Pages

Wednesday, July 31, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश पुर्णत: ढगाळ राहून औरंगबाद, बीड, उस्‍मानाबाद, परभणी, व हिंगोली जिल्‍हयात हलक्‍या स्‍वरूपाचा तर लातुर व नांदेड जिल्‍हयात हलका ते मध्‍यम तर तुरळक ठिकाणी भारी स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ११.० ते २०.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१.० ते ८९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५०.० ते ७७.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून औरंगबाद, बीड, उस्‍मानाबाद, परभणी, व हिंगोली जिल्‍हयात हलक्‍या स्‍वरूपाचा तर लातुर व नांदेड जिल्‍हयात हलका ते मध्‍यम तर तुरळक ठिकाणी भारी स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

शेतकरी बांधवांना कृषि सल्‍ला 
  • खरीप ज्‍वारीचे पिकात कोळपणी करून तणाचे नियंत्रण करावे. खोडमाशीच्‍या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४० टक्‍के २० मिली + स्टिकर १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • सोयाबीनचे पिकात कोळपणी करावी. पाने खाणा-या अळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी. पानवरील ठिपके रोगाचे नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड -२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.
  • साचे पिकात वापसा येताच खंदणी करून पिकास मातीची भर द्यावी.(बांधनी करावी).
  • बागायात / जीरायत कापूस पिकास तुडतुडे व फुलकिडयांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणसाठी अॅसिफेट ७५ टक्‍के/फिप्रोनील ७५ टक्‍के २० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्‍के, १० मिली किंवा असिटामेप्रीड २० टक्‍के २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. पानावरील ठिपके रोगाच्‍या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.
  • पावसाचे पाणी आळयातून बाहेर काढून द्यावे. मृगबाहार धरलेल्‍या शेतक-यांनी संत्रा मोसंबी पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड आळयातून द्यावा.
  • पेरूवरील देवी रोग व फळमाशीच्‍या नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम + मॅंकोझेब (१० ग्रॅम + २० ग्रॅम) + ५० टक्‍के कार्बोरील २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • भाजीपाला पिकावरील करपा, पानावरील ठिपके व केवडा रोगाचे नियंत्रणासाठी मॅंकोझेब किंवा कॉपर अझीक्‍लोराईड २५ ग्रॅम + ट्रायडेमॉर्क १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • या वर्षी पाउस समाधानकारक आहे. काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्‍त पाउस पडत आहे. जास्‍त पाउसामुळे पिके पिवळी पडली आहेत. त्‍यामुळे शेतक-यांनी शेतीतील जास्‍तीचे पाणी योग्‍य प्रकारे शेताबाहेर काढुन द्यावे. जेणेकरून शेतात जास्‍तीचे पाणी साठणार नाही व मातीची धुपही होणार नाही.


सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक ृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ३१                                              
दिनांकः ३०.०७.२०१३


Monday, July 29, 2013

वृक्षारोपन व संवर्धन काळाची गरज : डॉ. जे. व्‍ही. एकाळे

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील कापूस संशोधन योजना आणि पिक पध्‍दतीच्‍या कृषिकन्‍यांनी परभणी जिल्‍ह्यातील मुरुंबा येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला होता.  
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री गोपीनाथराव झाडे, विशेष अतिथी म्‍हणुन शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती कोयाळकर, कृषि सहाय्यक श्री दिपक नगोरे, ग्रामसेवक श्रीमती होनमाने, कृषितज्ञ कुलकर्णीसर, प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. जे. व्‍ही. एकाळे, डॉ. शेखनुर, समर्थ कारेगांवकर, श्री स्‍वामी, शाळेतील शिक्षकवृंद व समस्‍थ ग्रामस्‍थ मंडळी उपस्थित होते.
    ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे अंतर्गत वृक्षारोपनाचा कार्यक्रम सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सूचनेनुसार आणि विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा समन्‍वयक डॉ. बि. एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी  डॉ. राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात आला.
यावेळी डॉ. एकाळे यांनी वृक्षारोपनाचे महत्‍व विषद केले तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिकन्‍यांनी ग्रामीण लोकजीवन व समाज‍जीवनाचा अभ्‍यास करावा, विद्यापीठातील तंत्रज्ञानाचे शेतकरी व ग्रामीण महीलापर्यंत नेण्‍याच्‍या प्रयत्‍न करावा तसेच गावक-यांनीही विद्यापीठाची ज्ञानाची गंगा दारात आली आहे, तरी याचा पुरेपुर फायदा करुन घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला. वृक्षारोपन व संवंर्धन हि काळाची गरज आहे व त्‍या दृष्‍टीकोनातुन विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्‍यांनी  केले.
जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षक श्री स्‍वामी ह्यांनी शिक्षणाचे तसेच पर्यावरणासोबतच वृक्षरोपणाचे महत्‍व विषद केले. कृषि तज्ञ श्री कुलकर्णी यांनी  एक मुल एक झाड असे झाले तरच उद्याचा भारत उज्‍वल होईल आणि संपन्‍न, सुजलाम सुफलाम होईल, असे नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी पंचांगे यांनी केले.  कोमल शिंदे, संगीता थिटे, पल्‍लवी पाटील, सविता झाटे, शितल उफाडे, प्रियांका खटींग, शितल लोनसणे, शुभांगी यादव, कांचन क्षिरसागर, अपर्णा काळदाते, निशा खंदारे, आमरीन कादरी, भाग्यश्री फड यांनी वृक्षारोपन कार्यक्रम घेण्‍यासाठी परिश्रम घेतले. डॉ. कारले, डॉ. नारखेडे व डॉ. मंत्री यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यात आला.

