Pages

Wednesday, May 1, 2013

मराठवाडा़ कृषि विद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्‍पर्धा 2013 चा पारितोषिक वितरण समारंभ संपन्‍न

मा. कुलगुरू डॉ.‍ किशनरावजी गोरे व इतर मान्यवरांसोबत क्रिकेट स्‍पर्धेमध्‍ये श्री जी बी उबाळे यांच्‍या नेतृत्‍वाखालील प्रशासकीयअ विजेता संघ 

क्रिकेट स्‍पर्धेमध्‍ये नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या संघाने उपविजेता संघ 

 कब्‍बडी स्‍पर्धेत प्रा. टि. एफ. राठोड यांच्‍या नेतृत्‍वाखालील विद्यापीठ गोल्‍डन विजेता संघ‍ 
    
व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेमध्‍ये श्री अशोक खिल्लारे यांच्‍या नेतृत्‍वाखालील विद्यापीठअ विजेता संघ 

    मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्‍पर्धा 2013 चे आयोजन 27 ते 29 ए‍‍प्रिल 2013 दरम्‍यान करण्‍यात आले होते. या क्रिडा स्‍पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त दि. 1 मे 2013 रोजी मा. कुलगुरू डॉ.‍ किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कुलसचिव डॉ. डि. बी. देवसरकर, विद्यापीठ अभियंता श्री डी. डी. कोळेकर, नियंत्रक श्री एन. जे. सोनकांबळे, सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. अशोक कडाळे, डॉ.पि.एन.सत्‍वधर व प्रा.विशाला पटनम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी विजयी संघाना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषक प्रदान करण्‍यात आले. क्रिकेट स्‍पर्धेमध्‍ये श्री जी बी उबाळे यांच्‍या नेतृत्‍वाखालील प्रशासकीयअ संघ विजेता ठरला तर नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्‍या संघाने उपविजेतेपद पटकाविले. व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेमध्‍ये श्री अशोक खिल्लारे यांच्‍या नेतृत्‍वाखालील विद्यापीठअ संघ विजेता, तर प्रा. सचिन मोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठ-ड संघ उपविजेता ठरला. कब्‍बडी स्‍पर्धेत प्रा. टि. एफ. राठोड यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठ गोल्‍डन हा संघ‍ विजेता, तर प्रा. ई. डी. घ्‍यार यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठ रायडर हा संघ उपविजेता ठरला. तसेच बॅटमिंटन दुहेरी वरिष्‍ठ गटात प्रा. शाहू चव्‍हाण व टि. एफ. राठोड विजेते ठरले तर कनिष्‍ठ गटात श्री राम खोबे व धिरज पाथ्रीकर विजेते ठरले. महिला दुहेरी बॅटमिंटन गटात प्रा. विशाला पट्टनम व डॉ. आशाताई देशमुख विजेत्‍या, तर प्रा. सुनिता पवार व अर्चना घनवट उपविजेत्‍या ठरल्‍या. वैयक्तिक स्‍पर्धेत धावणे या स्‍पर्धेत श्री पि. जी. वागतकर यांनी प्रथम क्रमांक पट‍कविला, तर प्रा. शाहू चव्‍हाण व श्री. राम खोबे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतिय क्रमांक पटकाविला. लांबउडी स्‍पर्धेत श्री पि. जी. वागतकर यांनी प्रथम, तर श्री एस. एस. राठोड व श्री वाय. पी. ठोंबरे यांनी अनुक्रमे द्वितिय व तृतिय क्रमांक पटकाविला. बॅटमिंटन एकेरी पुरुष गटात प्रा. शाहू चव्‍हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर प्रा. टि. एफ. राठोड व प्रा. बि. व्‍ही. आसेवार यांनी अनुक्रमे द्वितिय व तृतिय क्रमांक पटकाविला. बॅटमिंटन महिला गटात प्रथम पारितोषिक डॉ. आशाताई देशमुख, तर द्वितिय आणि तृतिय क्रमांकाचे पारितोषक रुपाली पतंगे व प्रा. विशाला पट्टनम यांनी पटकाविले. टेबल टेनिस पुरूष गटामध्‍ये प्रथम व द्वितीय पारितोषक अनुक्रमे डॉ. प्रशांत करंजीकर व श्री सतिष जाधव यांनी, तर महिला गटात डॉ. आशाताई देशमुख व डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी पटकाविला. कॅरम पुरुष गटामध्‍ये प्रथम, द्वितिय व तृतिय पारितोषक अनुक्रमे श्री प्रेशित चव्‍हाण, श्री अमोर सोनकांबळे व प्रा. शिवकुमार सरसर तर महिला गटात कु.अश्विनी बेदरे, प्रा.सुनिता पवार, साधना उमरीकर यांनी पटकाविला. बुध्‍दीबळ स्‍पर्धेत श्री.डि.व्‍ही.राऊत यांनी प्रथम, तर द्वितिय व तृतिय क्रमाकांचे पारितोषिक अनुक्रमे प्रा.डि.के.झाटे व श्री.व्हि.टी.मुकाडे यांनी पटकाविले. रांगोळी स्‍पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमाकांचे पारितोषक अनुक्रमे डॉ.मेघा सुर्यवंशी, डॉ.मीना वानखेडे व कु.ममता पतंगे यांनी पटकाविले. संगीत खुर्ची स्‍पर्धेत डॉ.पपिता गौरखेडे, डॉ.मेघा सुर्यवंशी व अर्चना घनवट यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय व तृतीय पारितोषिक पटकाविले. या क्रिडा स्‍पर्धेप्रसंग्री घेण्‍यात आलेल्‍या सांस्‍कृतिक कार्यक्रमात भक्तिगीत स्‍पर्धेत प्रा. मंदकुमार सातपुते, प्रा. मेघा उमरीकर आणि चित्रा बेलूरकर यांनी प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्‍त केले. तसेच सिनेगीत स्‍पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतिय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे श्री उदय वाईकर, श्री विजय सावंत व डॉ. आशाताई देशमुख यांनी पटकाविले.
      या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात मा.डॉ.के.पी.गोरे म्‍हणाले की, या क्रिडा स्‍पर्धेमुळे विद्यापीठ कर्मचा-यामध्‍ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांनी नियमीतपणे खेळ-खेळावेत म्‍हणजे त्‍यामुळे आत्‍मविश्‍वास व चिकाटी निर्माण होते तसेच कार्यक्षमतेत वाढ होते. या स्‍पर्धेत कामगारापासून ते मोठ्या अधिका-यांपर्यंत सहभाग नोंदवून एकजुटीचा आदर्श निर्माण केला. या एकजुटीने विद्यापीठ कोणतेही कार्य यशस्‍वीरित्‍या पुर्ण करु शकतो असे उदगार मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांनी आपल्‍या भाषणात काढले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. के. टी. आपेट यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे व श्री अशोक खिल्‍लारे तर आभार प्रदर्शन श्री शाहु चव्‍हाण यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ ए के गोरे, डॉ महेश देशमुख, प्रा गडदे, श्री एस एस खताळ आदीसह सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले. तसेच पंच म्हणून श्री भालचंद्र पवार, महेश काळदाते, शरद हिवाळे तर समालोचक म्हणून श्री आबा शिंदे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.