Pages

Tuesday, July 2, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठाचा नामविस्‍तार

हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री कै. श्री. वसंतराव नाईक यांची 1 जूलै 2013 रोजी 100 वी जयंती असुन त्‍यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षात त्‍यांनी राज्‍यात केलेल्‍या कृषि क्षेत्रातील बहुमोल योगदानाच्‍या सन्‍मानार्थ महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल मा. श्री. के. शंकरनारायणन् यांचे आदेशानुसार व सन 2013 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्रमांक 10 दिनांक 1 जुलै 2013 अन्‍वये परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठास 'वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ' असा नामविस्‍तार करण्‍यात आला. यानिमित्‍त विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. गोरे यांनी महाराष्‍ट्र शासन, महाराष्‍ट्र राज्‍याचे मा. मुख्‍यमंत्री श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व मा. कृषिमंत्री श्री राधाकृष्‍णजी विखे-पाटील यांना विद्यापीठाच्‍या वतीने धन्‍यवाद दिले.
या हरित क्रांतीच्या प्रणेत्‍यांच्या दूरदृष्टीतुनेच राज्‍याच्‍या कृषि क्षेत्राच्‍या विकास होत आहे त्‍यात कृषि विद्यापीठाचा मोठा वाटा आहे व या पुढेही विद्यापीठ शेतक-यांच्‍या सेवेत अशाच प्रकारे गतीमानपणे कार्यरत राहीत असे मत कुलगुरू मा. डॉ. के. पी. गोरे यांनी त्यांना आदरांजली वाहतांना व्यक्त केली. तसेच वसंतराव नाईक यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन केले. 
ते पुढे म्हणाले कि, विद्यापीठाच्‍या 18 मे 1972 च्‍या स्‍थापनेपासुन कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण कार्यात भरीव कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रात कृषि पदविका, कृषि पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य कार्यक्रम राबविण्‍यात आहे. 1956 ला एकामेव महाविद्यालयापासुन आज विद्यापीठात एकुण 44 घटक व संलग्‍न महाविद्यालये कृषि व संलग्‍न विषयात शिक्षणाचा मोठा वटवृक्ष झाला आहे. संशोधनामध्‍ये 34 राज्‍य शासन अनुदानीत व 24 भाकृअप, नवी दिल्‍ली अनुदानीत योजने मार्फत शेतक-यांच्‍या गरजेनुसार संशोधन कार्य केले जाते. आजपर्यत विद्यापीठाने शेतक-यांसाठी विविध पिकांचे 128 वाण, 740 संशोधन शिफारशी व 25 विविध प्रकारची कृषि औजारे विकसीत केली आहेत. याचा लाभ शेतकरीबांधव मोठया प्रमाणावर घेत आहेत. विस्‍तार क्षेत्रात 11 कृषि विज्ञान केंद्रे, 1 विस्‍तार शिक्षण गट, 1 कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, 4 विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र यांच्‍या मार्फत विद्यापीठाचे केलेले संशोधन शेतक-यांच्‍या बांधापर्यंत पोहचविले जाते. शेवटी त्यांनी कृषीदिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्या दिल्या.