Saturday, July 27, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १२.० ते २२.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य-पश्चिम दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३.० ते ९६.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५.० ते ७९.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.


कृषि सल्‍ला 
  • सोयाबीन - वापसा येताच कोळपणी करून तण नियंत्रण करावे. पानेखाणा-या आळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली किंवा इमामेक्टिन बेन्‍झोएट ५ एस.जी.३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून फवारणी करावी. चक्री भुंग्‍याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास डायमेथेएट ३० टक्‍के १० मिली किंवा ट्रायझोफॉस ४० ई.सी १६ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्‍के प्रवाही २५ मिली प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.  
  • कापूस - वापसा येताच कोळपणी करावी व कोळपणी सोबत नत्राची दुसरी मात्रा हलक्‍या जमीनी २० किलो तर भारी जमीनी ३० किलो प्रति हेक्‍टर द्यावी.
  • केळीचे बागेत पाणी साचुन रहाणार नाही यांची काळजी घ्‍यावी. जुनमध्‍ये लागवड केलेल्‍या केळीचे पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड दिला नसल्‍यास देण्‍यात यावा .बागेतील पावसाचे पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्‍यावी. वापसा येताच खुरपणी करून तण नियंत्रण करावे. 
  • डाळींबाचे रोपे तयार करावयाची असल्‍यास झाडावर गुटी कलम करावी. बागेत पावसाचे पाणी साचुन रहाणार नाही याची काळजी घ्‍यावी. नविन लागवड केलेल्‍या कलमांचे खुंटावरील फुट काढून टाकावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.
  • नविन लागवड केलेल्‍या आंब्‍यामध्‍ये जागेवर मृदुकाष्‍ट कलम करावी. कलमीकरणासाठी परभणी हापूस, केशर, सिंध्‍दू या वाणांची कलम कांडयाचा वापर करावा.  
  • मिरची, वांगे, व टोमॅटो ची पुनर लागवड सरी वरंब्‍यावर करावी. लागवडी पुर्वी रोप बॅविस्‍टीनच्‍या १ टक्‍के द्रावणात बुडवुन घ्‍यावीत. भेंडी, गवार व चवळी या भाजीपाला पिकांची लागवड करावी.
  • पावसाचे अतिरीक्‍त पाणी वाहून नेण्‍यासाठी शेताच्‍या बाजुला गवताचे चर असतात. गवताच्‍या चरांची त्‍वरित दुरूस्‍ती करून द्यावी. चर फुटला असेल तर त्‍याची डागडूगी करून घ्‍यावी. जास्‍त गवत वाढले असेल तर ते कमी करून घ्‍यावे. गवताचा चरातून पुर्णपणे गवत काढून घेउ नये. अन्‍यथा गवताच्‍या चराचीच धूप होउन जाईल. पावसाचे अतिरिक्‍त पाणी गवताच्‍या चरातून सहजपणे वाहून गेल्‍यामुळे शेतातील मातीची धूप आपण रोखू शकतो.
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषिहवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ३०                                       
दिनांकः २६/०७/२०१३

Friday, July 26, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहाच्‍या नुतनीकरण कामाचा शुभारंभ

