Pages

Thursday, March 28, 2013

मान्यवरांनी साजरा केला चिमुकल्यांचा पदवीदान सभारंभ



    मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृह विज्ञान महाविद्यालायाच्‍या  एल पी पी स्कूलच्‍या विद्यार्थीचा अभिनव असा चौथा पदवीदान सभारंभ मान्यवरांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणुन शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्‍मु) चे  माजी कुलगूरू तथा कृषी विज्ञान राष्ट्रीय अकॅडमीचे सचिव मा डॉ अन्‍वर आलम, स्‍वामी विवेकानंद तंत्रज्ञान विद्यापीठ (भिलाई) चे कुलगूरू डॉ बी सी मल, भारतीय कृषि अनूसंधान परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील एस्‍कॉर्ड लिमीटेडचे सल्‍लागार मा डॉ एस के टंडन, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ शंकरराव मगर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ व्‍ही एम मायंदे, नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर पी सिंग, महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण विभागाचे अव्‍वर सचिव अभियंता मा व्हि बी नाथ हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे होते तसेच शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळेविस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
    आपल्‍या भाषणात माजी कुलगूरू मा डॉ अन्‍वर आलम म्‍हणाले कि, हा चिमुकल्‍यांचा पदवीदान संमारभ आमच्‍यासाठी अभिनव असा अनुभव आहे, यामुळे लहान मुलांना निश्चितच प्रेरणा मिळते. मा डॉ एस के टंडन म्‍हणाले कि, मुलांना आपण जसे घडवतो तसे ते घडतात, पालकांनी आपले निर्णय त्‍याच्‍यावर लादु नयेत. तर अध्‍यक्षयीय भाषणात मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले कि, हि मुले देशाची संपत्‍ती आहे विद्यापीठातील एल पी पी स्कूलचा हा उपक्रम स्तूत्य असा उपक्रम आहे. या सभारंभात एल पी पी स्कूलच्‍या 5-6 वर्ष वयोगटातील ब्रीज सेकशनच्‍या 32 विद्यार्थीना पुर्व प्राथमिक शिक्षण यशस्‍वीरीत्‍या पुर्ण केल्‍याबददल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात प्रा विशाला पट्टनम यांनी एल पी पी स्कूलबाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जया बंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ विना भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संध्‍या चौधरी सह इतर वर्ग शिक्षीकांनी परिश्रम घेतले. यावेळी बालकाच्‍या उच्‍चत्‍तम विकासासाठी हसत खेळत शिक्षण या सी डी चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीचे पालक, विद्यापीठातील प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.