Pages

Saturday, May 18, 2013

मकृविच्‍या खरिप शेतकरी मेळावातील वैशिष्‍टपुर्ण दालनास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद




मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय, इफको आणि महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत खरीप शेतकरी मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्था व बचत गटांचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे शेतक-यांसाठी आकर्षणाचा भाग होता. विद्यापीठात प्रथमच या प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या उद्यानविद्या विभागाचे दालणास शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. या दालनात सुखलेल्‍या फुलांचे संवर्धन करून अनेक वस्‍तु बनविलेल्‍या होत्‍या, पोलीहाउस मध्‍ये तयार केलेले चेरी टोमॅटो, बी विरहीत काकडी, हिरवी सिमला मिर्ची, बाजरा पफ, भाजलेले सोयाबीन, नैसर्गिक रंगाने बनवलेली पोषक व स्‍वादिष्‍ट ब्रेड, पोलीहाउसचा नमुना, विविध पिकांच्‍या सुधारीत जाती, ठिंबक सिंचन, काटेकोर शेती इत्‍यादीवर पोस्‍टर व विविध प्रकाशने उपलब्ध होती. मका पिकाचे विविध वाण व लागवड तंत्रज्ञान, मुल्‍यवर्धीत पदार्थ यावर आधारीत नवी दिल्‍ली येथील मका संशोधन संचालनालयाचे दालन होते तसेच नागपुर येथील केंद्रिय कापुस संशोधन संस्‍थाचे दालनात कपाशीचे लागवड तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पाणी व्‍यवस्‍थापन, वेचणी इत्‍यादी विषयांवर माहिती व प्रदर्शन याचा समावेश होतो. मुंबई येथील केंद्रिय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थाच्‍या दालनात कपाशीच्‍या प-हाटीचा कार्यक्षम वापर, हार्डबोर्ड, कंपोस्‍ट तयार करणे इत्‍यादी विविध पदार्थाची व वस्‍तुंची माहिती, प्रदर्शन व मार्गदर्शन शेतक-यांना केले गेले. भोपाळ येथील केंद्रिय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेच्‍या दालनात शेतीसाठी उपयुत्‍क अशा विविध अवजारे व यंत्राचे दालण शेतक-यांसाठी विशेष आर्कषण ठरले यात बियाणे व फळे प्रतवारी करणारे यंत्र, विविध फळे काढणी यंत्र, भुईमुग फोडणी व काढणी यंत्र, रोप लावणी यंत्र तसेच सोयाबीनचे मुल्‍यवर्धीत पदार्थ त्‍यात सोया मिल्‍क, सोया नट, सोया पनीर, सोया बिस्किट इत्‍यादींचा समावेश होता. या प्रदर्शनीत प्रथमचे विद्यापीठात 100 पेक्षा जास्‍त दालणाचा समावेश होता, या दालनात शास्‍त्रनासोबत चर्चा करतांना शेतकरी दिसत होते.