  
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील 30 वर्षापुर्वी बांधण्‍यात आलेल्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहाच्‍या नुतनीकरणाच्‍या कामाचा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आला. पदव्‍युत्‍तर आचार्यस्‍तरावरील विद्यार्थ्‍यांसाठी असलेल्‍या वैद्यनाथ वसतीगृहाचे नुतनीकरणासाठी नुकतेच नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद यांच्‍यातर्फे अनुदान प्राप्‍त झाले. वसतीगृहात 52 रूम असलेल्‍या 250 विद्यार्थी राहण्‍याची क्षमता आहे. या प्रसंगी मा. कुलगुरू म्‍हणाले की, वसतीगृहामध्‍ये विद्यार्थ्‍यांना अभ्‍यासासाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी इंटरनेटच्‍या सुविधासह अद्यावत वाचनालय इतर सुविधांची निर्मिती करण्‍यात आली असल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना शिक्षण, संशोधन व स्‍पर्धा परीक्षेसाठी उपयोग होणार आहे. नुतनीकरणामुळे या सुविधेत अधिकच भर पडणार आहे.
या प्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, वसतीगृह अधिक्षक तथा ज्‍वार कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, विद्यापीठ अभियंता श्री रहिम, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Thursday, July 25, 2013

किड व रोगाचे वेळीच नियंत्रण करा – डॉ. बी. बी. भोसले




     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे नांदगांव बु. ता. जि. परभणी येथे खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रगतशील शेतकरी श्री माणिकराव जवंजाळ हे होते.  तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बि. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. पी. कदम, ग्रामसेवक श्री संतोष जाधव, श्री हनुमान बोबडे, श्री बालासाहेब जवंजाळ, सखारामजी जवंजाळ, विठ्ठलराव जवंजाळ व  मौजे पांढरी येथील प्रगतशील शेतकरी श्री भुंजगराव धस, हे उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. बी. बी. भोसले यांनी कापुस व सोयाबीन या पिकांच्‍या एकात्मिक किड व्‍यवस्‍थापना बद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले. किड व रोगांचे शेतक-यांनी वेळीच नियंत्रण करावे म्‍हणजे कमी खर्चात प्रभावी किड नियंत्रण होईल असा सल्‍ला त्‍यांनी दिला. विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. ए. पी. सुर्यवंशी यांनी एकात्मिक रोग व्‍यवस्‍थापन, डॉ.यु.एन.आळसे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान तर डॉ. ए. एस. जाधव यांनी तण व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. या वेळेस किडींचे ओळख पोस्‍टरच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना दाखविण्‍यात आले. मेळाव्‍यास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
सुत्र संचलन श्री एस. बी. टाले यांनी तर आभार प्रदर्शन श्री एस.जी. वाकुडकर या विद्यार्थ्‍यांनी केले. मेळावा यशस्वितेसाठी जि. एन. पोटे, राजेश रंजन, आर. बी. रनेर, जि.एस. साबळे, एस.सी. सल्‍लावार, सुधीर कुमार, एम.एल. टाले, एस. एस. तेलंग्रे, विपुल कुमार, ए.एन. वडकुते, डि.ए. यादव, वाय. एस. चित्‍ता, व्हि. व्‍ही. झिरमिरे व आर. एस. भुक्तार आदिंनी परिश्रम घेतले.


Wednesday, July 24, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्‍ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश पुर्णत ढगाळ राहून जालना जिल्‍हयात हलका, औरंगबाद जिल्‍हयात मध्‍यम, बीड, उस्‍मानाबाद, लातुर व परभणी जिल्‍हयात जोरदार तर नांदेड व हिंगोली अती जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २४.० ते २९.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी १२.० ते २१.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७.० ते ९४.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३.० ते ९१.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णत ढगाळ राहून जालना जिल्‍हयात हलका, औरंगबाद जिल्‍हयात मध्‍यमबीड, उस्‍मानाबाद, लातुर व परभणी जिल्‍हयात जोरदार तर नांदेड व हिंगोली अती जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

  • खरीप ज्‍वारीचे पिकातील पावसाचे अतिरीक्‍त पाणी पीका बाहेर काढून देण्‍यात यावे. वापसा आल्‍यानंतर पिकात कोळपणी करून तणाचे नियंत्रण करावे. एक महिना झालेल्‍या खरीप ज्‍वारी पिकास ४० किलो नत्र हेक्‍टरी कोळपणीद्वारे देण्‍यात यावे.
  • पावसाचे अतिरीक्‍त पाणी पिकाबाहेर काढून द्यावे. सोयाबीन पिकात पाने खाणा-या अळयाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणासाठी वापसा येताच क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.
  • कापसाचे पिकातील पावसाचे अतिरीक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच जीरायत व बागायती कापूस पिकास उर्वरित दूसरी नत्र खताची मात्रा अनुक्रमे ४० व ६० किलो देण्‍यात यावी. रसशोषण करणा-या किडींच्‍या प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास वापसा येताच नियंणासाठी अॅसिफेट ७५ टक्‍के, २० ग्रॅम किंवा डायमिथोएट ३० टक्‍के, १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
  • पावसाचे पाणी आळयातून बाहेर काढून द्यावे. पास येताच मृगबाहार धरलेल्‍या शेतक-यांना संत्रा मोसंबी पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड आळयातून द्यावा.
  • मीरची, वांगे व टोमॅटोची पुनरलागवड वापसा येताच सरी वरंब्‍यांवर करावी.
  • फुफुसाचा दाह होण्‍याची शक्‍यता आहे. निलगीरीचे तेलाचे दोन थेंब शेळया मेंढयाचे नाकात सोडावेत जनावरे कोरडया जागेत बांधावीत.

