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जे नियोजनबध्द प्रयत्न केले
त्याच पध्दतीने आपल्या शैक्षणीक क्षेत्रामध्ये नियोजनबध्द परिश्रम करावेत व
आपल्या संस्थेचे नांव देशपातळीवर न्यावेत असे सल्ला मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी
गारे यांनी आपल्या भाषणात दिला. मकृवि, परभणी येथे आयोजीत श्री छत्रपती शिवाजी
महाराज जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता (कृषि ) डॉ. विश्वासराव शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक
ढवण व कुलसचिव श्री का. वि. पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्य प्रा विशाला पटणम, अन्नतंत्र महाविद्यालयाचे डॉ. पी. एस. कदम,
उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. बी. एन. शिंदे, विद्यापीठ अभियंता श्री डी. डी.
कोळेकर, विद्यापीठ कल्याण अधिकारी डॉ. के. टी. आपेट यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मा. कुलगुरू डॉ. के.
पी. गोरे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात
आले. महाराष्ट्रातील दुष्काळ सदृष्य परिस्थितीचा विचार करुन अत्यंत साधेपणाने
शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारा खर्चामध्ये
बचत करुन सदरील निधी दुष्काळ सद्दष्य कामासाठी वापरण्याचा मनोदय विद्यार्थ्यांनी
करुन एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन मा. कुलगुरू यांनी केले.
यावेळी सर्व विभागाचे विभाग
प्रमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी वर्ग मोठ्या संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर बांगर यांनी केले तर आभार
प्रदर्शन विठ्ठल रोडगे यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. एच.व्ही. काळपांडे, प्रा. डी. एफ. राठोड, प्रा. डॉ. आशा देशमुख व
विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.