वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील 30 वर्षापुर्वी
बांधण्यात आलेल्या वैद्यनाथ पदव्युत्तर वसतीगृहाच्या नुतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पदव्युत्तर व आचार्यस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वैद्यनाथ वसतीगृहाचे नुतनीकरणासाठी नुकतेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद यांच्यातर्फे अनुदान प्राप्त झाले. वसतीगृहात 52 रूम असलेल्या 250
विद्यार्थी राहण्याची क्षमता आहे. या प्रसंगी मा. कुलगुरू म्हणाले की, वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी इंटरनेटच्या सुविधासह अद्यावत वाचनालय व इतर सुविधांची निर्मिती करण्यात आली असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन व स्पर्धा
परीक्षेसाठी उपयोग होणार आहे. नुतनीकरणामुळे या सुविधेत अधिकच
भर पडणार आहे.
या प्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, वसतीगृह अधिक्षक तथा ज्वार कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एच. व्ही. काळपांडे, विद्यापीठ अभियंता श्री रहिम, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.