केंद्र प्रमुख

एकात्मिक ृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः २९                                               
दिनांकः २३.०७.२०१३

Tuesday, July 23, 2013

मौजे नांदगांव येथे खरीप शेतकरी मेळावा

     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे नांदगांव बु. ता. जि. परभणी येथे दिनांक 25 जुलै 2013 रोजी सकाळी 09.00 वाजता खरीप मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य मा. डॉ. एन. डी. पवार हे उद्घघाटक म्‍हणुन तर गावच्‍या सरपंच सौ. वत्‍सलाबाई बोबडे अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्‍हणुन लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बि. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. पी. कदम, मौजे पांढरी येथील सरपंच श्री नारायणराव धस हे उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. ए. पी. सुर्यवंशी हे एकात्मिक रोग व्‍यवस्‍थापन, डॉ.यु.एन.आळसे हे ऊस लागवड तंत्रज्ञान तर डॉ. ए. एस. जाधव हे तण व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्‍यास परिसरातील जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन डॉ. ए. एस. कडाळे व कार्यक्रम अधिकारी प्राध्‍यापक एस. एस. शिंदे यांनी केले आहे.   

Monday, July 22, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कर्मचारी संघाच्या वतीने गुरूपौर्णिमानिमित्‍य मा. कुलगूरू डॉ किशनराव गोरे यांचा सत्‍कार



विद्यापीठाच्‍या सर्व‍ कर्मचा-यांनी निष्‍ठेने कार्य करून विद्यापीठाचे नाव मोठे क‍रण्‍यात हातभार लावावा, स्‍वत:च्‍या कार्यातुन स्‍वत:ची ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे मा. कुलगूरू डॉ किशनराव गोरे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कर्मचारी संघाच्या वतीने गुरूपौर्णिमानिमित्‍य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्‍हणाले कि, शेतक-यांसमोर शेतीच्‍या अनेक समस्‍या आहेत, त्‍या सोडविण्‍याचा प्रत्‍येक कर्मचा-यांनी प्रयत्‍न करावा,  शेतकरी केंद्रबिंदु मानुन कार्य करावे.
यानिमित्‍य मा. कुलगूरू यांचा सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांचा सत्‍कार संघाचे अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे यांनी तर मा. सौ. कलावंतीताई किशनराव गोरे यांचा सत्‍कार डॉ. विजया नलावडे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संघाचे अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रा. जे. एल. कातकडे यांनी केले. याप्रसंगी शिक्षण विस्‍तार संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी वनामकृवि डॉ. विलास पाटील,  डॉ. पी. एन. सत्‍वधर, डॉ. वाघमारे, उपाध्‍यक्ष श्री प्रदिप कदम, बालासाहेब घोलप, श्री दिवाकर काकडे, डॉ. परमेश्‍वर केदार, सरचिटणीस श्री ज्ञानोबा पवार, श्री पी बी शिंदे, सह सरचिटणीस श्री एकनाथ कदम, डॉ. महेश देशमुख, श्री. श्रीराम घागरमाळे, श्री. ओम ठाकुर, श्री. कोकणे, डॉ धीरज कदम, प्रा. सचिन मोरे आदी उप‍‍स्‍थीत होते. 

Saturday, July 20, 2013

परभणी जिल्‍हा कृषि हवामान सल्‍ला


मागील आठवडयाची हवामानस्थिती
दिनांक १९ ते २३ जुलै २०१३ करिता हवामान अंदाज
परभणी जिल्‍हयात मागील आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ होते. दिवसाचे कमाल तापमान २३.० ते ३१.५ अंश सेल्सिअस च्‍या दरम्‍यान होते. जे या काळातील सरासरीपेक्षा १.० ते ८.६ अंश सेल्सिअस ने कमी होता. तर किमान तापमान २१.५ ते २३.५ अंश सेल्सिअस च्‍या दरम्‍यान होते. जे या काळातील सरासरीपेक्षा १.० अंश सेल्सिअस ने कमी ते ०.८ अंश सेल्सिअस ने अधिक होते. वा-याचा वेग ताशी ४.८ ते ८.५ कि.मी. होता. हा वेग या काळातील सरासरी पेक्षा २.४ ते ५.२ किमी प्रति तास ने कमी होता. एक जुन ते आजपर्यंत ५१३.८ मीमी पाउस झाला आहे. तर १ जानेवारी पासून आजपर्यंत ५५७.३ मी.मी एकुण पाउस पडला आहे. 
परभणी जिल्‍हयामध्‍ये या आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. वारा ताशी १५.० ते १७.० कि.मी. वेगाने नैऋत्‍य-पश्चिम दिशेने वाहील. कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० अंश सेल्सिअस राहील. तसेच हवेतील आर्द्रता सकाळी ८१ ते ८५ टक्‍के आणि दुपारी ५५ ते ६५ टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.
कृषि सल्‍ला
पिकांचे नाव व अवस्‍था
कृषि सल्‍ला
सोयाबीन
पावसाचे अतिरिक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच तण नियंत्रणासाठी कोळपणी करावी. तणांचा प्रादूर्भाव अधिक असल्‍यास इमॅझिथॅफर या तंणनाशकाची ०.६ किलो क्रिया शिल घटक प्रति हेक्‍टर या प्रमाणात फवारणी करावी. ज्‍या ठिकाणी पाने खाणा-या आळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असेल अशा ठिकाणी क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस ७० टक्‍के २० मिली किंवा इमामेक्टिन बेन्‍झोएट ५ एस.जी.३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून वापसा येताच फवारणी करावी. 
बाजरी
बाजरीचे पीक वाढीचे अवस्‍थेत आहे. वापसा येताच कोळपणी करावी.
मुग/उडीद
पिकातील पावसाचे अतिरीक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. तण नियंत्रणासाठी वापसा येताच कोळपणी करावी.
तीळ/कारळ
पिकातील पावसाचे अतिरीक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच पिकात विरळणी व कोळपणी करावी.
हळद /आले
वापसा येताच खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
केळी
केळीची मृगबाग लागवड केली असल्‍यास वापसा आल्‍यानंतर ८२ ग्रॅम युरीया व २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्‍फेट प्रति झाडे द्यावे.
डाळिंब
बागेतील पावसाचे अतिरीक्‍त पाणी बाहेर काढून द्यावे. वापसा येताच तणनियंत्रण करावे.
चिकु
नविन लागवड केलेल्‍या चिकु बागेत आळयात पाणी साचून रहाणार नाही. याची काळजी घ्‍यावी. खुंटावर येणारी फुट काढून टाकावी. कलमाना काढीचा आधार द्यावा. 
आंबा
नविन लागवड केलेल्‍या आंब्‍यामध्‍ये जागेवरमृदुकाष्‍ट कलम करावी. कलमी करणासाठी परभणी हापूस, केशर, सिंध्‍दू या वाणांची कलम कांडयाचा वापर करावा.  
पेरू
नविन लागवड केलेल्‍या बागेतील पावसाचे अतिरीक्‍त पाणी बागे बाहेर काढून द्यावे.
भाजीपाला़
वापसा येताच मीरची वांगे, टोमॅटो या भाजीपाल्‍याचा पुर्नरलागवड करावी. तसेच भेंडी, गवार, चवळी या भाजीपाल्‍याची लागवड करावी.
कृषिअभियांत्रिकी
पावसाळा सुरू झाला आहे. पावसाचे अतिरीक्‍त पाणी वाहून नेण्‍यासाठी शेताच्‍या बाजुला गवताचे चर असतात. गवताच्‍या चरांची त्‍वरित दुरूस्‍ती करून द्यावी. चर फुटला असेल तर त्‍याची डागडूगी करून घ्‍यावी. जास्‍त गवत वाढले असेल तर ते कमी करून घ्‍यावे. गवताचा चरातून पुर्णपणे गवत काढून घेउ नये. अन्‍यथा गवताच्‍या चराचीच धूप होउन जाईल. पावसाचे अतिरिक्‍त पाणी गवताच्‍या चरातून सहजपणे वाहून गेल्‍यामुळे शेतातील मातीची धूप आपण रोखू शकतो.
सदर कृषि सल्‍ला पत्रिका मराठवाडा ृषि विद्यापीठ, परभणी येथील एकात्मिक ृषि हवामान सल्‍ला सेवा योजनेतील तज्ञ समितीच्‍या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्‍यात आला.                                        

केंद्र प्रमुख  
कृषि हवामानशास्‍ञ विभागपरभणी ४३१ ४०२
पत्रक क्रमांक २८/२०१३  दिनांक १९/०७/२०१३